शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2025 06:39 IST

हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पथकाने २५ एप्रिल रोजी  मे. खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनवर छापा टाकला.

अहिल्यानगर : येथील अन्न, औषध प्रशासनाच्या पथकाने नागापूर एमआयडीसी येथील एका गोडाऊनवर छापा टाकून ६२ लाख रुपये किमतीचा बनावट बासमती तांदूळ जप्त केला आहे. जप्त केलेला तांदूळ व त्यासाठी वापरलेल्या केमिकलचे नमुने प्रयोगशाळेत पाठविले आहेत.

  हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल. पथकाने २५ एप्रिल रोजी  मे. खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनवर छापा टाकला. यावेळी तेथे साध्या तांदळाला केमिकल पावडर लावून सुगंध निर्माण केला जात होता. हा तांदूळ खुशी गोल्ड नावाच्या पिशव्यांमध्ये पॅकिंग केला जात हाेता.

अन्न, औषध प्रशासनाच्या पथकाने अन्न, औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सोपान इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली  एमआयडीसी येथील खुशी इंडस्ट्रीच्या गोडाऊनमध्ये छापा टाकला.

‘ते’ केमिकल कोणते?

बासमती तांदळाला नैसर्गिक सुगंध असतो. या सुगंधावरून ग्राहक बासमती तांदूळ ओळखतात. साध्या तांदळाला असाच सुगंध येण्यासाठी एमआयडीसी येथील गोडाऊनमध्ये तांदळाला केमिकल लावले जात होते. हे केमिकल कोणते होते आणि ते शरीरासाठी किती घातक आहे हे प्रयोगशाळेच्या अहवालानंतर स्पष्ट होईल.

ताब्यात घेतलेले नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले

असून तेथील अहवाल आल्यानंतर याप्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार असल्याचे अन्नसुरक्षा अधिकारी राजेश बडे यांनी सांगितले.