शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
2
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
3
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
4
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
5
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
6
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
7
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
8
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
9
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
10
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
11
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
12
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
13
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
14
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
15
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
16
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
17
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
18
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
19
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
20
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद सदस्यावर दगडाने हल्ला, युवक पसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 6, 2021 05:00 IST

राहुल जनार्दन सूर (३५) रा. मारेगाव असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अनिल देरकर हे त्यांचे मावसभाऊ मंगेश भाऊराव सूर यांच्याकडे दिवाळीनिमित्त फराळासाठी गेले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांसोबत ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता,  त्या परिसरात दबा धरून असलेल्या राहुलने अचानक एक मोठा दगड काही कळायच्या आत अनिल देरकर यांच्या डोक्यात घातला. लगेच त्याने दुसराही दगड देरकरांकडे भिरकावला. तो दगड देरकर यांच्या पायाला लागला.

लोकमत न्यूज नेटवर्कमारेगाव : वेगाव-बोटोणी गटाचे काँग्रेसचेजिल्हा परिषद सदस्य अनिल जनार्दन देरकर यांच्यावर शुक्रवारी सकाळी वेगाव येथे एका युवकाने दगडाने जबर हल्ला केला. यात ते गंभीर जखमी झाले आहे. पुढील उपचारासाठी त्यांना चंद्रपूर येथे हलविण्यात आले असून घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी हल्लेखोराला तत्काळ अडविल्याने मोठा अनर्थ टळला. हल्लेखोर युवक घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. राहुल जनार्दन सूर (३५) रा. मारेगाव असे हल्लेखोर युवकाचे नाव आहे. शुक्रवारी सकाळी अनिल देरकर हे त्यांचे मावसभाऊ मंगेश भाऊराव सूर यांच्याकडे दिवाळीनिमित्त फराळासाठी गेले होते. फराळ केल्यानंतर काही लोकांसोबत ते घराकडे जाण्यासाठी निघाले असता,  त्या परिसरात दबा धरून असलेल्या राहुलने अचानक एक मोठा दगड काही कळायच्या आत अनिल देरकर यांच्या डोक्यात घातला. लगेच त्याने दुसराही दगड देरकरांकडे भिरकावला. तो दगड देरकर यांच्या पायाला लागला. हल्लेखोर पुन्हा दगड मारण्याच्या तयारीत असताना घटनास्थळी उपस्थित काही नागरिकांनी पुढे येऊन आरोपीला अटकाव करून पकडण्याचा प्रयत्न केला असता,  त्याने घटनास्थळावरून पळ काढला. यावेळी घटनास्थळी उपस्थित असलेले अनिल कळसकर, किसन डोये, मंगेश सूर यांनी जखमी अनिल देरकर यांना तत्काळ मारेगावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात अनिल देरकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून सात टाके लावण्यात आले आहेत. त्यांच्या पायालाही गंभीर दुखापत झाली आहे. मारेगाव येथे प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे हलविण्यात आले आहे. दरम्यान, याप्रकरणी शुक्रवारी सायंकाळी उशिरा मारेगाव पोलिसांनी आरोपी राहुल जनार्दन सूर याच्याविरुद्ध भादंवि कलम ३०७ नुसार गुन्हा दाखल केला. मात्र आरोपी अद्याप फरार आहे. 

 

टॅग्स :zpजिल्हा परिषदcongressकाँग्रेस