Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Sakhi >Food > उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!

उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!

Sugarcane Juice Sugar Content: उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस अनेकदा लोक आरोग्यासाठी फायदेशीर समजून अगदी आवडीने पितात, पण तुम्हाला माहिती आहे का की हे नॅचरल ड्रिंक काही वेळा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 19:58 IST2026-05-18T19:57:40+5:302026-05-18T19:58:15+5:30

Sugarcane Juice Sugar Content: उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस अनेकदा लोक आरोग्यासाठी फायदेशीर समजून अगदी आवडीने पितात, पण तुम्हाला माहिती आहे का की हे नॅचरल ड्रिंक काही वेळा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

Do you enjoy drinking sugarcane juice in summer? 9 teaspoons of sugar in 1 glass; Those who think it is healthy, please stop | उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!

उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!

उन्हाळ्यात शरीराला थंडावा देण्यासाठी लोक अनेकदा उसाचा रस पितात, ज्यामुळे त्यांना फ्रेश आणि एनर्जी मिळाल्यासारखं वाटतं. उन्हाळ्यात थंडगार उसाचा रस अनेकदा लोक आरोग्यासाठी फायदेशीर समजून अगदी आवडीने पितात, पण तुम्हाला माहिती आहे का की हे नॅचरल ड्रिंक काही वेळा तुमच्या आरोग्यासाठी अत्यंत धोकादायक ठरू शकतं.

हेल्थ एक्सपर्ट्सने दिलेल्या माहितीनुसार, उसाच्या रसात असलेल्या नैसर्गिक साखरेचं अतिप्रमाण लठ्ठपणा आणि डायबिटीससारख्या आजारांना थेट आमंत्रण देत आहे. 'इंडियन कऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च' (ICMR) आणि 'नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ न्यूट्रिशन' (NIN) च्या रोजच्या शुगर इनटेकच्या गाइडलाईननुसार, १ ग्लास उसाच्या रसाने केवळ एका दिवसाचीच नाही, तर कित्येक दिवसांची साखरेची गरज एकाच वेळी पूर्ण होते.

१०० मिली रसात १५ ग्रॅम साखर

'हेल्थलाईन'च्या रिपोर्टनुसार, उसाच्या रसात नॅचरल शुगरचं प्रमाण खूप जास्त असतं. केवळ १०० मिलीलीटर उसाच्या रसात साधारण १३ ते १५ ग्रॅम साखर असते. जर तुम्ही एक स्टँडर्ड ३०० मिलीलीटरचा ग्लास भरून रस प्यायलात, तर शरीरात ३९ ते ४५ ग्रॅमपर्यंत साखर जाते. हे प्रमाण साधारण ८ ते ९ टी स्पून (लहान चमचे) साखरेच्या बरोबर आहे (१ टी स्पून = ५ ग्रॅम). पण ही गोष्ट तुम्हालाही माहित आहे की, अनेकदा आपण एका वेळी ३०० मिलीपेक्षा जास्त उसाचा रस पितो, ज्यामुळे शरीरातील शुगर लेव्हल अचानक वाढते.

ICMR ची गाईडलाईन आणि साखरेचं रोजचं प्रमाण

ICMR-NIN च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, एका व्यक्तीने दिवसभरात साखर (एडेड शुगर) २० ते २५ ग्रॅमपेक्षा जास्त घेता कामा नये. हे प्रमाण साधारण ४ ते ५ लहान चमच्यांच्या बरोबर आहे. ही मर्यादा २००० कॅलरीजच्या रोजच्या आहाराच्या आधारावर निश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून एकूण ऊर्जेचा केवळ ५ टक्के भाग साखरेमधून येईल. परंतु, जर तुम्ही १ किंवा २ ग्लास उसाचा रस प्यायलात, तर एकाच वेळी तुम्ही दिवसभराच्या साखरेच्या मर्यादेपेक्षा दुप्पट साखर शरीराला देत आहात.

डायबिटीस आणि लठ्ठपणाचा धोका

डॉक्टरांच्या मते, जेव्हा तुम्ही लिक्विड फॉर्ममध्ये इतकी जास्त साखर घेता, तेव्हा शरीर त्याचं सहज पचन करू शकत नाही. असं केल्याने इन्सुलिन रेझिस्टन्सचा धोका वाढतो, जो पुढे जाऊन टाईप-२ डायबिटीस आणि फॅटी लिव्हरचे कारण बनतो. याशिवाय शरीरात अतिरिक्त कॅलरीज जमा झाल्यामुळे वजन वेगाने वाढतं, ज्यामुळे हृदयाचे आजार आणि हाय ब्लड प्रेशरचा धोकाही वाढतो. उसाच्या रसात काही मिनरल्स देखील असतात, पण साखरेच्या या अवाढव्य प्रमाणापुढे ती नगण्य ठरतात.

उसाचा रस प्यायचा की नाही?

तज्ज्ञ म्हणतात की, आमचा सल्ला असा अजिबात नाही की तुम्ही उसाचा रस पिणं पूर्णपणे बंद करावं. आमचे सांगणं इतकंच आहे की रसाचं प्रमाण मर्यादित ठेवा आणि याला रोजची सवय बनवू नका. जर तुम्ही आधीच डायबिटीसचे रुग्ण असाल किंवा वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल, तर यापासून लांब राहणंच योग्य ठरेल. 
 

Web Title : गन्ने का रस: ताजगी भरा पर चीनी से भरपूर, सावधानी से पिएं!

Web Summary : गन्ने का रस ताजगी देने वाला है, लेकिन इसमें चीनी की मात्रा अधिक होती है, जिससे मोटापा और मधुमेह हो सकता है। स्वास्थ्य विशेषज्ञ संयम बरतने की सलाह देते हैं, खासकर मधुमेह रोगियों या वजन कम करने वालों के लिए, क्योंकि एक गिलास दैनिक चीनी की सीमा से अधिक है।

Web Title : Sugarcane Juice: Refreshing but loaded with sugar; drink cautiously!

Web Summary : Sugarcane juice, though refreshing, contains high sugar levels, potentially leading to obesity and diabetes. Health experts advise moderation, especially for diabetics or those trying to lose weight, as one glass exceeds daily sugar intake limits.