शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
Vaibhav Suryavanshi : उत्तुंग फटकेबाजी! १५ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं ३६ चेंडूत पेश केला शतकी नजराणा
3
इस्लामाबादमधील चर्चेपूर्वीच खळबळ! इराणचा अमेरिकेला सणसणीत टोला; म्हणाले "अब्रू वाचवण्यासाठी.."
4
'गिव्ह मी वन चान्स' फेम Karun Nair ट्रोल! ५ मिनिटांत श्रेयस अय्यरचे २ कॅच सोडले; चर्चा तर होणारच
5
Travel : जणू स्वर्ग पृथ्वीवरच आहे! 'या' व्हॅलीचे सौंदर्य पाहून मसुरी-नैनिताललाही विसरून जाल!
6
लॅपटॉपचा Type-C पोर्ट आहे 'ऑल-इन-वन' बाहुबली; याचे भन्नाट फीचर्स वाचून तुम्हीही थक्क व्हाल
7
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
8
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
9
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
10
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
11
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
12
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
13
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
14
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
15
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
16
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
17
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
18
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
19
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
20
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये सव्वालाख क्ंिवटल कापसाची खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 05:00 IST

कापूस पणन महासंघाने पुसद उपविभागातील पुसद, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील पाच ५५० शेतकऱ्यांपैकी पुसद तालुक्यातील तीन हजार ८२१ शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी ९१ हजार २२१ क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी ६९५ शेतकऱ्यांकडून नऊ हजार ८४० क्विंटल, असा एकूण एक लाख एक हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली.

ठळक मुद्देआता खरेदी बंद : पुसद, उमरखेड, दिग्रसमधील ५१५० शेतकरी

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे चालू हंगामात कापूस पणन महासंघातर्फे उपविभागातील पाच हजार ५५० शेतकऱ्यांकडून तब्बल एक लाख २४ हजार ४१ क्ंिवटल एवढ्या विक्रमी कापसाची खरेदी करण्यात आली. मात्र सध्या ढगाळ वातावरणामुळे खेरदी बंद करण्यात आली आहे.कापूस पणन महासंघाने पुसद उपविभागातील पुसद, दिग्रस व उमरखेड तालुक्यातील पाच ५५० शेतकऱ्यांपैकी पुसद तालुक्यातील तीन हजार ८२१ शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी ९१ हजार २२१ क्विंटल कापूस खरेदी केला. बाजार समितीमधील परवानाधारक व्यापाऱ्यांनी ६९५ शेतकऱ्यांकडून नऊ हजार ८४० क्विंटल, असा एकूण एक लाख एक हजार ६२ क्विंटल कापसाची खरेदी केली. कोव्हीड-१९ नंतरच्या काळात उमरखेड येथील ७३ व दिग्रस येथील ३५, तर पुसद येथील ९२६, अशा एकूण एक हजार ३४ शेतकऱ्यांकडून २२ हजार ९७८ क्विंटल कापूस खरेदी करण्यात आला. आत्तापर्यंत एकूण पाच हजार ५५० शेतकऱ्यांकडून १ जूनपूर्वी तब्बल एक लाख २४ हजार ४१ क्विंटल कापसाची खरेदी करण्यात आली. यामध्ये दोन हजार ३९४ ही बाजार समितीकडे आॅनलाईन नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांची संख्या आहे.येथील बाजार समितीच्यावतीने कापूस पणन महासंघ व बाजार समितीतील अनुज्ञप्तीधारक व्यापाºयांकडून परिसरातील शेतकऱ्यांकडून कोव्हीड-१९ पूर्वी व नंतर, अशा दोन टप्प्यात कापूस खरेदी करण्यात आली. मात्र आता पावसाचे वातावरण असल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून ३ जूनपासून कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद राहणार असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव व्ही.डी.पवार यांनी दिली.दरम्यान, पावसाने गेल्या तीन दिवसांपासून तालुक्यात हजेरी लावली आहे. तयामुळे शेतकरी खरीप हंगामाच्या लगबगीत आहे. बियाणे आणि गत खरेदीसाठी त्यांची धावपळ सुरू आहे. मात्र हातात पैसा नसल्याने अनेक शेतकऱ्यांना उधारीवर बियाणे घ्यावे लागत आहे. कापूस घरातच असल्याने त्यांच्यासमोर पैशाचा प्रश्न निर्माण झाला आहे.अद्यापही शेकडो क्विंटल कापूस घरातचबाजार समितीत एक लाख क्विंटलच्यावर कापसाची खरेदी झाली असली, तरी अद्याप अनेक शेतकऱ्यांकडे कापूस साठवून आहे. पुसद, उमरखेड आणि दिग्रस तालुक्यात अनेक शेतकऱ्यांच्या घरात कापूस साटवून आहे. वारंवार बंद होणाऱ्या खरेदीमुळे हा कापूस साटवून आहे. लॉकडाऊनमुळे अनेकदा खरेदी बंद होती. त्याचा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.

टॅग्स :cottonकापूसMarket Yardमार्केट यार्ड