शहरं
Join us  
Trending Stories
1
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
2
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
3
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
4
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
5
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
6
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
7
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
8
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
9
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
10
आजपासून वैशाख प्रारंभ! गंगासप्तमी ते बुद्ध पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवांचा जाणून घ्या धार्मिक ठेवा
11
IPL 2026: हैदराबादच्या संघात हुकमी एक्क्याची एन्ट्री; मुंबई, गुजरातसाठी खेळलाय सामने, कोण आहे तो?
12
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
13
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
14
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
15
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
16
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
17
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
18
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
19
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
20
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रीयकृत बँकांना कर्ज पुनर्गठणाचे आदेशच नाही !

By admin | Updated: May 28, 2016 02:23 IST

सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्णत्वाकडे असले तरी राष्ट्रीयकृत बँकांना या पुनर्गठणाचे अद्याप आदेशच प्राप्त झाले नाही.

लिड बँक मॅनेजरचा दिवसभर ‘नो-रिस्पॉन्स’संजय भगत महागाव सहकारी बँकांमधील शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण पूर्णत्वाकडे असले तरी राष्ट्रीयकृत बँकांना या पुनर्गठणाचे अद्याप आदेशच प्राप्त झाले नाही. एका बँकेच्या व्यवस्थापकानेच आढावा बैठकीत ही माहिती दिली. आता या बँकांना कर्ज वाटप व पुनर्गठणासाठी ३१ मेचा अल्टीमेटम देऊन फौजदारी कारवाईची तंबी शेतकरी मिशनने दिली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्या वर्षी थकबाकीदार झालेल्या शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण केले जात आहे. या शेतकऱ्यांना पाच वर्षासाठी पाच हप्ते पाडून दिले जात आहे. अर्थात त्यांना आपल्यावरील पीक कर्ज पुढील पाच वर्षात फेडायचे आहे. त्यावरील १२ टक्के व्याज शासन भरणार आहे. सहकारी बँकेत २० हजारांवर शेतकऱ्यांच्या कर्जाचे पुनर्गठण झाले आहे. आठवडाभरात संपूर्ण पुनर्गठण प्रक्रिया पूर्ण होणार आहे. मात्र राष्ट्रीयकृत बँकांचे पुनर्गठण अद्याप सुरूच झाले नाही. कारण काय तर या बँकांना अद्याप कर्ज पुनर्गठणाबाबत आदेशच प्राप्त झाले नसल्याची बाब पुढे आली. वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी येथील विश्रामभवनावर आढावा बैठक घेतली. या वेळी कर्ज पुनर्गठणाचे आदेश नसल्याचे युनियन बँकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. शिवाय युनियन व स्टेट बँकेने शेतकऱ्यांना अद्याप कर्ज वाटप केले नसल्याची तक्रार शेतकऱ्यांनी केली. त्यामुळे तिवारी जाम भडकले. त्यांनी लगेच बँकेच्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांना संपर्क करून शेतकऱ्यांची अडवणूक न करता ३१ मेपूर्वी कर्ज वाटप करण्याच्या सूचना केल्या. या काळात कर्ज पुनर्गठण व पीक कर्जाचे वाटप न झाल्यास फौजदारी गुन्हे नोंदविणार असल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले. कर्ज वाटपाची मंद गती कायमचराष्ट्रीयकृत बँकांना सुमारे १८०० कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले आहे. आतापर्यंत केवळ २०० कोटींवर वाटप झाले आहे. अद्यापही कर्ज वाटपाची गती वाढलेली नाही. कर्ज वाटप व पुनर्गठणाच्या अधिकृत माहितीसाठी लिड बँकेचे व्यवस्थापक प्रशांत देशपांडे यांच्याशी दिवसभर मोबाईलवर वारंवार संपर्क केला. मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यंत्रणेची शेतकऱ्यांना उर्मट वागणूक राष्ट्रीयकृत बँकांमध्ये कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना तेथील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून उर्मट वागणूक मिळत असल्याच्या जिल्हाभरातून तक्रारी आहे. कर्ज मागणाऱ्या शेतकऱ्यांकडे कायमच ‘थकबाकीदार’ या नजरेतून पाहिले जाते. सातबारा देऊनही शेतकऱ्यांना हीन वागणूक देण्याचे प्रकार सुरू आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांचा कल राष्ट्रीयकृत ऐवजी जिल्हा सहकारी बँकेकडे अधिक आहे. मात्र प्रशासनाने गावे जोडून दिल्याने शेतकऱ्यांना नाईलाजाने राष्ट्रीयकृत बँकांची पायरी चढावी लागत असल्याची भावना अनेक शेतकऱ्यांनी बोलून दाखविली.