४ महिन्यांपासून ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे 'हा' चित्रपट; जगभरात होतेय चर्चा, IMDb वर ८.३ रेटिंग; कुठे पाहायचा?
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 18:16 IST2026-05-18T18:13:54+5:302026-05-18T18:16:09+5:30
४ महिन्यांपासून ओटीटीवर 'ट्रेंडिंगमध्ये आहे 'हा'चित्रपट, मुख्य भूमिकेत कोण? जाणून घ्या...

४ महिन्यांपासून ओटीटीवर टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे 'हा' चित्रपट; जगभरात होतेय चर्चा, IMDb वर ८.३ रेटिंग; कुठे पाहायचा?
Ott Trending Movies:ओटीटी प्लॅटफॉर्मवर दर आठवड्याला अनेक चित्रपट आणि वेब सीरिज प्रदर्शित होत असतात. पण, काही चित्रपट आपल्या वेगळ्या शैलीमुळे प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. सध्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर अशाच एका चित्रपटाने धुमाकूळ घातला आहे. कोणता आहे हा चित्रपट जाणून घेऊया...
गेल्या चार महिन्यांपूर्वी ओटीटी प्लॅटफॉर्मवर एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांकडून दमदार प्रतिसाद मिळाला. एकीकडे बॉक्स ऑफिसवर कमाईचे अनेक विक्रन रचल्यानंतर हा सिनेमा ओटीटीवरही कुठे मागे नाही.मधल्या काळात इतर अनेक नवीन वेब सीरिज स्ट्रीम झाल्या, परंतु या सीरिजला मात्र टॉप १० ट्रेंडिंग लिस्टमधून कोणी हटवू शकलं नाही.दरम्यान, या चित्रपटाचं नाव धुरंधर आहे. ५ डिसेंबर २०२५ रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज करण्यात आला. त्यानंतर ओटीटीवर सुद्धा या चित्रपटाचं वर्चस्व कायम आहे. डिजीटल प्लॅटफॉर्मवर हा सिनेमा
३० जानेवारी २०२६ रोजी नेटप्लिक्सवर स्ट्रिम करण्यात आला.
प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवसापासून छप्परफाड कमाई करत या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आपला दबदबा निर्माण केला. या स्पाय अॅक्शन चित्रपटात अवघ्या काही दिवसांत मोठमोठ्या बॅनरच्या चित्रपटांचे रेकॉर्ड्स मोडीत काढले. या चित्रपटात रणवीर सिंग, आर माधवन, अक्षय खन्ना, अर्जुन रामपाल, संजय दत्त, सारा अर्जुन अशी 'धुरंधर' सिनेमाची स्टारकास्ट आहे. आदित्य धरने या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या चित्रपटाच्या कमाईची केवळ चर्चाच झाली नाही, तर मनोरंजन विश्वातहीचित्रपटाची कथा, गाणी, दिग्दर्शन आणि कलाकारांचा उत्कृष्ट अभिनय हे सर्व चर्चेचा विषय बनले. या चित्रपटाला IMDb वर ८.३ रेटिंग मिळालं आहे.३ तास २५ मिनिटांचा हा चित्रपट ओटीटीवर हिंदी, तमिळ आणि तेलगू भाषांमध्ये उपलब्ध आहे.
नेटफ्लिक्सवर 'धुरंधर' ट्रेंड होत असल्यामुळे, आता त्याच्या दुसऱ्या भागाच्या ओटीटी प्रदर्शनाबाबत चर्चा सुरू झाली आहे. 'धुरंधर २' येत्या ४ जून रोजी जिओ हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे.