शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

तीन जणांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली

By admin | Updated: July 21, 2016 23:54 IST

शिर्डी/ बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही़

शिर्डी/ बेलापूर : श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतात गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली़ त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट नाही़ तर शिर्डीत वडीलांनी घेतलेले कर्ज फेडू शकत नाही, म्हणून मुलाने गळफास घेतला़ या शिवाय आजारपणाला कंटाळलेल्या सतरा वर्षीय युवतीनेही गळ्याभोवती फास आवळला़ शिर्डीतील पुनम देवानंद शेजवळ (वय १७) ही गेल्या काही वर्षांपासून पायाला झालेला जळवात व इसबगुल या आजाराला कंटाळली होती़ माजी नगरसेवक व संस्थानचे कर्मचारी देवानंद शेजवळ यांची ती मुलगी होती़ तिने बुधवारी मध्यरात्री नंतर तिच्या खोलीतच गळफास घेवुन आत्महत्या केली़ सकाळी रूममधून पुनम बाहेर येत नाही, दरवाजा ठोठावला तरीही आतमधून कोणताही प्रतिसाद कुुटुंबीयांना मिळाला नाही म्हणून दुसऱ्या किल्लीने दरवाजा उघडला असता तिने गळफास घेतल्याचे उघड झाले़ तिच्या अकाली मृत्युने आई, वडील, लहान भाऊ, आजी व नातलगांना मानसिक धक्का बसला आहे़शिर्डीतच दुसरी गळफास घेतल्याची घटना घडली़ भीमनगर येथे अमोल संघपाळ शेजवळ (वय २४) याचे सनी किराणा व जनरल स्टोअर्स हे दुकान आहे़ अमोलने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते़ कुटुंबाची जबाबदारी अमोलवर होती. पर्यायाने कर्जाचा बोजा वाढत राहिला.पहाटे पाच पासून रात्री अकरा पर्यंत किराणा दुकान अमोल सांभाळत असे़ पाठची बहिण हुशार होती. बहिणीला पैशाअभावी बीएएमएसला प्रवेश घेता आला नव्हता ही खंतही त्याला होती़ यातच कर्ज फेडणे शक्य नसल्याने अमोलने आपल्या किराणा दुकानातच गळफास घेवुन आत्महत्या केली़ त्याचा दोन वर्षापुर्वीच विवाह झाला होता़ त्याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, बहीण असा परिवार आहे़ वरील दोन्ही घटनेबाबत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथील तरुण शेतकरी गणेश अनिल बडाख (वय २९) याने (चांदेगाव ता.राहुरी) येथे स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी ही घटना घडली. आत्महत्येचे निश्चित कारण समजू शकले नाही. मयत गणेश यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, आई, वडील, चुलत भाऊ असा परिवार आहे. राहुरी पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद करुन शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला. बेलापूर येथे सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.(प्रतिनिधी)