शहरं
Join us  
Trending Stories
1
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
2
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
3
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
4
Top Marathi News LIVE Updates: "दादांच्या अंत्यविधीच्या दिवशी १६ कोटी दिले"; रोहित पवारांचा 'व्हीएसआर' कंपनीवरून सरकारवर हल्ला
5
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सिक्कीमच्या तरूणांसोबत खेळला फुटबॉल, PHOTOSची रंगली चर्चा
6
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
7
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
8
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
9
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
10
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
11
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
12
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
13
Mutual Fund Redemption Rules: काय आहे FIFO नियम आणि तो कसा वाचवतो तुमचा टॅक्स? जाणून घ्या डिटेल्स
14
बिर्याणीनंतर कलिंगड खाल्ल्याने झाला 'त्या' चार जणांचा मृत्यू? पोस्टमार्टेम रिपोर्टमधून समोर आलं खरं कारण
15
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
16
Chanakya Niti: समाजात राजासारखा मान हवा? चाणक्यनीतीतल्या 'या' ५ सवयी तुमचं आयुष्य बदलतील!
17
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
18
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
19
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
20
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे

By admin | Updated: June 26, 2023 14:47 IST

अहमदनगर : युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे आहे़ एकीकरण घडविणार्‍या श्रीकृष्णांचे अनुयायी बना, असे आवाहन प़पू़ प्रवीणऋषी महाराज यांनी रविवारी येथे केले़

 अहमदनगर : युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे आहे़ लढाईस प्रवृत्त करणार्‍या शकुनीमामाला साथ देऊन परिणामांना सामोरे जाण्यापेक्षा एकीकरण घडविणार्‍या श्रीकृष्णांचे अनुयायी बना, असे आवाहन प़पू़ प्रवीणऋषी महाराज यांनी रविवारी येथे केले़ स्टेशन रस्त्यावरील गुरूभक्त सथ्था कॉलनी येथे चांदीबाई मुनोत मेमोरियल सभागृहात सुरू झालेल्या महावीरगाथा सोहळ्यात प्रवचन पुष्प गुंफताना ते बोलत होते़ राजेंद्र चोपडा, आनंदराम मुनोत, माणकचंद गुगळे, तलकसी सावला, रतिलाल गुगळे, अमृतलाल चंगेडिया आदींसह भाविक यावेळी उपस्थित होते़ पुण्य संचयनातून गुरू अपेक्षा न करता मिळतात,याची प्रचिती येते़भगवान श्रीकृष्ण व शकुनी या दोघांनी मामाच्या भूमिका पार पाडल्या आहेत़शकुनी मामा स्वत: लढले नाहीत़ त्यांनी कू टनितीने लढाई घडविली़ मात्र श्रीकृष्ण मामाने रणांगणात उतरुन साथ दिली़ त्यामुळे युध्दापेक्षा एकीकरण महत्वाचे असून,शकुनी मामा नसते तर महाभारतच घडले नसते़ राजमाता कैकयीने दासीचे ऐकले नसते तरी बदनाम झाली नसती़ पूर्वी राजवाड्यामध्ये कोपभवन असायचे़ मन आजारी पडल्यास कोपभवनमध्ये उपचार व्हायचे़ मनातील घाण काढण्यासाठी कोपभवन महत्वाचे होते़ आजच्या आधुनिक युगात घरात कोपभवन राहिले नाही़ त्यामुळे मनावर उपचार होत नाही़मनावर उपचार न होण्याचे काय परिणाम होतात,ते सर्वांसमोर आहे़घरातील प्रमुख मजबूर झाल्यास घराची सर्वनाशाच्या दिशेने वाटचाल होते़मजबूर होऊन कोणतेही समाधान मिळत नाही़घरात शांती व समाधान राहण्यासाठी एकमेकांशी आढेवेढे न घेता सरळ बोला,असा सल्ला प्रवीणऋषी महाराज यांनी यावेळी दिला़ जोपर्यंत गुलामी चेहर्‍यावरून हटत नाही तोपर्यंत राजसिंहासनावर बसण्याचा अधिकार नाही़ दुर्भाग्याच्या घटना जेव्हा घडतात़ तेव्हा खुर्चीवर बसणारा राजा गुलाम असतो़ जे शासन चालविण्यास योग्य नाही़ त्यांना शासक करणार्‍या संघाला प्रायश्चित घ्यावे लागते़ मनमोहनसिंग यांच्या लक्षात हे आले असते तर त्यांचे हाल झाले नसते, असे उदाहरण त्यांनी यावेळी दिले़ (प्रतिनिधी)