शहरं
Join us  
Trending Stories
1
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
2
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
3
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
4
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
5
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
6
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
7
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
8
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
9
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
10
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
11
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
12
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
13
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
14
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
15
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
16
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
17
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
18
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
19
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
20
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
Daily Top 2Weekly Top 5

साडेनऊ हजार कर्मचाऱ्यांची ये-जा तरीही उचलला जातो घरभाडे भत्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2020 05:00 IST

घरभाडे भत्यासाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला चार कोटींची तरतूद केली जाते. मात्र जिल्हा परिषदेचे सात हजार ४५६ शिक्षक, ६३० ग्रामसेवक, ४२१ कृषी सहायक आणि शेकडो तलाठी मुख्यालयी न राहताच घरभाडे भत्ता उचलत आहेत. आता जनता याबाबत प्रशासनाला जाब विचारण्याच्या तयारीत आहे. 

ठळक मुद्देघरभाडे भत्त्यानंतरही मुख्यालयाचा मुक्काम दुर्लक्षित, कारवाई केव्हा ?

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : मुख्यालयी राहणे बंधनकारक असताना काही महत्वाच्या पदावरील कर्मचारी अपडाऊन करतात. यासोबतच मुख्यालयी राहण्याचा घरभाडे भत्ता, एकस्तर वेतनश्रेणी आणि वाहतूक भत्ताही उचलतात. यासंदर्भातील वास्तव जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शिक्षण विभाग त्यामध्ये आघाडीवर आहे. तलाठी तर निवासस्थाने असतानाही मुख्यालयी राहत नाही. ग्रामसेवक अपडाऊनच करतात. तर कृषी सहाय्यकांची असंख्य पदे रिक्त  असल्याने एकाच कृषी सहाय्यकांकडे अनेक गावांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. घरभाडे भत्यासाठी नऊ हजार कर्मचाऱ्यांसाठी दर महिन्याला चार कोटींची तरतूद केली जाते. मात्र जिल्हा परिषदेचे सात हजार ४५६ शिक्षक, ६३० ग्रामसेवक, ४२१ कृषी सहायक आणि शेकडो तलाठी मुख्यालयी न राहताच घरभाडे भत्ता उचलत आहेत. आता जनता याबाबत प्रशासनाला जाब विचारण्याच्या तयारीत आहे. 

शिक्षण विभाग कार्यालय, यवतमाळशिक्षण विभागात सात हजार ४५६ शिक्षक कार्यरत आहे. यातील सर्वच शिक्षक घरभाडे भत्ता उचलतात. बाहेरगावावरून तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्या शिक्षकांचा आकडा मोठा आहे. स्वत:चे घर असतानाही मुख्यालयातील काही कर्मचारी घरभाडे उचलतात. सरकारी तिजोरीला फटका बसला आहे.

पंचायत विभाग कार्यालय, यवतमाळपंचायत विभागात ६३० ग्रामसेवक आहेत. यातील बहुतांश ग्रामसेवक तालुका अथवा शहरातून ये-जा करतात. सर्वच ग्रामसेवक घरभाडे भत्ता उचलतात. घरभाडे भत्ता उचलण्यासाठी शासकीय नियम असतानाही या नियमांचे उल्लंघन होत आहे. यामुळे गावपातळीवरील कामकाजही प्रभावित झाले आहे. 

कृषी विभाग कार्यालय, यवतमाळकृषी विभागात विविध योजनांची अंमलबजावणी आणि नुकसानीचे सर्वेक्षण करणारे ४२१ कर्मचारी आहेत. यातील बहुतांश कर्मचारी रिक्त पदामुळे मुख्यालयाच्या मध्यभागी भाड्याने राहतात आणि बहुतांश सर्वच कर्मचारी घरभाडे भत्ता उचलतात. या कर्मचाऱ्यांना मिळणारा प्रवास भत्ता त्या तुलनेत अपुरा पडतो.

टॅग्स :GovernmentसरकारEmployeeकर्मचारी