शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

चाकणकरांच्या बहिणीची ८ तास चौकशी, ६० कोटींच्या उलाढालीवर म्हणाल्या, " बातमी कळली तेव्हा..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:41 IST

खरात प्रकरणात रूपाली चाकणकरांच्या बहिणीची पोलिसांकडून ८ तास चौकशी करण्यात आली.

Ashok Kharat Case: भोंदू अशोक खरात याने अनेकांच्या नावाने पतसंस्थांमध्ये बोगस खाते उघडून मोठी उलाढाल केली आहे. यातील ६० कोर्टीच्या संशयास्पद व्यवहारांबाबत अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) पथकाने सोमवारी समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत धडक दिली. दुसरीकडे, शिर्डी पोलिसांनी या प्रकरणातील संशयित खातेदार प्रतिभा चाकणकर आणि तन्मय चाकणकर यांची तब्बल आठ तास चौकशी केली.

समता पतसंस्थेत अशोक खरात नॉमिनी असलेल्या बनावट खात्यांच्या प्रकरणाचा तपास आता केंद्राच्या यंत्रणेकडे सरकला आहे. सोमवारी सकाळी ईडीचे पथक समता पतसंस्थेच्या राहाता शाखेत तपासणीसाठी दाखल झाले होते. बँकेचे व्यवस्थापक आणि महत्त्वाच्या कागदपत्रांची दिवसभर तपासणी सुरू होती. केवळ बँकच नव्हे, तर नाशिक जिल्ह्यातील मिरगाव येथील अशोक खरातच्या ईशानेश्वर मंदिर परिसरातील फार्म हाऊसवरही ईडीने तपासणी केल्याची माहिती आहे. या प्रकरणात शिर्डीतील काही बड्चा व्यक्तींचीही चौकशी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिस तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, ५७ खातेदारांच्या नावाने तब्बल १०० बोगस खाती दोन पतसंस्थांत उघडण्यात आली होती. या सर्व खात्यांवर भोंदू खरात याचेच नॉमिनी म्हणून नाव होते. व्यवहारांसाठी वापरला जाणारा मोबाइल क्रमांकही खरातचाच होता. या संशयास्पद खात्यांमधून आतापर्यंत सुमारे ६० कोटी रुपयांची उलाढाल झाल्याचे उघड झाले आहे. रूपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा यांच्याही नाते खाते आहे. त्यामुळे शिर्डी पोलिसांनी प्रतिभा चाकणकर आणि त्यांचा मुलगा तन्मय चाकणकर यांचा जबाब नोंदविला. यावेळी चाकणकर यांच्या वकील जयश्री काळे-पालवे उपस्थित होत्या. पोलिसांनी शासकीय पंचांसमोर चाकणकर यांच्या सह्यांचे नमुने घेतले. चौकशीनंतर माध्यमांशी बोलताना चाकणकर म्हणाल्या, त्यांनी कधीही समता पतसंस्थेत खाते उघडलेले नाही किंवा तेथे त्या गेलेल्या नाहीत. खात्यावर दिलेला पत्ताही चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत ३५ खातेदारांची चौकशी झाली असून, सर्वांनीच आपली फसवणूक झाल्याचा पाढा वाचला आहे. अशोक खरातने देवदर्शनाच्या बहाण्याने आधार व पॅन कार्डसारखी कागदपत्रे घेतली होती. त्या आधारे त्याने परस्पर खाती उघडली आणि पॅन कार्डवरील सह्या बघून हुबेहूब बनावट सह्या केल्याचे सांगण्यात येते.

अमोल भारती नाशिकमध्ये तळ ठोकून 

अपर पोलिस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक रणजित गलांडे व उपनिरीक्षक निर्वात जाधव यांनी ही चौकशी पूर्ण केली. या प्रकरणासाठी नेमलेल्या एसआयटी पथकातील पोलिस उपअधीक्षक अमोल भारती आपल्या टीमसह सध्या नाशिकमध्ये तळ ठोकून आहेत.

"आमच्या नावाने असलेली पतसंस्थेतील खाती बनावट आहेत. तेथे आमच्या सह्या नाहीत. एकही रुपयाची आम्ही उलाढाल केलेली नाही. समता पतसंस्थेत आमचे खाते आहे, हे आम्हाला बातम्यांतून कळले. पोलिसांची नोटीस मिळालेली नाही. पोलिस तपास करत आहेत. फसवणुकीबाबत गुन्हा दाखल करायचा की नाही, ते नंतर सांगू," अशी प्रतिक्रिया प्रतिभा चाकणकर यांनी दिली.

English
हिंदी सारांश
Web Title : Chakankar's sister questioned for 8 hours in fraud case.

Web Summary : Ashok Kharat's fraudulent activities, involving bogus accounts and a 60-crore turnover, led to investigations of Pratibha Chakankar and her son. Chakankar denies opening accounts and claims her details were misused. Police are investigating widespread fraud across multiple accounts.
टॅग्स :Ashok Kharatअशोक खरातCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस