शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

‘सीसीआय’च्या कापूस खरेदी केंद्रांवर शेतकऱ्यांची खुलेआम लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 10:38 IST

कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारीच हजारो क्विंटल कापूस सीसीआयला विकत आहे.

ठळक मुद्देव्यापाऱ्यांसाठी मात्र पायघड्याग्रेडर्सची मनमानी, मुजोरीही कायम, संरक्षण कुणाचे ?

राजेश निस्ताने ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कॉटन कार्पोरेशन ऑफ इंडियाच्या (सीसीआय) खरेदी केंद्रांवर सामान्य शेतकऱ्यांची खुलेआम लूट सुरू आहे. शेतकऱ्यांनी आणलेला कापूस कमी दर्जाचा दाखवून नाकारला जात आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या नावाने व्यापारीच हजारो क्विंटल कापूस सीसीआयला विकत आहे. यातून प्रति क्विंटल दोन ते अडीच हजार रुपयांची ‘मार्जीन’ राहत असून कोट्यवधींची ‘उलाढाल’ सुरू आहे.सीसीआयचे कापूस खरेदी केंद्र शेतकऱ्यांसाठी की व्यापाऱ्यांसाठी (जिनिंग-प्रेसिंग) असे म्हणण्याची वेळ आली आहे. या केंद्रावरील ग्रेडर्सच्या मनमानी व मुजोरीचा सामना शेतकऱ्यांना करावा लागत आहे. हे ग्रेडर्स शेतकऱ्यांऐवजी व्यापाऱ्यांचेच हित अधिक जोपासत आहेत. सीसीआयच्या खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांनी आणलेला कापूस ओला आहे, चांगला दर्जा नाही, कमी प्रतिचा आहे, अशी कारणे सांगून सर्रास नाकारला जात आहे. मग शेतकऱ्यांना नाईलाजाने हा कापूस खासगी बाजारात पडलेल्या भावात विकावा लागत आहे. व्यापारी अवघ्या तीन ते साडेतीन हजार रूपये क्विंटल दराने शेतकऱ्यांच्या या कापसाची खरेदी करतो. नंतर हाच कापूस कुण्यातरी शेतकऱ्यांचा सातबारा वापरुन सीसीआयला विकला जातो. सीसीआयचे ग्रेडर्स हा कापूस व्यापाऱ्याने आणल्याने डोळे लावून स्वीकारतात. या कापसाला भावही पाच हजारांपेक्षा अधिक दिला जातो.

मार्जीनचे ‘वाटेकरी’ही अनेकअशा पद्धतीने प्रत्येक क्विंटल मागे व्यापारी व ग्रेडर्सच्या संगनमताने दोन ते अडीच हजारांची ‘मार्जीन’ राहते. आतापर्यंत हजारो क्विंटल कापसाची खरेदी सीसीआय व पणन महासंघाने केली आहे. त्यातील केवळ ‘मार्जीन’ कोट्यवधी रुपयांची झाली आहे. या मार्जीनचे ‘वाटेकरी’ही अनेक आहेत. त्यामुळेच सीसीआयच्या अकोला, औरंगाबाद व मुंबई कार्यालयांमधून ग्रेडर्सला साधा जाब विचारण्याची तसदी घेतली जात नाही.

राजकीय आवाज मुंबईपर्यंत पोहोचत नाहीसीसीआयमध्ये सुरू असलेल्या या गोंधळाबाबत अनेक ठिकाणी स्थानिक पातळीवरील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून आवाज उठविला जातो. परंतु त्यांचा आवाज सीसीआयच्या मुंबई मुख्यालयापर्यंत पोहोचत नाही. पर्यायाने सीसीआय व पणन महासंघाच्या केंद्रांवर सुरू असलेली शेतकऱ्यांची लूट कायम आहे.रूईगाठीतही ग्रेडर्स-व्यापाऱ्यांचे साटेलोटेसीसीआयने खरेदी केलेल्या कापसापासून रूईगाठी बनविल्या जातात. परंतु त्यातही व्यापारी व ग्रेडर्सचे साटेलोटे असून सीसीआयला अर्थात शासनाला कोट्यवधींचा चुना लावला जात आहे. उच्च दर्जाच्या कापसापासून बनलेल्या गाठी व्यापाऱ्यांना दिल्या जातात. तर व्यापाऱ्यांकडील कमी दर्जाच्या कापसापासून बनलेल्या गाठी सीसीआयच्या गाठींमध्ये अ‍ॅडजेस्ट केल्या जातात. यातही ग्रेडर्ससाठी मोठी मार्जीन ठेवली जाते. व्यापारी व ग्रेडर्सची साखळी शेतकरीच नव्हे तर सीसीआयला पर्यायाने शासनाचीसुद्धा लूट व फसवणूक करीत असल्याचे स्पष्ट होते.

टॅग्स :cottonकापूस