दारव्हा तालुक्यात वार्षिक निधीमधून केलेल्या कामठवाडा ते आमशेत या जिल्हा मार्गावरील ९० लाखांच्या पुलाला पहिल्याच पावसात भगदाड पडले. यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामाची गुणवत्ता उघडी पडली. ...
शाळा सुरू होण्याच्या दीड महिना आधीच तब्बल १५ हजार २१५ विद्यार्थ्यांची पटनोंदणी करून त्यांना पहिल्या वर्गात दाखलही करून घेतले आहे. उन्हाळी सुटीत पटनोंदणीचा उपक्रम राबविणारी यवतमाळ जिल्हा परिषद राज्यात एकमेव ठरली आहे. ...
जिल्ह्यातील आदिवासी, नक्षलग्रस्त भागातील खासगी अनुदानित शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगानुसार प्रोत्साहन भत्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यासंदर्भात शिक्षण उपसंचालकांनी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना पत्र पाठवून कार्यवाहीची सूचना ...
सुमारे दीड लाख रूपये किंमतीचे बनावट बी.टी.बियाणांची साठवण करणाऱ्या एका इसमाला अटक करण्यात आली. मंगळवारी सायंकाळी कृषी विभागाच्या पथकाने पहापळ येथे संबंधित घरी धाड टाकून ही कारवाई केली. ...
व्यवस्थेने घात केलेल्या जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध करीत आत्महत्या केली. त्यांच्या कुटुंबीयांकडे स्थानिक सत्ताधारी, विरोधकांनी पाठ फिरविली असली, तरी परजिल्ह्यातून आलेल्या काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांनी मात्र मोठा दिलासा दिला आहे. ...
नागपूर-बोरी-तुळजापूर मार्गावरील ‘कोसदनी’चा घाट प्रसिद्ध आहे. हा घाट डोंगराच्या मधातून गेला. घाट तसा लांब नाही. मात्र घाटाखालील वळण ‘जिवघेणे’ ठरले आहे. तेथे सातत्याने अपघात होतात. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी यवतमाळ जिल्ह्यातील घरकूल लाभार्थी महिलांशी व्हीसीच्या माध्यमातून थेट संवाद साधला. जिल्हाधिकारी कार्यालयातून प्रत्यक्ष पंतप्रधानांशी बोलायला मिळाल्याने या महिलांनी आनंद व्यक्त केला. ...
तालुक्यातील वाढोणा या गावी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह पोलिसांनी धाड टाकून एका घरात साठविलेले बीटी कपाशीचे ७४ हजार रूपये किंमतीचे १०० पॉकेट सोमवारी जप्त केले. ...