शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मुस्लिमांमध्ये राष्ट्रवादी नेता सापडणे कठीण...!"; दत्तात्रेय होसबळे यांचं मोठं विधान, कारणही सांगितलं!
2
ICC Test Rankings : या वर्षांत एकही टेस्ट न खेळता बुमराह ठरला बेस्ट! यशस्वी गिलही फायद्यात
3
खरा मित्र… रशियाने पुन्हा सिद्ध केले, गॅरंटी दिली, “काही होऊ दे, भारताचे नुकसान करणार नाही”
4
परदेश दौरे बंद अन् ताफा अर्ध्यावर; मुख्यमंत्र्यांचे कडक आदेश, मंत्री-अधिकारी एक दिवस बस-मेट्रोने फिरणार
5
PM मोदींच्या आवाहनाचा परिणाम! इंधन बचतीसाठी सुवेंदू अधिकारी यांचाही पुढाकार; DGP ना दिला मोठा आदेश
6
Top Marathi News Live: नाशिक: भोंदू अशोक खरातविरुद्ध SITकडून दोषारोपपत्र न्यायालयात दाखल
7
नाशिक कुंभमेळ्याचा 'महाप्लॅन' तयार; प्रत्येक आखाड्याला ५ कोटींचा निधी- एकनाथ शिंदे
8
नरेंद्र मोदींचा कृतीतून संदेश! पंतप्रधानांच्या ताफ्यात फक्त दोन कार, राजधानी दिल्लीतील व्हिडीओ व्हायरल
9
“नेपाळ-बांगलादेशप्रमाणे GenZ ने भारतातही रस्त्यावर उतरायला हवे”; केजरीवाल असे का म्हणाले?
10
PM मोदींचे आवाहन सकारात्मकतेने घेणं गरजेचं, विरोधकांनी थट्टा करू नये- मुख्यमंत्री फडणवीस
11
“जो सामील असेल, त्यावर कारवाई व्हायला हवी”; NEET पेपर लीक प्रकरणी CM फडणवीसांनी केले स्पष्ट
12
Travel : लडाखमध्ये इंजिन बंद असूनही गाड्या आपोआप चढतात डोंगर; या 'मॅग्नेटिक हिल'चं रहस्य काय?
13
विराटकडून प्रेरणा; आईच्या मार्गदर्शनाखाली फिटनेस स्तर उंचावला! IPL गाजवणाऱ्या साईची खास गोष्ट
14
भयंकर! फक्त एका लिंबूसाठी १२ वर्षांच्या मुलाची हत्या; संतप्त जमावाकडून पोलिसांवर दगडफेक
15
PM मोदी म्हणाले, १ वर्ष सोनं खरेदी करू नका; पण चांदीबद्दल काहीच का नाही बोलले? दर वर्षी किती चांदी खरेदी करतो भारत?
16
इराणचा 'डर्टी बॉम्ब'! एका स्फोटात शहरं होतील ओसाड; अमेरिकन नौदलाला हाय अलर्ट
17
देश मजबूत करू, PM मोदींना साथ देऊ! मुंबईकर आमदारांचा गोवा तेजस एक्स्प्रेसने प्रवास; म्हणाले…
18
STचे प्रवाशांसाठी मोठे पाऊल! १ जूनपासून सर्व स्वच्छतागृहे मोफत; प्रताप सरनाईकांची घोषणा
19
वर्दीतील देवदूत! हायवेवर Heart Attack आलेल्या चालकाचे वाचवले प्राण; इंटरनेटवर कौतुकाचा वर्षाव
20
पती हरवल्याची तक्रार घेऊन पोलीस ठाण्यात आली; तपास सुरू झाला, समोर आले पत्नीचे दोन आशिक अन्.. 
Daily Top 2Weekly Top 5

यवतमाळचे सीताफळ गुजरातला

By admin | Updated: January 9, 2017 02:08 IST

जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या छोट्याशा गावातील सीताफळ महाराष्ट्रातील प्रमुख

पॅकिंगवर बळीराजाची मोहर : मुख्यमंत्र्यांनीही घेतली दखल
यवतमाळ : जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील गणोरी या छोट्याशा गावातील सीताफळ महाराष्ट्रातील प्रमुख शहरांसह आता गुजरातपर्यंत पोहचले आहे. या सीताफळाच्या पॅकींगवर बळीराजा चेतना अभियानाच्या लोगोची मोहर उमटली आहे. विशेष म्हणजे या सीताफळाची दखल मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनीही घेतली. पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी या वाणाची पाहनी करण्यासाठी यवतमाळच्या दिशेने आगेकूच केली आहे.
बाभूळगाव शहरापासून ८ ते १० किमी अंतरावर असलेल्या गणोरी गावात शरदचंद्र उत्तरवार यांनी सीताफळाची लागवड केली. पूर्वी ही जमीन पडीत होती. कुठलेही पीक या ठिकाणी घेतले जात नव्हते. विशेष म्हणजे या भागात पाणी नाही. दोन विहिरी आणि दोन बोअरवेल केल्या नंतरही पुरेसे पाणी पिकांना मिळणे अवघड बाब आहे. कमी पाण्यात बागायती पीक घेण्यासाठी त्यांनी अभ्यास केला. आणि सीताफळाची निवड केली.
मात्र यासाठी शेतकऱ्यानेच विकसीत केलेले वान त्यांनी शेतात लावले. सीताफळाचे हे वान पंढरपुरमधील बार्शी येथून त्यांनी आणले आहे. तीन एकरात एक हजार झाडांची लागवड केली. हे सीताफळ कमी बिया आणि अधिक मगस असणारे आहे. साधारणत: पाचशे किलोग्रॅम वजनाचे एक सीताफळ आहे. पारंपरीक सिताफळातील ही विकसीत जात आहे. यामुळे या सिताफळाला राज्यभरातून मोठी मागणी होत आहे.
नागपूर, पुण, नाशिक आणि गुजरात मधील सुरतपर्यंत हे सिताफळाचे वान पोहचले आहे. या सिताफळाला ग्राहकाची चांगली पसंती लाभली आहे. मागणी अधिक आणि पुरवठा कमी अशी सध्या त्यांची परिस्थिती आहे. मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यवतमाळ दौऱ्यावर आले असताना त्यांनी या सिताफळाची पाहणी केली, यावेळी त्यांनी उत्तरवारांचे कौतुक केले. विशेष म्हणजे कमी पाण्यात येणारे वान असल्याने कृषी विभागाला या संदर्भात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या.
उत्तरवार यांनी सिताफळाचे पॅकिंग तयार केले आहे. त्याला बळीराजा चेतना अभियानाचा लोगो लावला आहे. या आकाराने मोठे आणि मगसदार सिताफळाने बाजारात एक वेगळ स्थान मिळविले आहे. या पिकाला वन्यप्राणी किंवा पक्षी खात नाही तसेच कुठल्याही पाणी टंचाईचा फटका बसत नाही. यामुळे हे फळपिक अकृषक क्षेत्रातही किफायदशीर ठरणारे आहे. उत्तरवार यांना या एक हजार झाडांपासून जवळपास चार लाखांचे उत्पादन झाले आहे.
यासोबतच त्यांनी पाच एकरात मोसंबिची बाग लावली आहे. इतर क्षेत्रात ते पारंपरीक पीक घेत आहेत. काळानुसार होणारे बदल आणि नावीन्यपूर्ण शेतीच्या प्रयोगातून समृद्धी शक्य असल्याचे मत त्यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केले आहे.
(शहर वार्ताहर)