वीर पहारिया काय ऐकत नाय! 'स्काय फोर्स'नंतर अभिनेत्याच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 17:34 IST2026-05-18T17:27:50+5:302026-05-18T17:34:38+5:30
'स्काय फोर्स'नंतर वीर पहारियाचा नवा सिनेमा ‘बेनाम’! दिसणार कधीही न पाहिलेला अंदाज, चाहते उत्सुक

वीर पहारिया काय ऐकत नाय! 'स्काय फोर्स'नंतर अभिनेत्याच्या हाती लागला मोठा प्रोजेक्ट, साकारणार महत्त्वपूर्ण भूमिका
Veer Pahariya Upcoming Film: महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांचा नातू म्हणजेच अभिनेता वीर पहारिया मागील अनेक महिन्यांपासून त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे प्रचंड चर्चेत होता. वीर पहारियाने'स्काय फोर्स' मधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात त्याने अक्षय कुमारसोबत स्क्रिन शेअर केली होती. 'स्काय फोर्स' या देशभक्तीपर चित्रपटात त्याने केलेल्या कामाचं सगळीकडे कौतुक झालं. त्यानंतर आता वीर पहारिया लवकरच नव्या सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाला आहे.
‘बेनाम’ असं त्याच्या या आगामी सिनेमाचं नाव आहे. या ॲक्शन-थ्रिलर चित्रपटात वीर मुख्य भूमिकेत दिसणार आहे.‘बेनाम’ हा एक ॲक्शनपट आहे. ज्यामध्ये वीर पहारियाचा कधीही न पाहिलेला अंदाज दिसणार आहे. त्यामुळे ही भूमिका त्याच्या करिअरसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे. येत्या काही दिवसांत निर्माते अधिकृत घोषणा करण्याच्या तयारीत आहे. त्या त्याच्या या चित्रपटाबद्ल चाहत्यांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे.
दरम्यान, या भूमिकेसाठी वीरने प्रचंड मेहनत घेतल्याचं सांगण्यात येतंय. तसेच चित्रपटात वीरसह आणखी कोणते कलाकार झळकणार याबाबत अद्याप फारशी माहिती समोर आलेली नाही. मात्र, या प्रोजेक्टची सिनेवर्तुळात चर्चा रंगली आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक महेश भट्ट या प्रोजेक्टसोबत जोडले गेले आहेत. त्यामुळे या सिनेमात काहीतरी नक्कीच वेगळं काहीतरी अनुभवायला मिळणार, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
वर्कफ्रंट
वीर पहारियाने 'स्काय फोर्स' या चित्रपटातून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी त्यांनी वरुण धवनच्या 'भेडिया' या चित्रपटात सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं होतं.