शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
2
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
3
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
4
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
5
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
6
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
7
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
8
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
9
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
10
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
11
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
12
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
13
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
14
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
15
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
16
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
17
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
19
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
20
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
Daily Top 2Weekly Top 5

नगरपंचायतीत पारनेरकरांची ‘आहे रे, नाही रे’ भूमिका

By admin | Updated: June 4, 2014 00:13 IST

विनोद गोळे, पारनेर ग्रामपंचायतमधील सत्ताधार्‍यांनी घरपट्टी वाढीचा मुद्दा घेऊन नगरपंचायतीला विरोध केला आहे तर विरोधकांनी नगरपंचायतीमुळे गावाचा विकास होण्याच्या आशेने समर्थन केले.

विनोद गोळे, पारनेर ग्रामपंचायतमधील सत्ताधार्‍यांनी घरपट्टी वाढीचा मुद्दा घेऊन नगरपंचायतीला विरोध केला आहे तर विरोधकांनी नगरपंचायतीमुळे गावाचा विकास होण्याच्या आशेने समर्थन केले. हा वाद फक्त ग्रामपंचायत पातळीवर सुरू असताना ज्यांच्यासाठी नगरपंचायत होणार आहे ते पारनेरमधील ग्रामस्थ यात सकारात्मक नाही व नकारात्मकही नाहीत, अशी ‘ आहे रे नाही रे’, अशी भूमिका दाखवत आहेत. राज्य शासनाने तालुकास्तरावर नगरपंचायत व नगरपरिषदेचा निर्णय घेतला.यामध्ये पारनेरमध्ये नगरपंचायत होणार आहे. यासंदर्भातच्या हरकती जिल्हाधिकार्‍यांनी मागितल्यावर सरपंच अण्णासाहेब औटी, उपसरपंच नंदू देशमुख यांनी ग्रामस्थांच्या सह्या गोळा करून सध्या पारनेरला नगरपंचायत नको, अशी भूमिका घेतली आहे तर राष्ट्रवादीचे युवक तालुकाध्यक्ष दीपक नाईक, योगेश मते, आर.डी.औटी, बाळासाहेब मते व इतरांनी नगरपंचायतीचे समर्थन केले आहे. नगरपंचायतीसाठी आयोजित ग्रामसभेस एकशे सोळा ग्रामस्थांची उपस्थिती होती. तरूण, व्यावसायिक, शिक्षक, प्राध्यापक व इतर गटातील ग्रामस्थांनी सभेसकडे पाठ फिरविली. शहराचा विकासात्मक बदल घडवणारी परंतु कराचा बोजा पारनेरकरांच्या खांद्यावर जादा टाकणारी नगरपंचायत व्हावी किंवा होऊ नये यासाठी सरपंच, उपसरपंच व दोन, तीन जणच विरोध अथवा समर्थन करीत आहेत हे चित्र पारनेरसारख्या संघर्षशील गावाला शोभणारे नाही. करांचा बोजा वाढेल याची काळजी फक्त सरपंच, उपसरपंचांना नाही तर ती संपूर्ण गावाला असायला पाहिजे किंवा विकास होणार असेल तर गावाचाच होणार आहे यासाठी नगरपंचायत व्हावी, असेही गावकरी म्हणण्यास तयार नाही. आमदारांची भूमिका गुलदस्त्यात सध्या नगरपंचायतीच्या चालू असलेल्या घडामोडीत आमदार विजय औटी यांची भूमिका गुलदस्त्यातच आहे. पारनेर मतदारसंघाचे अस्तिव कायम ठेवण्याचा इतिहास आमदारांनी घडविला आहे तर बंद पडलेला पारनेर कारखाना त्यांनीच लढा देऊन सुरू केला. ही जमेची बाजू असताना पारनेर येथे नगरपंचायतीला विरोध करणे ही त्यांच्यादृष्टीने किरकोळ बाब आहे. त्यांचा नगरपंचायतीला विरोध असता तर त्यांनी ग्रामस्थांच्या एक पाऊल पुढे जाउन आतापर्यंत विषय संपवून टाकला असता ही त्यांची कार्यपध्दती सर्वपरिचित आहे. नगरपंचायतीबाबत ग्रामपंचायत व ग्रामस्थ किती जागरूक आहेत याची परीक्षा त्यांनी घेतली हे यातून उघड दिसते. त्यांची भूमिकाही आता महत्वपूर्ण ठरणार आहे.नगर पंचायतीचे फायदे नगरपंचायतीला स्वतंत्र मुख्याधिकारी असणार, विविध विकास कामांसाठी निधी, नगरपंचायतचे पदाधिकारी व प्रशासनच निर्णय घेणार, नगरोत्थान योजनेतून दरवर्षी ७५ लाख, दलित वस्तीसुधारणा ५० लाख, पाणीपुरवठा योजना, नियमन १५ लाख, इतर समाजाच्या वस्तीसुधारणा वीस लाख, अल्पसंख्यांक समाज वस्ती सुधारणा १० लाख व रस्त्यांसाठी ५० लाख असा निधी मिळणार. पारनेर शहर, वाड्या,वस्त्यांसह परिसरासाठी कितीही किलो मीटरवरून पाणी योजना करण्यासाठी कोट्यवधींचा निधी, वाडया,वस्त्यांवरील घरपट्टी कमी राहणार.नगर पंचायतीचे तोटे पाणीपट्टी, घरपट्टी भरमसाठ वाढणार, व्यापारी संकुले, भाडेतत्वावरील घरांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या एकवीस टक्के घरपट्टी आकारणार, यामध्ये अग्निशमन कर, वृक्ष कर, रोहयो कर, शिक्षण कराचा समावेश. गावातील प्रसिध्द भागानुसार घरपट्टीचा स्तर उदा. शाळा,महाविद्यालय, बसस्थानक, मुख्य बाजारपेठ या परिसरात राहणार्‍यांना अधिक घरपट्टी लागणार. करामधील सात टक्के निधी सरकारला द्यावा लागणार.