शहरं
Join us  
Trending Stories
1
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
2
एका दुखापतीने संपवलं करियर.. अवघ्या ३०व्या वर्षी क्रिकेटपटूला करावी लागली निवृत्तीची घोषणा
3
Top Marathi News LIVE Updates: रिक्षा-टॅक्सी चालकांच्या 'मराठी सक्ती'ला मुदतवाढ?, १ मेचा मुहूर्त टळण्याची शक्यता
4
भारत-न्यूझीलंडमध्ये ऐतिहासिक 'मैत्री'! ५००० भारतीयांना थेट नोकरीची संधी, मोठे फायदे कोणते?
5
चिंताजनक! महाराष्ट्राला टीबीचा विळखा; राज्यात तब्बल ११ हजार गावांना हाय अलर्ट!
6
Gold-Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या दरात बदल; पटापट चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K आणि १८K Gold चे नवे दर
7
घरात मोबाइल नेटवर्क मिळणे झाले कठीण; इमारतींना ‘डिजिटल रेटिंग’ देण्याचा ‘ट्राय’चा निर्णय
8
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातने पीडितेला दिली दैवी शक्तीने मुलांना ठार मारण्याची धमकी
9
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
10
TCS मधील धर्मांतर प्रकरणात धक्कादायक खुलासा; पीडितेचं नाव बदललं, मलेशियासह मालेगाव कनेक्शन
11
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
12
'सैराट'फेम अभिनेता 'राजा शिवाजी'मध्ये झळकणार, रितेशसोबत फोटो पोस्ट करत म्हणाला...
13
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
14
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
15
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
16
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
17
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
18
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
19
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
20
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धडधड वाढते ठोक्यात!

By admin | Updated: June 26, 2023 13:21 IST

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते यांची धडधड वाढली आहे.

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीचा निकाल आता चार दिवसांवर येऊन ठेपला आहे. त्यामुळे उमेदवार आणि कार्यकर्ते यांची धडधड वाढली आहे. कोण निवडून येणार? अशा पैजा लावणार्‍यांना ‘आता थोडी कळ काढा’, असा सल्ला मिळत आहे. त्यामुळे निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १७ एप्रिलला मतदान झाले होते. तब्बल एक महिन्यानंतर निकालाची सर्वांनाच प्रतिक्षा लागली होती. अखेर ती सोळा मेची तारीख चार दिवसांवर येऊन ठेपली आहे. मतदान झाल्यानंतर आठ दिवस कोण निवडून येणार याच्या चर्चा रंगल्या होत्या. अनेकांच्या पैजाही लागल्या होत्या,तर सट्टा बाजारातही मोठी उलाढाल झाली होती. तीच तीच चर्चा रंगत असल्याने कोण निवडून येणार याच्या चर्चाही थंडावल्या होत्या. उमेदवार, कार्यकर्ते आपापल्या कामात गुंतले होते. आता पुन्हा त्यांना निकालाची प्रतिक्षा लागली असून चार दिवसांवर निकाल येऊन ठेपल्याने निकालाचे काऊंटडाऊन सुरू झाले आहे. उमेदवारांची विश्रांती! उमेदवारांनीही मतदान ते निकाल या काळात सार्वजनिक कार्यक्रमांपेक्षा घरी विश्रांतीच घेणे पसंत केले. काही उमेदवार पर्यटनासाठी निघून गेले होते. मतदान झाल्यानंतर सार्वजनिक कार्यक्रमासाठी उमेदवार येत होते, मात्र त्यांना नागरिक भेटून कोण निवडून येणार?अशी थेट विचारणाही करीत होते. त्यामुळे सार्वजनिक कामांमध्ये न जाणेच उमेदवारांनी पसंत केले होते. आता हे उमेदवार थेट मतमोजणीच्या दिवशी मतमोजणी केंद्रावर प्रकटणार आहेत.