भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2019 06:00 AM2019-09-26T06:00:00+5:302019-09-26T06:00:22+5:30

विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही नावे पोहोचल्याचे सांगितले जात आहे.

The number of contestants in the BJP increased | भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली

भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढली

Next
ठळक मुद्देउमरखेड मतदारसंघ : उमेदवारीसाठी रस्सीखेच, ऐनवेळी झालेल्या नव्या एन्ट्रीमुळे संभ्रम

संजय भगत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
महागाव : उमरखेड विधानसभा मतदारसंघात भाजपमध्ये स्पर्धकांची संख्या वाढू लागली आहे. एनवेळी पक्षात नवीन एन्ट्री झाल्यामुळे ही स्पर्धा चांगलीच वाढली. त्यामुळे कार्यकर्ते सया संभ्रमावस्थेत दिसून येत आहे.
कोणत्याही पक्षाने सध्या उमेदवार निश्चित केले नाही. परंतु भारतीय जनता पार्टी, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांच्या मोठ्या हालचाली सुरू झाल्या. भाजपमध्ये आधी दोनच नावाची प्रचंड चर्चा होती. दरम्यानच्या काळात जिल्हा नेतृत्वाने नव्या चेहऱ्याला संधी देण्याच्या कारणावरून तरुण चेहरा प्रोजेक्ट केला. राष्ट्रवादीच्या एका बड्या नेत्याने भाजपमध्ये एंट्री केली. आता ते थेट तिकिटाच्या शर्यतीत उभे राहिले. मात्र त्यांना पक्षातीलच माजी आमदारांचे उघड समर्थन मिळत असल्यामुळे पक्षाच्या कार्यकर्त्यांची संभ्रमावस्था वाढली आहे.
विद्यमान आमदारविषयी मतदारसंघांमध्ये प्रचंड नाराजी आहे. या संधीचा लाभ घेत नगराध्यक्ष, जिल्हा नेतृत्वाने प्रमोट केलेला नवा चेहरा आणि राष्ट्रवादीतून भाजपमध्ये दाखल झालेला अनुभवी चेहरा, अशा चार इच्छुकांमध्ये उमेदवारीची शर्यत लागली आहे. कोअर कमिटीकडे ही नावे पोहोचल्याचे सांगितले जात आहे. भाजपने विविध एजन्सीमार्फत मतदारसंघात उमेदवारीविषयी सर्वे केला. या सर्वेतून नवीन चेहरा दिला, तरच पक्षाला संधी असल्याची माहिती समोर आली. त्यामुळे जनमताचा कौल लक्षात घेता पक्षाने उमेदवारी देताना सावध पावले उचलली आहे.

इतर पक्षातही संभ्रम कायम
भाजपशिवाय इतर पक्षांच्या उमेदवाराबाबतही संभ्रम कायम आहे. अद्याप कोणताच उमेदवार ठरला नाही. युतीचेही निश्चित झाले नाही. आघाडीतच उमेदवारीसाठी चुरस आहे. त्यामुळे सर्वच पक्षांचे कार्यकर्ते तूर्तास संभ्रमावस्थेत दिसून येत आहे. ४ आॅक्टोबरनंतरच खरे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

Web Title: The number of contestants in the BJP increased

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.