शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

कुख्यात अक्षय राठोडवर ‘एमपीडीए’

By admin | Updated: September 12, 2016 01:20 IST

गुन्हेगारी जगतात सुपारी किलर म्हणून परिचित अक्षय राठोडवर शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी

वाशिममध्ये स्थानबध्द : अनेक गंभीर गुन्हे यवतमाळ : गुन्हेगारी जगतात सुपारी किलर म्हणून परिचित अक्षय राठोडवर शहर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधक कायद्यानुसार (एमपीडीए) कारवाई करण्यात आली असून त्याला जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंंंजुरी दिली आहे. अक्षयला वाशिम जिल्ह्यात स्थानबध्द केले जाणार आहे. यवतमाळ शहरातील संघटित गुन्हेगारीत कुप्रसिध्द असलेला अक्षय आत्माराम राठोड (२४) याच्यावर सात गंभीर गुन्हे आहेत. यवतमाळ शहर टाणे आणि वर्धा येथे खुनाचा तर नेरमध्ये दरोड्याचा गुन्हा आहे. याशिवाय घातक शस्त्र बाळगणे, धमकावने यासारखे गुन्हे आहेत. सुपारी किलर अक्षयने मध्यंतरीच्या काळात शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीच्या युवकांचे संघटन उभे केले होते. मात्र पोलिसांच्या सततच्या कारवाईमुळे त्याला मोठी कारवाई करता आली नाही. शेवटी त्याने आपले बस्तान नागपूर येथे हलविले. नेर येथे दरोड्याच्या प्रयत्नात असलेल्या अक्षयला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले. तेव्हापासून तो कारागृहातच आहे. चार पाच दिवसापूर्वी त्यांची जामिनावर सुटका झाल्यानंतर पुन्हा प्रतिबंधक कारवाई करून त्याला अटक केली. सणासुदीच्या काळात अक्षय बाहेर राहणे धोक्याचे असल्याचे ओळखून शहर पोलिसांनी त्याच्या विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव तयार केला. याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर अक्षयला रविवारी दुपारी जिल्हा कारागृहातून ताब्यात घेण्यात आले. त्याला आता वाशिम येथे स्थानबध्द केले जाणार आहे. शहर ठाण्याच्या इतिहासात १३ वर्षानंतर एखादा सक्रिय गुन्हेगारा विरोधात एमपीडीएचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. हा प्रस्ताव पोलीस अधिक्षक अखिलेशकुमार सिंग, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनात शहरचे ठाणेदार नंदकुमार पंत आणि सहायक निरीक्षक संग्राम ताटे यांनी तयार केला. (कार्यालय प्रतिनिधी)