शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
2
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
3
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
4
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
5
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
6
Sanju Samson ICC Award : संजूसमोर बुमराह ठरला फिका; पठ्ठ्यानं ICC पुरस्कार पटकावत रचला इतिहास
7
होर्मुझ तणावातच एस. जयशंकर यांना इस्रायलचा फोन, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
8
Narendra Modi : "मी तुमची माफी मागतो", दिल्ली-डेहराडून एक्सप्रेस वेचं उद्घाटन करताना मोदी का झाले भावुक?
9
AI मुळे २०३० पर्यंत भारतातील IT उद्योग संपणार? TCS चे CEO म्हणाले- उलट मोठ्या संधी...
10
इराणपाठोपाठ आता चीनला घेरण्याचा अमेरिकेचा डाव?; मलाक्का सामुद्रधुनीत टाकलं महत्त्वाचं पाऊल
11
"मी ठरवलं होतं की आता मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा द्यायचा", नितीश कुमारांचे नव्या सरकारबद्दलही भाष्य
12
पाकिस्तानसाठी धोक्याची घंटा! बलुच बंडखोरांची स्वतःची 'नौदल' स्थापन; पहिल्याच मोहिमेत ३ पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा
13
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: स्वामी समर्थांच्या स्मरण दिनानिमित्त Messages, Images, Whatsapp Status शेअर करत स्वामींना करूया अभिवादन!
14
चीनची खोड काही जाईना! अरुणाचलच्या नावांवरून ड्रॅगनची पुन्हा वळवळ; भारताने सुनावले खडे बोल!
15
"मला वाटतं अशोक खरातचा एन्काऊंटर करतील, कारण...!"; प्रणिती शिंदे यांनी व्यक्त केली वेगळीच शंका
16
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा नवरा फरमानला सोडून पळून गेली? 'त्या' Video मागचं सत्य
17
माकडांना मारण्यासाठी ठेवलेला विषारी लाडू चिमुरड्याने खाल्ला; ४ वर्षांच्या एकुलत्या एक मुलाचा तडफडून मृत्यू!
18
स्मरण दिन २०२६: ९ राशींवर स्वामी कृपा, धनलक्ष्मीचे वरदान; मागाल ते मिळेल, अशक्यही शक्य होईल!
19
'तुम्ही चारवेळा RSS च्या कार्यक्रमात गेलात; मला न्याय कसा देणार', केजरीवालांनी थेट न्यायाधीशांना सुनावले
20
"लवकर या, येताना मिरचीपूड आणा"; जमावाला भडकवणारे धक्कादायक ऑडिओ, चॅट व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

डिमांड भरूनही वीज जोडणी नाही

By admin | Updated: January 19, 2017 01:16 IST

तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे.

महावितरणचे दुर्लक्ष : वणी तालुक्यातील शेतकऱ्यांना मनस्ताप वणी : तालुक्यातील शेतकऱ्यांनी नवीन कृषी पंपाकरिता वीज जोडणी बाबतचे अर्ज महावितरणच्या कार्यालयात सादर केले आहे. मात्र वीज जोडणीचे डिमांड नोट भरूनही अद्याप शेतकऱ्यांना वीज जोडणी मिळाली नाही. अनेक शेतकरी कार्यालयात उंबरठे झिजवत असूनसुद्धा त्यांना कार्यालयातील कर्मचारी ‘सर्कल झोन’चे नाव सांगून परत पाठवित आहेत. ‘आमच्या कार्यालयात कोणतीही माहिती नाही’, असे शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतामध्ये बोअरवेल, शेततळे, विहिरी असून पाण्याचा उपयोग घेता येत नाही. त्यामुळे या सुविधा कोणत्या कामाच्या, असा प्रश्न आता शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. दुसरीकडे लोकप्रतिनिधी व अधिकारी शेतकऱ्यांना योजनाचे नाव समोर करून आम्ही तुमच्या पाठीशी असल्याचा देखावा करतात. यवतमाळ जिल्ह्याची ‘शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हा’ या नावाने ओळख बनली आहे. शासनाने जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागेल त्याला विहिर, शेततळे ही योजना अंमलात आणली. या योजनेअंतर्गत काही शेतकऱ्यांनी शेतात विहिरी, शेततळे खोदले. मात्र पिकांना पाणी देण्यासाठी वीज जोडणी न झाल्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. यावर्षी पावसाने मध्येच दगा दिल्याने खरीपाची पिके वाळू लागली आहे, तर रबी पिकांची वाढ झालीच नाही. यावर्षी कपाशीचे भाव चांगले असले तरी उत्पादनात घट झाल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार शेतात वीज कनेक्शन मिळाल्यास अनेक शेतकऱ्यांना पाण्याचा लाभ मिळून शेतातील पिके वाचवू शकतात. गहू, हरभरा या पिकांच्या उत्पादनातही घट होणार आहे, असा अंदाज काही शेतकऱ्यांनी वर्तविला आहे. धडक सिंचन विहिर योजनेअंतर्गत खोदलेल्या विहिरीवर अजुनही वीज कनेक्शन मिळाले नाही, ही शोकांतिका आहे. अधिकारी बैठका घेऊन कागदोपत्री मोकळे होतात. परंतु कर्मचाऱ्यांच्या कामचुकारपणा धोरणामुळे अर्ज कार्यालयातच प्रलंबित असतात. शेतकरी कार्यालयाच्या येरझारा मारून त्रस्त झाले आहे. कंत्राटदाराकडे शेतकऱ्यांच्या याद्या प्रसिद्ध करण्यात आल्या, असे सांगण्यात येत आहे. मात्र कंत्राटदार वीज कनेक्शनचे काम केव्हा सुरू करणार की, पावसाळ्याची प्रतीक्षा करणार, असा प्रश्न आहे. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन संबंधित शेतकऱ्यांना वीज जोडणी करून देण्यात यावी, अशी मागणी आहे. (कार्यालय प्रतिनिधी)