शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
3
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
4
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
5
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
6
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
7
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
8
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
9
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
10
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
11
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
12
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
13
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
14
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
15
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
16
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
17
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
18
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
19
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
20
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
Daily Top 2Weekly Top 5

आई वाट पाहात राहिली, चिमुकला देवाघरी गेला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 06:00 IST

शाळेजवळून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शवविच्छेदनगृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोरिक्षातून रोडवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देबालकदिनीच घाला : ऑटोरिक्षातून पडला

राजेश कुशवाह।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : दररोज शाळा सुटल्यावर ऑटोरिक्षातून घरी येणारा मुलगा आला नाही म्हणून आई आतूरतेने वाट पाहात होती. मात्र मुलगा आलाच नाही. आली ती त्याच्या मृत्यूचीच बातमी. समाजमन सुन्न करणारी ही घटना ऐन बालकदिनीच तालुक्यातील परसोडा येथे घडली.समर्थ रंजीत पवार असे मृत मुलाचे नाव असून तो आर्णीच्या स्वामी विवेकानंद शाळेत दुसरीत शिकत होता. परसोडा येथील वैशाली पवार यांची दोन्ही मुले आर्णी येथे स्वामी विवेकानंद शाळेत शिकतात. मोठा मुलगा चौथीत तर छोटा समर्थ दुसऱ्या वर्गात होता. हे दोघेही रोज ऑटोरिक्षाने ये-जा करायचे. १४ नोव्हेंबर रोजी नेहमीप्रमाणे शाळा सुटल्यावर ऑटोरिक्षाने घरी परत निघाले. मात्र शाळेजवळून ५०० मीटरच्या अंतरावर असलेल्या शवविच्छेदनगृहाजवळ समर्थचा हात अचानक सुटला आणि तो ऑटोरिक्षातून रोडवर फेकला गेला. यात त्याच्या डोक्याला जबरदस्त मार लागला. प्रथम त्याला ग्रामीण रुग्णालयात प्रथम उपचार करून यवतमाळला रवाना करण्यात आले. मात्र तेथे उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. रोज शाळा सुटल्यावर दहा मिनिटात घरी येणारा समर्थ आजही नक्कीच येईल म्हणून आई वाट पाहात होती. मात्र समर्थ कधीच परत येण्यासाठी निघून गेला होता.दोन्ही गावे शोकाकूलसमर्थ पवार हा चिमुकला आर्णी तालुक्यातील परसोडा आणि महागाव तालुक्यातील लेकुरवाडी गावकऱ्यांचा लाडका होता. त्याची आई वैशाली ही परसोडाच्या फुलसिंग राठोड यांची मुलगी तर लेकुरवाडीच्या रंजीत पवार यांची पत्नी होय. मात्र रंजीत सध्या कामानिमित्त पुणे, मुंबई या ठिकाणी राहात असल्यामुळे वैशाली दोन्ही मुलांना घेवून वडिलांकडे परसोडा येथे राहात होती. मात्र दोन्ही गावांमध्ये समर्थने जिव्हाळा लावला होता. चिमुकल्या जीवाच्या मृत्यूची वार्ता कळताच दोन्ही गावांवर शोककळा पसरली.

टॅग्स :Studentविद्यार्थीDeathमृत्यू