शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेपूर्वीच वाढले प्रचार फंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2019 06:00 IST

मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही.

ठळक मुद्देराळेगाव तालुका : अपवाद वगळता विकास कामांचे भूमिपूजन, उद्घाटनास फाटा

के.एस. वर्मा ।लोकमत न्यूज नेटवर्कराळेगाव : आगामी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लवकरच लागण्याची शक्यता आहे. ते पाहता, इच्छुक संभाव्य उमेदवारांकडून मतदारांना प्रभावित करण्यासाठी विविध तंत्राचा जोरदार वापर सुरू झाला आहे. गेल्या दोन-तीन महिन्यापासून हा प्रकार सुरू असून आता शेवटच्या टप्प्यात कमालीची गती आली आहे.मतदार संघातील प्रत्येक तालुका मुख्यालय, गावखेड्यात बॅनर, पोस्टर्स आदींवर हे इच्छुक उमेदवार झळकत आहे. सणांच्या शुभेच्छांसह कोणत्याही कार्यक्रमाच्या निमित्याने मतदारांना उपकृत करण्याची एकही संधी सोडण्यास हे उमेदवार विसरत नाही. मतदारांच्या वैयक्तीक सुख-दुखात सामिल होण्यासोबतच काय हवे नको याबाबतही आपुलकी दाखवून जवळीक साधण्याचा प्रयत्न होत आहे. पोळ्यात शेतकऱ्यांचा सन्मान होवू लागला आहे. तर शिक्षक दिनी शिक्षक पुरस्कृत होवू लागले आहे. गणपतीच्या शुभेच्छा बॅनरसह सोशल मीडियातून दिल्या जात आहे.उद्घाटन व भूमिपूजनाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाची दिशा कळू शकते. पण यावेळी प्रथमच एकाद दुसरा अपवाद वगळता महत्वाच्या राजकीय पक्षांनी याबाबींना फाटा दिल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. दुसरीकडे मतदार संघात अनेक ज्वलंत प्रश्न कायम असताना विरोधी पक्षाच्या नेत्यांनीही आवाज उठविला नाही. एकाही प्रकरणात गंभीरतेने जनआंदोलन केले नाही. याबाबतही मतदारात चर्चा सुरू आहे. एकीकडे मतदारसंघात अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. विकास कामांची सर्वांनाच आस आहे. मात्र या बाबींकडे सत्ताधारी आणि विरोधक दुर्लक्ष करीत असून केवळ विविध फंडे वापरून प्रचार करीत आहेत.मोबाईलवर येत आहे ढिगभर संदेशगेल्या तीन-चार दिवसापासून या मतदार संघातील नागरिकांच्या मोबाईलवर टेप केलेल्या संदेशाचे प्रसारण सुरू झाले आहे. ‘आगामी विधानसभा निवडणुकीकरिता उमेदवारीच्या प्रयत्नात आहे. आपणाकडून सहकार्य मिळेल, अशी अपेक्षा बाळगतो’ अशा आशयाचा संदेश फिरू लागला आहे. एका-एका मोबाईलवर हा संदेश दिवसातून अनेकदा धडकत आहे. त्यामुळे मतदारही त्रस्त होत आहे. आचारसंहिता लागल्यावर सोशल मीडियावर येणारी बंधने आणि प्रचार खर्चाचा द्यावा लागणार हिशेब यातून सुटण्यासाठी आतापासूनच प्रचाराचा हा फंडा वापरला जात आहे.

टॅग्स :vidhan sabhaविधानसभा