शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच सैन्याकडून बंगालच्या उपसागरात NOTAM जारी; पाकिस्तानशी आहे खास संबंध
2
Crude Oil Price Today: कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी वाढ: इराणच्या UAE वरील हल्ल्यानंतर ब्रेंट क्रूड $११४ पार; जाणून घ्या पेट्रोल-डिझेलचे दर
3
आता पुढचे लक्ष्य अखिलेश यादव; ममता बॅनर्जींचा पराभव करणाऱ्या सुवेंदू अधिकारींनी थोपटले दंड
4
Gold Silver Price Today : सोनं महागलं, चांदी झाली स्वस्त; आज काय आहेत नवे दर? पटापट चेक करा
5
कॅनडाचे दोन तुकडे होणार? स्वतंत्र देशासाठी जनमत संग्रहाची मागणी; प्रादेशिक उपेक्षा भोवली
6
LIVE: नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या मुलाचा संताप, काय म्हणाला?
7
Raja Shivaji Box Office: रितेश देशमुख ठरला बॉक्स ऑफिसचा 'राजा'! ४ दिवसांत सिनेमाची किती कोटींची कमाई?
8
'आग लगा दी बस्ती में...!' दोन जुळ्या भावांनी केले एकाच मुलीशी लग्न; नवरीचा चेहरा पाहून नेटकरी संतापले 
9
अवघ्या एका मताने फैसला, या मतदारसंघात रंगली रोमांचक लढत, कुणी मारली बाजी?
10
राज्य महिला आयोग अध्यक्षपदी माजी IPS अधिकारी मीरा बोरवणकर यांची निवड?; जाणून घ्या सत्य
11
राजकारणात 'ब्लॉकबस्टर' एन्ट्री घेणाऱ्या थलापती विजयनं आई वडिलांविरोधात खटला का दाखल केला होता?
12
तो माझा बाप हीच चूक, तिथेच ठेचून मारले पाहिजे; नसरापूर अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या पत्नी-मुलाचा संताप
13
Stock Market Today: रेड झोनमध्ये शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात; 'या' शेअर्समध्ये मोठी घसरण
14
Iran War: Iran War: अमेरिकेचे होर्मुझ सामुद्रधुनीत जहाजांवर हल्ले, पाच जणांचा मृत्यू; दोन जहाजे काढली बाहेर
15
नसरापूरमधील ‘त्या’ बालिकेच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती आली समोर, नराधमाने…
16
वैभव सूर्यवंशी ते अक्षत रघुवंशी! IPL पदार्पणात पहिल्याच चेंडूवर षटकार ठोकणारे ११ 'धुरंधर'
17
सलमान खान साकारणार 'सुपरहीरो'! राज आणि डीकेच्या आगामी चित्रपटात करीना कपूरची वर्णी?
18
KVP Investment Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम, १ लाखांचे होतील २ लाख; 'इतक्या' महिन्यांमध्ये रक्कम होईल डबल
19
Tarot Card: अंगारकीचा मुहूर्त आणि बाप्पाची कृपा; कोणाचे नशीब बदलणार? वाचा टॅरो भविष्य
20
भाजपानं दिली संधी, आयुष्याला मिळाली कलाटणी; धुणं-भांडी, घरकाम करणाऱ्या कलिता माझी बनल्या आमदार
Daily Top 2Weekly Top 5

विधान परिषदेच्या मतदारांची गुंतागुंत

By admin | Updated: November 18, 2016 02:26 IST

विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अवघ्या ४८ तासांवर आली आहे.

निवडणूक : दोघेही प्रबळ, पण अंदाज येईना ! यवतमाळ : विधान परिषदेच्या यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची निवडणूक अवघ्या ४८ तासांवर आली आहे. मात्र कुणाचे पारडे जड याचा अंदाज बांधणे भल्याभल्यांनाही जमेनासे झाले आहे. कारण दोघांनीही मतदारांच्या ‘भेटी-गाठी’ घेतल्याने हे दोनही प्रमुख उमेदवार प्रबळ ठरत आहेत. विधान परिषदेची ही निवडणूक शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड, खासदार भावना गवळी आणि जिल्हा प्रमुखद्वयींची कसोटी पाहणारी ठरणार आहे. प्रा. तानाजी सावंत यांनी विधान परिषदेचा हा किल्ला सर केल्यास उपरोक्त सर्वांचेच ‘मातोश्री’वर वेगळे वजन निर्माण होणार आहे. या विजयाचे श्रेय कमी अधिक प्रमाणात भाजपाचे येथील राज्यमंत्री आणि त्यांच्या अन्य चार आमदारांनाही निश्चितच मिळणार आहे. भाजपा-सेनेच्या या नेत्यांनी आपसी व पक्षीय वर्चस्वाच्या लढाईचा विचारही मनात न आणल्यास तानाजींचा विजय काहीच कठीण नाही. वर्चस्वाच्या मुद्यावर दोनही पक्षाचे नेते एकजूट दिसत असले तरी कार्यकर्त्यांमधून मात्र विरोधी सूर उमटताना दिसतो आहे. या क्षणी या नेत्यांनी कार्यकर्त्यांच्या सुरात सूर मिसळू नये, एवढीच अपेक्षा प्रा. तानाजींचे निकटवर्तीय बाळगून आहेत. काँग्रेसचे उमेदवार शंकर बडे फारपूर्वीपासून विधान परिषदेच्या तयारीला लागले आहे. त्यांनी आतापर्यंत मतदारांच्या प्रत्यक्ष संपर्काचे दोन ते तीन राऊंड पूर्णही केले. यामुळे त्यांच्याबाबत मतदारांमध्ये सहानुभूती असणे साहाजिक आहे. त्यातच ते ‘स्थानिक’ आहेत. मतदारांपैकीच एक असल्याने आपण विजयाचा जादूई आकडा गाठू असा दावा त्यांच्याकडून केला जात आहे. त्यांचे राजकीय गॉडफादर असलेले माजीमंत्री शिवाजीराव मोघे त्यांच्यासाठी जीवाचे रान करताना दिसत आहे. काँग्रेसची अन्य नेते मंडळीसुद्धा तेवढ्याच ताकदीने प्रयत्नरत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात काँग्रेसमध्ये दोन गट असले तरी ही गटबाजी विधान परिषदेत दिसू नये अशी मतदारांची अपेक्षा आहे. ही गटबाजी छुप्या पद्धतीने कायम राहिल्यास बडेंना धोका संभवतो. काँग्रेसकडून प्रा. तानाजी सावंत ‘बाहेर’चे आहे, सेनेची ताकद वाढणार, भाजपाला बॅकफुटवर जावे लागणार, असा प्रचार केला जात असलातरी सेना-भाजपाची नेते मंडळी त्याला भीक घालताना दिसत नाही. शिवसेना-भाजपा युतीचे उमेदवार प्रा. तानाजी सावंत यांनीही ‘भक्कम’ तयारी केली आहे. मतदारांना ‘खूश’ करण्याची कोणतीही कसर त्यांनी सोडलेली नाही. ३०० पाठीराख्यांसाठी जेवण बनविले, त्यातील २७५ ते २८० निश्चितच जेवणाला येतील, असा त्यांचा अंदाज आहे. येथील गटबाजी, वर्चस्वाची लढाई या सर्वांवर आपला मितभाषी स्वभाव, मराठवाड्यात राबविलेले शिवजलक्रांती अभियान मात करेल व आपण विजयश्री खेचून आणू असा त्यांचा विश्वास आहे.विधान परिषदेचे दोनही उमेदवार तुल्यबळ आहे. मतदार दोनही उमेदवारांच्या ‘खानापूर्ती’त सहभागी झाले आहेत. शिवाय मतदारांचा नेमका कल लक्षात येत नसल्याने अजूनही गुंतागूंत कायम आहे. नेमका कोण गड सर करेल, याचे आडाखे बांधणे चांगलीच कठीण जात आहे. मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असतानाही ‘वास्तव’ काय राहील, हे सांगताना येथील राजकीय जाणकारांचीही कसोटी लागत आहे. दोनही पक्ष विजयाचे दावे करीत आहे. मात्र मतदारांच्या ‘टच’मध्ये असलेल्या प्रमुख समर्थकांच्या चेहऱ्यावर विजयाचा तो विश्वास दिसत नसल्याने अनेकांच्या मनात हूरहूरही घर करून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)