शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
2
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
3
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
4
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
5
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
6
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
7
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
8
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
9
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
10
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
11
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
12
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
13
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
14
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
15
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
16
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
17
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
18
'४ मे' रोजी शेअर बाजारापासून जरा ... रहा! एक्झिट पोलनुसार पश्चिम बंगालचा निकाल लागला तर...
19
LPG Price Hike: १९ किलोच्या कमर्शिअल सिलिंडरपेक्षा ५ किलोचा गॅस सिलिंडर ठरतोय महागडा; कसे ते पहा, कोण वापरते? 
20
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शाळा पाहताहेत विद्यार्थ्यांची वाट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2021 05:00 IST

कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता.

ठळक मुद्देआठवी ते बारावीतील विद्यार्थी संख्या एक लाखांवर, केवळ २७ हजार विद्यार्थीच शाळेत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : तब्बल दीड वर्षांनंतर १५ जुलैपासून आठवी ते बारावीच्या वर्गांना प्रत्यक्ष सुरुवात झाली. शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांसह पालकांनाही मोठा दिलासा मिळाला असला तरी अद्यापही कोरोनाची भीती कायम असल्याचेच दिसून येते. जिल्ह्यातील इयत्ता आठवी ते बारावीच्या एक लाख दहा हजार ४७९ विद्यार्थ्यांपैकी केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच शाळेत पोहोचले आहेत.कोरोना संकटाचा सर्वात मोठा फटका बसला तो शिक्षण व्यवस्थेला. कोविडमुळे शिक्षणाची कवाडे बंद झाली. मागील दीड वर्षांपासून विविध स्तरातील विद्यार्थ्यांना शाळा सुरू होण्याची प्रतीक्षा लागली होती. अखेर राज्य शासनाच्या निर्देशानुसार १५ जुलैपासून आठवी ते बारावीचे वर्ग प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. तत्पूर्वी यवतमाळ जिल्हा परिषदेने शाळा उघडण्यासंदर्भात ठराव घेतला होता. १५ जुलै रोजी आठवी ते बारावीचे वर्ग असलेल्या एकूण ९८५ शाळांपैकी ५०२ शाळा सुरू झाल्या, तर ४८३ शाळांनी अद्यापही शाळा सुरू करण्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. आठवी ते बारावी या वर्गातील विद्यार्थ्यांची एकत्रित संख्या ११ हजार ४७९ एवढी आहे. यातील ५०२ शाळा सुरू झाल्या असून या शाळेत केवळ २७ हजार ६१० विद्यार्थीच प्रत्यक्ष आल्याने विद्यार्थ्यांची मोठी संख्या शाळा सुरू होऊनही शाळेपासून अद्यापही दूर असल्याचे चित्र आहे. दरम्यान, अमरावती जिल्ह्यात ८९९ शाळांची संख्या असून त्यातील १८२ शाळा सुरू झाल्या आहेत. अमरावती जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीचे एक लाख ९५ हजार ८०७ विद्यार्थी आहेत. यातील केवळ चार हजार ७४९ विद्यार्थीच शाळेत दाखल झाले आहेत. तर वर्धा जिल्ह्यात इयत्ता आठवी ते बारावीच्या ३५६ शाळा असून त्यातील केवळ ३७ शाळा सुरू झाल्या आहेत. या शाळांतील ६५ हजार ४८७ पैकी केवळ ९८७ विद्यार्थी शाळेमध्ये दाखल झालेले आहेत.

उमरखेडमध्ये सर्वाधिक शाळा- आठवी ते बारावीचे वर्ग १५ जुलैपासून प्रत्यक्ष सुरू करण्यात आले आहे. मात्र अद्यापही ४८३ शाळांचे दरवाजे बंद आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ६२ शाळा उमरखेड तालुक्यात सुरू झाल्या आहेत. महागाव तालुक्यात ५२, यवतमाळ १७, राळेगाव ३५, पांढरकवडा ४९, वणी ३७, मारेगाव २५, बाभूळगाव २६, घाटंजी ४९, आर्णी ३२, नेर २७ तर दारव्हा तालुक्यात ३० शाळा सुरू झाल्या आहेत. 

टॅग्स :SchoolशाळाStudentविद्यार्थी