शहरं
Join us  
Trending Stories
1
शानदार.. जबरदस्त.. अफलातून..!! ५० षटकांत तब्बल ८२२ धावा; चौकार-षटकारांचा तर हिशेबच नाही...
2
खळबळजनक! मुंबईच्या जे. जे. रूग्णालयात निवासी डॉक्टरने उचललं टोकाचं पाऊल, नेमकं असं काय घडलं?
3
सुनेत्रा पवार गुवाहाटीत; कामाख्या देवीचे दर्शन, अजितदादांचा वारसा देशभरात नेण्याचा निर्धार
4
सांगली हादरली! मंदिराची भिंत कोसळून सहा ठार, ८ जण जखमी; मृतांमध्ये दोन मुलांचा समावेश
5
राज्य विमा योजनेच्या रुग्णालयांमधील आरोग्य सुविधांचा लाभ प्रत्येक कामगारापर्यंत पोहोचवा!
6
टीम इंडिया T20 पाठोपाठ वनडे मध्येही नंबर १ ! पाकिस्तानला मोठा धक्का, कोण कुठल्या स्थानी?
7
सुनेचे तोकडे कपडे अन् 'रीलबाजी'! सासू-सासऱ्यांनी उचललं टोकाचं पाऊल; वाचा धक्कादायक कारण
8
२ राजयोगत अपरा एकादशी २०२६: ७ राशींना अनुकूल काळ, अडचणी संपतील; चांगला लाभ, भरघोस भरभराट!
9
IPL वंडर बॉय वैभव सूर्यवंशीचा ‘मास्टरशेफ’ अवतार; किचनमधील व्हिडिओ व्हायरल
10
Petrol Diesel Rate: पेट्रोल-डिझेल महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार? केंद्र सरकारचे मोठे संकेत
11
Vistadome सुपरहिट, प्रवाशांचा १०० टक्के प्रतिसाद; ‘इतके’ कोटी कमावले, प्रवासाचा सुखद अनुभव!
12
WTC 2025-27 Points Table : बांगलादेशचा पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय! टीम इंडिया फायद्यात; ते कसं?
13
सावधान! ९९% लोकांना टरबूज खाण्याची योग्य पद्धतच माहीत नाही; डॉक्टरांनी सांगितलेल्या 'या' ३ चुका पडू शकतात महागात
14
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
15
मध्यमवर्ग त्याग करायला तयार आहेच, पण डझनभर गाड्यांचा ताफा...; जयंत पाटील यांची टिप्पणी
16
“२२ लाख विद्यार्थ्यांची स्वप्ने धुळीला मिळाली”; NEET 2026 परीक्षा रद्द, राहुल गांधी संतापले
17
Top Marathi News LIVE Updates: सोलापूर शहरातील विविध भागात पाऊस सुरू, अचानक आलेल्या पावसानं धावपळ
18
“NEET पेपर लीक करणारे मोकाट, सरकारला एक परीक्षाही घेता येत नाही का?”: हर्षवर्धन सपकाळ
19
"सौंदर्यासाठी नाही, तर मी पैशांसाठी तुझ्याशी लग्न केलं"; नवरा झाला हैवान, बायकोचा घेतला जीव
20
मुख्यमंत्री विजय यांचा मोठा निर्णय! आपल्या खास ज्योतिष्याला बनवलं थेट 'OSD'
Daily Top 2Weekly Top 5

दरवर्षी वृक्ष लागवड मात्र संगाेपनाकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:15 IST

करंजी : पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांमध्ये दरवर्षी वनविभाग मार्फत लाखो झाडांचे रोपण करण्यात येते. मात्र त्याच्या संवर्धनाची व जंगलाची ...

करंजी : पाथर्डी तालुक्यातील गर्भगिरी डोंगररांगांमध्ये दरवर्षी वनविभाग मार्फत लाखो झाडांचे रोपण करण्यात येते. मात्र त्याच्या संवर्धनाची व जंगलाची काळजी न घेतल्याने शासनाच्या लाखो रूपयांचे दरवर्षी नुकसान होत आहे.

पाथर्डी तालुक्यातील करंजीसह परिसरात गर्भगिरी डोंगरावर दरवर्षी हजारो वृक्षांची लागवड केली जाते. गेल्या १० वर्षांपासून या भागात ही वृक्ष लागवड केली जाते. फक्त शासनाच्या आदेशानुसार दरवर्षी लागवड करायची आणि त्याच्या संवर्धनाची जबाबदारी घ्यायचीच नाही, असा एककलमी कार्यक्रम वनविभाग राबवत आहे. त्यामुळे शासनाचे दरवर्षी लाखो रूपयांचे नुकसान होत आहे. यावर्षी उन्हाळ्यात गर्भगिरी डोंगरास दोन वेळा आग लागून शेकडो हेक्टर क्षेत्र त्यात जळून भस्मसात झाले. दोन वेळा लागलेल्या आगीत मोठ-मोठी वृक्ष जळून खाक झाली.

दरवर्षी करंजीसह परिसरातील दगडवाडी, वैजूबाभूळगाव, पवळवाडी, खंडोबावाडी, श्री क्षेत्र वृद्धेश्वरच्या डोंगरात वृक्ष लागवड केली जाते. किती वर्ष वनविभाग वृक्ष लागणार असल्याचा सवाल वृक्षप्रेमींतून विचारला जात आहे.

दरवर्षी लागवड करण्यापेक्षा आहेत त्या झाडांचे संगोपन तसेच आगीपासून संरक्षण करण्याची दक्षता घ्यावी, अशी मागणी या भागातील सागर कराळे, तुळशीदास शिंदे, महेश शिंदे, रामनाथ शिंदे, जालिंदर पवार, नवनाथ, उद्धव शिंदे, अनिल शिंदे, विशाल कराळे, योगेश शिंदे, उमेश शिंदे, देविदास शिंदेसह अनेक वृक्षप्रेमींनी केली आहे.

----

करंजीसह दगडवाडी, पवळवाडी, खंडोबावाडी, वैजूबाभळगाव परिसरात दरवर्षी वनविभागामार्फत वृक्ष लागवड केली जाते. मात्र त्याचे संवर्धन न केल्याने शासनाचा खर्च वाया जातो.

-सागर कराळे,

वृक्षमित्र, दगडवाडी