शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

टोमॅटोची श्रीमंती आहे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2021 05:00 IST

पूर्वी ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असणारे सफरचंद आता १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. तर टोमॅटोचे दर जैथे थे ६० ते ८० रुपये किलोच्या घरात आहे. इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे; मात्र फळाच्या किमती वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पडला आहे. तर दुसरीकडे फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांना दिवसभराची मजुरीही मिळत नाही.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : भाजीपाल्याच्या दरामध्ये सतत चढ-उतार होत आहे. अलीकडे टोमॅटोचे दर कायम वाढलेल्या स्वरुपात आहेत; मात्र फळाचे दर त्यापेक्षाही दुपटीने वाढून आहे. हिमालयात झालेल्या बर्फवृष्टीने सफरचंदाचे मोठे नुकसान झाले आहे. यातून सफरचंदाचे दर दुपटीने वाढले आहेत. पूर्वी ६० ते ८० रुपये किलोच्या घरात असणारे सफरचंद आता १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. तर टोमॅटोचे दर जैथे थे ६० ते ८० रुपये किलोच्या घरात आहे. इतर भाजीपाल्यांच्या दरामध्ये घसरण नोंदविण्यात आली आहे. यामुळे गृहिणींना थोडासा दिलासा मिळाला आहे; मात्र फळाच्या किमती वाढल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना आर्थिक भुर्दंड पडला आहे. तर दुसरीकडे फळ विक्रेत्या व्यापाऱ्यांना दिवसभराची मजुरीही मिळत नाही.

स्वयंपाक घरातून टोमॅटो गायब

पूर्वीपेक्षा भाजीपाला स्वस्त झाला आहे. याचा फायदा थोड्या प्रमाणात बजेट सुधारण्यास झाला आहे. मात्र टोमॅटोचे दर अजूनही खाली आले नाही. यामुळे स्वयंपाकगृहात टोमॅटो दिसतच नाही. त्याची जागा इतर भाज्यांनी घेतली आहे. - सोनू मेश्राम, गृहिणी

मी भाजीपाला नाही तर फळाचा व्यापार करते. दिवसभरात एक कॅरेट फळही विकले जात नाही. आता कोरोनामुळे हा फरक पडला की थंडीमुळे हे समजण्यास मार्ग नाही. दोन पैसे उरायचे तर सोडूनच द्या. पोट भरणेही मुश्कील आहे. - प्रीती बागडे, व्यापारी

दरवर्षी दरामध्ये चढ-उतारशेतमालाचे दर दरवर्षी खाली-वर होत असतात. यावर्षी मात्र त्याचे गणितच उमगले नाही. ही परिस्थिती नवीन शेतमाल येईपर्यंत कायम राहण्याची चिन्हे आहे.  - राजू वासेकर, व्यापारी

मध्यप्रदेशातून यवतमाळमध्ये भाजीपाला येत आहे. स्थानिक भाजीपालाही सुरू झाला आहे. यामुळे भाजीपाल्याच्या दरात थोडीफार घसरण झाली आहे.  - गजानन शिंदे, व्यापारी

का वाढले दर- अतिपावसाने खरिपातील भाजीपाला नष्ट झाला. त्यानंतर सुयोग्य वातावरण मिळालेच नाही.- भाजीपाल्याच्या पिकाची नासाडी झाली. यामुळे दरवाढ झाली.

 

टॅग्स :vegetableभाज्या