शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत चार कोटींच्या रस्ते निविदा मॅनेज

By admin | Updated: September 30, 2014 23:41 IST

जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत दोन दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या आॅनलाईन निविदा विशिष्ट पद्धतीने मॅनेज करण्यात आल्या. कमी दराच्या निविदा

यवतमाळ : जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभाग क्र. १ अंतर्गत दोन दिवसांपूर्वी काढण्यात आलेल्या सुमारे चार कोटी रुपयांच्या आॅनलाईन निविदा विशिष्ट पद्धतीने मॅनेज करण्यात आल्या. कमी दराच्या निविदा असूनही ते लिफाफे न उघडता कंत्राटदारांकडून सक्तीने नाहरकत प्रमाणपत्र लिहून घेतले गेले. बांधकाम विभाग क्र. १ चे कार्यकारी अभियंता एस.एस. तपासे यांच्या खास मार्गदर्शनात या निविदा मॅनेज केल्या गेल्याचे सांगितले जाते. प्राप्त माहितीनुसार जिल्हा परिषदेमध्ये सुमारे २० ते २५ लाख रुपये किंमतीच्या रस्त्याच्या ३० कामांच्या निविदा काढल्या गेल्या. यवतमाळ ते वणी या आठ तालुक्यातील कामांच्या या निविदा होत्या. त्यासाठी आॅनलाईन टेंडर काढले गेले. अनेक कंत्राटदारांनी २० टक्के कमी दराने निविदा भरल्या. मात्र त्यांचे टेंडर फॉर्म (बंद लिफाफे) स्वीकारलेच गेले नाही. पहिला लिफाफा उघडून त्यात पूर्ण कागदपत्रे नसल्याचे सांगत दुसरा दराचा लिफाफा उघडणार नाही, अशी भूमिका कंत्राटदारांपुढे घेतली गेली. एवढेच नव्हे तर या भूमिकेबाबत आपाल कोणताही आक्षेप नाही, असे नाहरकत प्रमाणपत्रही लिहून घेतले गेले. या एनओसीसाठी हरकत घेणाऱ्या कंत्राटदारांना अप्रत्यक्ष तुमची जुनी कामे खणून काढू आणि सध्या सुरू असलेल्या, भविष्यात मिळणाऱ्या कामांसाठी सहकार्य करणार नाही, अशी तंबी दिली गेली. त्यामुळे नाईलाजाने सुमारे दहा कंत्राटदारांनी एनओसी दिली. या संपूर्ण प्रक्रियेत संबंधित लिपिक आणि कनिष्ठ अभियंत्यांनी महत्वाची भूमिका बजावल्याचे सांगितले जाते. वास्तविक टेंडर प्रक्रिया आॅनलाईन असताना त्यावर सर्व कागदपत्रे उपलब्ध आहेत. आजही त्यात कोणतीही कागदपत्रे अपूर्ण असल्याचे दिसत नाही. तरीही कंत्राटदारांकडून एनओसी घेऊन आॅनलाईन निविदा मॅनेज करण्यासाठी मध्यम मार्ग काढला गेला. त्यात शासनाचे नुकसान झाले. कारण मर्जीतील कंत्राटदारांसाठी ही तडजोड केली गेली. या कंत्राटदारांची कामे सीएसआरनुसार मंजूर करण्यात आली. ४२ लाख रुपयांची ‘उलाढाल’ या प्रकरणात झाल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षात या आडमार्गासाठी कार्यकारी अभियंता तपासे तेवढे ‘इन्टरेस्टेड’ नव्हते. मात्र लिपिक व कनिष्ठ अभियंत्यांनी त्यांना या तडजोडीसाठी मानसिक दृष्ट्या तयार केल्याचे सांगितले जाते. (जिल्हा प्रतिनिधी)