शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझमध्ये संघर्ष पेटणार! इराण म्हणाला, 'नाकेबंदी हटवली नाही, तर आता अमेरिकेला प्रत्युत्तर देणार"
2
भयंकर! अखिलेश यादवांचा पुतळा जाळताना स्फोट; भाजपा आमदार अनुपमा जयस्वाल भाजल्या
3
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
4
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
5
ना भांडण, ना ब्रेकअप! Gen Z च्याही पुढे गेली Gen Alpha; खऱ्या प्रेमापेक्षा 'AI गर्लफ्रेंड'ची क्रेझ
6
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
7
"महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या उरावर बसवले जात असतील तर...", अमोल मिटकरींचा धीरेंद्र शास्त्रींवर घणाघात
8
बागेश्वर बाबा अडचणीत! शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या प्रकरणी छत्रपती संभाजीनगरात तक्रार
9
४,४,४,४,४,४! प्रभसिमरन सिंगची तुफान फटकेबाजी; अजिंक्य रहाणे अन् पृथ्वी शॉच्या विक्रमाशी बरोबरी
10
Nithin Kamath : "माझ्या मुलाचा स्क्रीन टाईम दिवसाला फक्त ३० मिनिटं, तरीही..."; नितीन कामथ यांनी व्यक्त केली चिंता
11
पित्याने पोटच्या पोराला ज्युसरने ठेचून मारलं; आई-मुलाचं 'अनैतिक नातं' ठरलं हत्येचं कारण?
12
पुण्यात थरार..! मद्यधुंद व्यक्तीकडून बस ‘हायजॅक’चा प्रयत्न; संतोष माने प्रकरणाची पुनरावृत्ती होता होता वाचली
13
आप सोडताच राघव चड्ढांच्या लोकप्रियतेला ओहोटी; भाजप प्रवेशानंतर ११ लाख इन्स्टाग्राम चाहत्यांनी फिरवली पाठ
14
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
15
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
16
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
17
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
18
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
19
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
20
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
Daily Top 2Weekly Top 5

नाफेडने केली हरभऱ्याची विक्रमी खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2022 05:00 IST

खुल्या बाजारात हरभऱ्याला साडेचार हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे, तर हमी केंद्रावर हरभऱ्याला पाच हजार २३० रुपये क्विंटलचा दर आहे. यामध्ये ७३० रुपयांची तफावत आहे. याच कारणाने शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी नाफेडकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही हरभऱ्याची खरेदी गावपातळीवर सुरू केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : खुल्या बाजारात हरभऱ्याचे दर घसरले आहे. यामुळे हरभऱ्याची विक्री करण्यासाठी शेतकऱ्यांनी आपला मोर्चा नाफेडकडे वळविला आहे. आतापर्यंत जिल्ह्यात अडीच लाख क्विंटल हरभऱ्याची खरेदी झाली आहे. आतापर्यंतची ही विक्रमी खरेदी असल्याची नोंद घेण्यात आली आहे. खुल्या बाजारात हरभऱ्याला साडेचार हजार रुपये क्विंटलचा दर मिळत आहे, तर हमी केंद्रावर हरभऱ्याला पाच हजार २३० रुपये क्विंटलचा दर आहे. यामध्ये ७३० रुपयांची तफावत आहे. याच कारणाने शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या खरेदीसाठी नाफेडकडे धाव घेतली आहे. जिल्ह्यात मार्केटिंग फेडरेशन आणि विदर्भ मार्केटिंग फेडरेशनचे केंद्र सुरू करण्यात आलेली आहे. याशिवाय काही शेतकरी उत्पादक कंपन्यांनीही हरभऱ्याची खरेदी गावपातळीवर सुरू केली आहे. सद्यस्थितीत मार्केटिंग फेडरेशन आणि व्हीसीएमएसचा खरेदीचा आकडा पुढे आला आहे. दोघांनी आतापर्यंत दोन लाख ४२ हजार ६८८ क्विंटल हरभऱ्याची खरेदी केली आहे. विक्रमी खरेदीमुळे शेतमाल ठेवायचा कुठे, असा प्रश्न खरेदीदारांपुढे निर्माण झाला आहे. शेतमालाची खरेदी झाल्यानंतर त्याच कार्यक्षेत्रातील ५० किलोमीटर अंतरामध्ये शेतमाल ठेवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. ५० किलोमीटरमध्ये उपलब्ध गुदामात शेतमाल ठेवण्यासाठी जागा नाही. यामुळे खरेदी होणारा शेतमाल पुढे दुसऱ्या ठिकाणी जाईपर्यंत प्रतीक्षा करावी लागत आहे. यातूनच हरभरा खरेदीसाठी शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सूचनांची संख्या कमी करण्यात आली आहे. यातून खरेदीची गती मंदावली आहे. 

खरेदी ५४ कोटींची, मिळाले २६ कोटी- हरभऱ्याची खरेदी झाल्यानंतर शेतमाल विकलेल्या शेतकऱ्यांना ठरावीक कालावधीमध्ये हमी दरानुसार पैसे मिळणे गरजेचे आहे. सद्यस्थितीत खरेदी झालेल्या शेतमालापैकी निम्म्याच शेतमालाचे पैसे वळते झाले आहे. ५४ कोटी रुपयांचा हरभरा खरेदी झाला असला तरी २६ कोटी रुपयांचे चुकारे करता आले आहे. शेतकऱ्यांना चुकाऱ्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 

टॅग्स :market yardमार्केट यार्ड