शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

एसटीचा 37 हजार किलोमीटरचा प्रवास पुन्हा कधी सुरू होणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, त्यासाठी एसटी महामंडळाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या अनेक एसटी बस धावत असताना मधेच बंद पडतात.

लाेकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसला कोरोनासह संपाचेही ग्रहण लागले आहे. यातून एसटीचा प्रवास कसाबसा सुरू झाला. मात्र, अजूनही ३७ हजार किलोमीटरचा प्रवास एसटीला गाठायचा आहे. कोरोनापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात दर दिवसाला एसटी महामंडळ एक लाख ५२ हजार १८५ किलोमीटरचा प्रवास करीत होते. सध्या हा प्रवास एक लाख १५ हजार १५५ किलोमीटरपर्यंत मर्यादित राहिला आहे. ३७ हजार ३० किलोमीटरचा प्रवास गाठल्यानंतर पूर्वीची स्थिती प्राप्त होईल. मात्र, त्यासाठी एसटी महामंडळाला मोठे प्रयत्न करावे लागणार आहेत. सध्या अनेक एसटी बस धावत असताना मधेच बंद पडतात. त्यातील बिघाड आणि विविध अडचणी याचा सामना महामंडळाच्या बस करीत आहेत. याशिवाय वेळ निश्चित नसल्याने अनेक प्रवासी खासगी वाहनानेदेखील प्रवास करीत आहेत.

खासगी प्रवासाने विद्यार्थी अडचणीत -    शिक्षणाच्या प्रवाहात विद्यार्थ्यांना टिकवून ठेवण्यासाठी मानव विकास मिशनच्या बसेस मोलाची भूमिका बजावून गेल्या आहे.-    या बसेसमध्ये विद्यार्थिनींना त्यांच्या शाळेच्या वेळेवर पोहोचविण्यासाठी स्कूलबसप्रमाणे वापर होत होता.-   कोरोनानंतर या सगळ्या बसेस बंद पडल्या आणि विद्यार्थिनींचा आधारच तुटला.-    आता  मानव विकासच्या बसेस कधी सुरू होणार याची प्रतीक्षा प्रत्येक विद्यार्थ्यांना आहे.-    खासगीतून प्रवास करताना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो.

प्रवाशांची गैरसोय

दररोज ये-जा करताना एसटीचा वेळ निश्चित राहिलेला नाही. तासंतास थांबल्यानंतरही पुढे जाण्याची साेय राहात नाही. यामुळे खासगीनेच प्रवास करावा लागतो. यातून आर्थिक लूट होत आहे. परिवहन महामंडळाने याकडे जातीने लक्ष द्यावे.- शंकर कसंबे, प्रवासी

दोन वर्षांपासून शाळेमध्ये जाताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. नवीन वर्ष संपले तरी मानव विकास मिशनच्या बसेस सुरू झाल्या नाही. आता कधी सुरू होणार माहिती नाही. असेच राहिले तर आमचे शिक्षणही अधांतरीच राहील.- मीना सावळे, विद्यार्थिनी

नवनव्या उपाययोजना करण्यावर भर

एसटी महामंडळाचे उत्पन्न वाढविण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न होत आहे. लांब पल्ल्याच्या गाड्या आणि रहदारीच्या रस्त्यांवर भर दिला आहे. शैक्षणिक सत्रात मानव विकासच्या बसेस सुरू होतील.- श्रीनिवास जोशी, विभाग नियंत्रक

 

टॅग्स :state transportएसटी