शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2019 06:00 IST

विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही नावे पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

ठळक मुद्देउमरखेड मतदारसंघ : उमेदवारीसाठी रस्सीखेच, ऐनवेळी झालेल्या नव्या एन्ट्रीमुळे संभ्रम

संजय भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढू लागली आहे. एनवेळी पक्षात नवीन एन्ट्री झाल्यामुळे ही स्पर्धा चांगलीच वाढली. त्यामुळे कार्यकर्ते सया संभ्रमावस्थेत दिसून येत आहे.कोणत्याही पक्षाने सध्या उमेदवार निश्चित केले नाही. परंतु भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या. भाजपमध्ये आधी दोनच नावाची प्रचंड चर्चा होती. दरम्यानच्या काळात जिल्हा नेतृत्वाने नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या कारणावरून तरुण चेहरा प्रोजेक्ट केला. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने भाजपमध्ये एंट्री केली. आता ते थेट तिकिटाच्या शर्यतीत उभे राहिले. मात्र त्यांना पक्षातीलच माजी आमदारांचे उघड समर्थन मिळत असल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था वाढली आहे.विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही नावे पोहोचल्याचे सांगितले जात आहे. भाजपने विविध एजन्सीमार्फत मतदारसंघात उमेदवारीविषयी सर्वे केला. या सर्वेतून नवीन चेहरा दिला, तरच पक्षाला संधी असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जनमताचा कौल लक्षात घेता पक्षाने उमेदवारी देताना सावध पावले उचलली आहे.इतर पक्षातही संभ्रम कायमभाजपशिवाय इतर पक्षांच्या उमेदवाराबाबतही संभ्रम कायम आहे. अद्याप कोणताच उमेदवार ठरला नाही. युतीचेही निश्चित झाले नाही. आघाडीतच उमेदवारीसाठी चुरस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते तूर्तास संभ्रमावस्थेत दिसून येत आहे. ४ आॅक्टोबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपा