शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

सावत्र मामाच्या अत्याचारानंतर भाचीने घेतले विष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 05:00 IST

आरोपी सावत्र मामा हा मुळचा राजूर (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. मात्र तो गेल्या एक वर्षापासून पीडित मुलीच्या गावाला पत्नीसह राहायला गेला.  एक दिवस घरी कुणी नसताना आरोपी मामाने पीडित मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जिवाच्या भितीपोटी पीडिता पुढे अनेक दिवस मामाचा अत्याचार सहन करत राहिली.

लोकमत न्यूज नेटवर्कवणी : सावत्र मामाकडून झालेल्या सततच्या अत्याचाराने भाची गर्भवती झाली. त्यानंतर गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्यात आला. या त्रासाला कंटाळून पीडित अल्पवयीन भाचीने विषप्राशन केले. गुरूवारी याप्रकरणी तक्रार दाखल होताच, शिरपूर पोलिसांनी आरोपीला जेरबंद केले.पीडित अल्पवयीन मुलगी ही शिरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात आजीसोबत वास्तव्याला आहे. आरोपी सावत्र मामा हा मुळचा राजूर (जि.चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. मात्र तो गेल्या एक वर्षापासून पीडित मुलीच्या गावाला पत्नीसह राहायला गेला.  एक दिवस घरी कुणी नसताना आरोपी मामाने पीडित मुलीवर अत्याचार केला. हा प्रकार कुणाला सांगितल्यास तिला व तिच्या वडिलांना जीवे मारण्याची धमकी दिली. त्यामुळे जिवाच्या भितीपोटी पीडिता पुढे अनेक दिवस मामाचा अत्याचार सहन करत राहिली. याचदरम्यान, पीडितेला गर्भधारणा झाली. मामाने तिच्यावर दबाव टाकून तिला गर्भपाताच्या गोळ्या दिल्या. त्यामुळे तिचा गर्भपात झाला. मामाच्या सततच्या या अत्याचाराने त्रस्त झालेल्या युवतीने २० ऑगस्ट रोजी विषप्राशन केले. तिला तातडीने चंद्रपूरला हलविण्यात आले. उपचारानंतर तिने तक्रार दिली.  पोलिसांनी आरोपी मामाविरूद्ध भादंवि ३७६, (२) (एन) ५०६, सहकलम ४, ६, ८ पोक्सो ॲक्ट अन्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली. शुक्रवारी न्यायालयाने ९ सप्टेंबरपर्यंत त्याला न्यायालयीन कोठडी दिली.  ठाणेदार सचिन लुले यांच्या मार्गदर्शनाखाली  पीएसआय राम कांडुरे तपास करीत आहे.

पोलिसांचा पुढाकार - २५ ऑगस्टला ती नातलगासह शिरपूर पोलीस ठाण्यात आली. मात्र भीतीपोटी तक्रार दाखल न करता ती परत आपल्या गावी निघून गेली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शिरपूर पोलिसांनी २६ ऑगस्टला पीडितेचे गाव गाठत तिच्याकडून तक्रार लिहून घेतली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी