निवासी शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2020 06:00 AM2020-03-14T06:00:00+5:302020-03-14T06:00:09+5:30

शिवाणी देवराव वाघमारे (१३) रा.कलगाव, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने सदर निवासी शाळेत मागील वर्षी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत मावस बहीण आठवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना ती अचानक कोसळली. तिला तत्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.

Resident school student dies | निवासी शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

निवासी शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

Next
ठळक मुद्देखेळताना कोसळली : नातेवाईकांनी व्यक्त केला घातपाताचा संशय

लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : शहरापासून २ किलोमीटर अंतरावरील अनुसूचित जाती-जमाती मुलींच्या निवासी शाळेत सातवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा खेळाच्या साहित्यावरून पडून मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी सकाळी ७ वाजता घडली. दरम्यान, तिच्या मृत्यूबाबत नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.
शिवाणी देवराव वाघमारे (१३) रा.कलगाव, असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने सदर निवासी शाळेत मागील वर्षी २०१९ मध्ये प्रवेश घेतला. तिच्यासोबत मावस बहीण आठवीत शिकत आहे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे व्यायाम करीत असताना ती अचानक कोसळली. तिला तत्काळ सवना येथील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. महिला अधीक्षक भोयर यांनी घटनेची माहिती मुलीच्या नातेवाईकांना दिली. त्यानंतर तिचे वडील देवराव वाघमारे यांनी या संदर्भात महागाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तूर्तास अकस्मात मृत्यूची नोंद घेतली. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पुसदला पाठविण्यात आला. शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.

गळा आणि हातांवर ओरबाडल्याच्या जखमा
शिवाणीच्या डोक्याला जखम दिसत नाही. मात्र तिच्या मणक्याला जबर दुखापत झाल्याचा अंदाज आहे. तिच्या गळ्याला व दोन्ही हातांना ओरबाडल्याच्या जखमा दिसत आहे. त्यामुळे ही घटना संशयास्पद वाटत असून शवविच्छेदन अहवालानंतरच खरे कारण कळू शकेल, असे मत सवना ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. गजानन डोंगे यांनी व्यक्त केले.

शिवाणी व्यायाम साहित्यावर खेळत होती. लोखंडी अँगलवर पडल्याने तिच्या गळ्याला, हातांना जखम झाली. तिचा मृत्यू संशयास्पद नाही. ‘इन कॅमेरा’ शवविच्छेदन करण्यात आले. चौकशी सुरू आहे.
- मंगला भोयर, अधीक्षिका, निवासी शाळा महागाव

Web Title: Resident school student dies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.