शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचे तिकीट २८००

By admin | Updated: October 7, 2014 23:39 IST

दचकलात ! होय हे खरे आहे. पुण्याला ट्रॅव्हल्सने जायचे असेल तर २८०० रुपये मोजावेच लागतील. एसटी बसच्या भाड्याच्या तब्बल पाच पट भाडे ट्रॅव्हल्सधारक आकारत आहे. सणा-सुदीच्या काळात

प्रवाशांची लूट : ट्रॅव्हल्सचे भाडे एसटी बसच्या पाच पट अधिकयवतमाळ : दचकलात ! होय हे खरे आहे. पुण्याला ट्रॅव्हल्सने जायचे असेल तर २८०० रुपये मोजावेच लागतील. एसटी बसच्या भाड्याच्या तब्बल पाच पट भाडे ट्रॅव्हल्सधारक आकारत आहे. सणा-सुदीच्या काळात खासगी ट्रॅव्हल्स मालकांनी प्रवाशांची अक्षरश: लूट चालविली आहे. या भरमसाठ भाडेवाढीकडे मात्र परिवहन विभागाचे दुर्लक्ष होत आहे. सणा-सुदीच्या काळात प्रवाशांची प्रचंड गर्दी होते. याच संधीचा फायदा खासगी ट्रॅव्हल्स मालकांकडून दरवर्षी घेतला जातो. या काळात भाड्यांमध्ये वाढ केली जाते. मात्र यावर्षी झालेली भाडेवाढ प्रवाशांचे डोळे पांढरे करणारी आहे. यवतमाळातून पुण्याला जाणाऱ्या आणि पुण्याहून यवतमाळात येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यवतमाळातील अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यात आहे. दिवाळीसाठी ही मंडळी गावी येत असून दिवाळी आटोपताच पुण्याला परत जाणार आहे. तसेच अनेक कर्मचारी व नागरिकही पुण्याला जाणे-येणे या काळात करतात. या संधीचा फायदा घेण्यासाठी ट्रॅव्हल्स मालकांनी एसटीच्या तब्बल पाच पट भाडेवाढ केली आहे. त्यातही बुकींग १५ ते २० दिवस आधी करावे लागत आहे. यवतमाळ ते पुणे एसटी बसची तिकीट ६७८ रुपये आहे. तर निमआराम बसचा दर ७८३ रुपये आहे. असे असतानाही दिवाळीत ट्रॅव्हल्स मालकांनी चक्क यवतमाळ-पुणे तिकीट भाडे १७०० ते २८०० रुपये केले आहे. या दरानुसारच सध्या यवतमाळातील ट्रॅव्हल्स पॉर्इंटवर बुकींग सुरू आहे. प्रवाशांना लुटण्याचा हा प्रकार दरवर्षीच सुरू असतो. गतवर्षी पुण्याचे तिकीट १८०० रुपये होते. यंदा त्यात एक हजार रुपयांची वाढ होऊन २८०० रुपये झाली आहे. एसटी बस पेक्षा आरामदायी आणि नॉन स्टॉप जाता येते म्हणून अनेक प्रवासी खासगी बसला पसंती देतात. तसेच अनेक खासगी बसेस वातानुकुलित असल्याने प्रवासी त्याकडे आकर्षित होतात. मात्र त्यांच्या असाहय्यतेचा फायदा घेत अक्षरश: ट्रॅव्हल्स मालकांनी लूट चालविली आहे. (शहर वार्ताहर)