शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
4
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
5
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
6
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
7
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
8
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
9
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
10
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
11
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
12
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
13
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
14
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
15
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
16
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
17
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
18
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
19
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
20
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
Daily Top 2Weekly Top 5

पाटीपुरा येथे तरुणाचा चाकूने निर्घृण खून

By admin | Updated: November 1, 2016 02:09 IST

शहरात सर्वत्र दीपोत्सव सुरू असताना पाटीपुरा परिसरात चौघांनी एका तरुणावर सपासप चाकूने वार

यवतमाळ : शहरात सर्वत्र दीपोत्सव सुरू असताना पाटीपुरा परिसरात चौघांनी एका तरुणावर सपासप चाकूने वार करून निर्घृण खून केल्याची घटना सोमवारी सकाळी ९.१५ वाजता घडली. शहर पोलिसांनी चौघांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल केला असून यातील एकाला जखमी अवस्थेत अटक करण्यात आली आहे. या घटनेने पाटीपुरा परिसरात खळबळ निर्माण झाली. प्रणय उर्फ बंटी सुभाष खोब्रागडे (२०) असे मृताचे नाव आहे. प्रणय सोमवारी सकाळी किराणा आणण्यासाठी घराबाहेर पडला होता. त्यावेळी पाटीपुरा पसिरातील सम्यक क्रांती चौकात चौघांनी अडवून त्याच्यावर चाकूने सपासप वार केले. आरडाओरडा झाल्यानंतर चौघेही घटनास्थळावरून पसार झाले. परिसरातील नागरिकांनी जखमी प्रणयला अ‍ॅटोरिक्षाने शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी प्रणयचे वडील सुभाष खोब्रागडे यांनी शहर पोलीस ठाण्यात खुनाची तक्रार दिली. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच टोळीविरोधी पथकाने आरोपी तुषार उर्फ पोकर रणजित मेश्राम (१९) याला सजल रेसिडेन्सी परिसरातून जखमी अवस्थेत ताब्यात घेत शहर ठाण्याच्या शोधपथकाच्या सुपूर्द केले. पोलिसांनी जखमी तुषारला शासकीय रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी सुभाष खोब्रागडे यांच्या तक्रारीवरून अंकुश दामोदर रामटेके (३५), रिंकू अजय रामटेके (१९), सुमित उर्फ बाको बयास, तुषार उर्फ पोकर रणजित मेश्राम यांच्या विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविला. (कार्यालय प्रतिनिधी) शनिवारीच दिली होती जिवे मारण्याची धमकी ४प्रणयला शनिवारी दुपारी आरोपींनी घरी येऊन जिवे मारण्याची धमकी दिली होती. अक्षय रामटेकेच्या खुनाचा बदला घेणार म्हणून आरोपी धमकावत होते, अक्षयच्या खुनात प्रणय असल्याच्या संशयाने आरोपींना पछाडले होते. यातूनच हा खून केल्याचे सुभाष खोब्रागडे यांनी तक्रारीत नमूद केले आहे.