शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
4
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
5
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
6
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
7
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
8
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
9
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
10
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
11
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
12
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
13
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
14
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
15
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
16
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
17
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
18
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
19
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
20
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी, प्रवरा कालव्यांतून शनिवारपासून आवर्तन

By admin | Updated: August 19, 2014 23:32 IST

राहाता : गोदावरी आणि प्रवरा कालव्यांतून सिंचन व पिण्यासाठी २३ आॅगस्टला आवर्तन सोडण्यात येणार आहे

राहाता : गोदावरी आणि प्रवरा कालव्यांतून सिंचन व पिण्यासाठी २३ आॅगस्टला आवर्तन सोडण्यात येणार आहे. कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांनी मंगळवारी नाशिक येथे अधिकाऱ्यांची भेट घेऊन आवर्तनाची मागणी केली होती. त्यावर दारणा व भंडारदरा धरणातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.गोदावरी आणि प्रवरा कालव्यातून खरीप हंगामासाठी आवर्तन सोडावे, अशी मागणी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी केली होती. विखे यांनी यासाठी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व जलसंपदामंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे आवर्तनाबाबत आग्रही भूमिका घेतली होती.मंगळवारी मंत्री विखे यांच्या नेतृत्वाखाली लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांनी विभागाचे मुख्य अभियंता जी. एस. लोखंडे यांची भेट घेतली. जलसंपदामंत्री मुश्रीफ, जलसंपदा विभागाच्या प्रधान सचिव मालिनी शंकर, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक बिराजदार यांच्याशी विखे यांनी दूरध्वनीवरून संपर्क साधून पाणी सोडण्याबाबतचा आग्रह धरला.सर्व स्तरावर झालेल्या चर्चेनंतर मुश्रीफ यांनी २३ आॅगस्ट रोजी गोदावरी समूह, भंडारदरा प्रकल्पातून खरीप आवर्तन सुरू करावे, असे निर्देश जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. त्यानुसार मुख्य अभियंता लोखंडे व अधीक्षक अभियंता पोकळे यांनी कार्यकारी अभियंता बाफना व कोळी यांना आवर्तनाबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. शिष्टमंडळात विखे कारखान्याचे अध्यक्ष डॉ. भास्करराव खर्डे, अण्णासाहेब कडू, संचालक शांतीनाथ आहेर, बन्सी तांबे, रमेश मगर, गीताराम तांबे, रघुनाथ बोठे, रावसाहेब देशमुख, उपनगराध्यक्ष संजय सदाफळ, माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ, दीपक तुरकणे आदींचा समावेश होता. (प्रतिनिधी)