शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
2
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
3
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
4
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
5
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
6
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
7
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
8
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
9
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
10
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
11
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
12
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
13
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
14
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
15
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
16
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
17
पाकिस्तानात पेट्रोल ४५० पार, फक्त ५ दिवसांचा साठा शिल्लक; भारताशी तुलना करत मंत्र्यांनीच फोडला टाहो
18
India Women's T20 World Cup 2026 Squad : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा; कुणाला मिळाली संधी?
19
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
20
इराणचा शांती प्रस्ताव ट्रम्प यांनी फेटाळला! होर्मुझची सामुद्रधुनी उघडण्याच्या बदल्यात ठेवली मोठी अट
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील बाजार समित्या बेमुदत बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 05:00 IST

शेतमालाचे दर पावसाळ्यात सर्वाधिक असतात. यामुळे शेतकरी पेरणीपूर्वी शेतमाल विक्री करून बियाणाची तजवीज करीत होते. याशिवाय खत, औषधी आणि पेरणीच्या खर्चासाठी शेतमालाच्या धान्य विक्रीतूनच याचे नियोजन करण्यात येत होते. अशा स्वरूपात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी ठेवलेले आहे. आता हे सर्व शेतकरी व्यापाऱ्यांच्या बंदने अडचणीत आले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र शासनाच्या धोरणाचा व्यापाऱ्यांकडून विरोध : सहा हजार पोत्यांची आवक ठप्प

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने डाळ व इतर धान्य खरेदीच्या साठ्यावर निर्बंध आणले आहेत. मोठ्या व्यापाऱ्यांना दोन हजार क्विंटल साठवणुकीची मर्यादा निश्चित केली आहे. एकाच दिवशी यापेक्षा जास्त माल हंगामामध्ये खरेदी होतो. यामुळे व्यापार करायचा कसा, असा प्रश्न विचारीत व्यापाऱ्यांनी केंद्र शासनाच्या धोरणाविरोधात बेमुदत बंद पुकारला आहे. यातून शेतमाल खरेदी-विक्रीची उलाढाल ठप्प झाली आहे. यामुळे चार कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली आहे. शेतमालाचे दर पावसाळ्यात सर्वाधिक असतात. यामुळे शेतकरी पेरणीपूर्वी शेतमाल विक्री करून बियाणाची तजवीज करीत होते. याशिवाय खत, औषधी आणि पेरणीच्या खर्चासाठी शेतमालाच्या धान्य विक्रीतूनच याचे नियोजन करण्यात येत होते. अशा स्वरूपात जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी धान्य विक्रीसाठी ठेवलेले आहे. आता हे सर्व शेतकरी व्यापाऱ्यांच्या बंदने अडचणीत आले आहेत. जिल्ह्यातील सर्व बाजार समित्या सुरू आहेत. मात्र त्या ठिकाणचा शेतमाल विक्रीचा व्यवहार बंद आहे. यामुळे शेतमाल विक्रीसाठी घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांना रिकाम्या हाताने परत जावे लागत आहे. शेतकऱ्यांचा शेतमाल बाजार समित्यांमध्ये थांबला आहे. केंद्र शासनाने शेतमाल खरेदीसाठी मर्यादा निश्चित केल्याने अधिकचा माल खरेदी झाला तर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यातून शेतमाल खरेदीचे चक्र थांबणार आहे. याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसणार आहे. व्यापारी आणि शेतकरी असे दोघांचेही नुकसान होणार असल्याचा आरोप व्यापारी करीत आहेत. या प्रकारामुळे व्यापारी मोठ्या उद्योजकांना मोठ्या प्रमाणात खरेदी झालेला माल एकाच वेळी पोहोचवू शकणार नाहीत, यातून बाजारात पुन्हा तुटवडा निर्माण होईल. यामुळे महागाईचा सामना सर्वसामान्यांना करावा लागणार आहे. याशिवाय केंद्र शासनाने व्यापाऱ्यांच्या विरोधातील काही कायदे पारित केल्याचा आरोपही व्यापारी करीत आहेत. टीडीएसचा नवीन कायदा आणण्यात आला आहे. यामुळे ०.१० टक्के टीडीएस खरेदीदाराकडून वसूल होणार आहे. या सर्व बाबी क्लिष्ट पद्धतीच्या आहेत. यामुळे व्यापार करणे अवघड झाले.

शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्या - बाजार समितीच्या बेमुदत बंदने शेतकऱ्यांना शेतमाल विकताना मोठ्या अडचणी येत आहेत. खरेदी करणारा व्यापारी नसल्याने शेतमाल विकायचा कुठे, असा प्रश्न शेतकऱ्यांपुढे निर्माण झाला आहे. पैशाअभावी शेतीचे कामकाज रखडले आहे. यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.  

केंद्र शासनाने लागू केलेले धोरण रद्द करण्यात यावे. पूर्वीप्रमाणे धान्य खरेदी करताना साठवणुकीची मर्यादा शिथिल करण्यात यावी, हीच प्रमुख मागणी व्यापाऱ्यांची आहे. यामुळे राज्यात सर्वच बाजार समितीमधील व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत बंद कायम राहील. - राजू निमोदिया 

केंद्र शासनाने साठवणुकीसाठी घातलेली मर्यादा चुकीची आहे. यामुळे व्यापार अडचणीत आला आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत बाजार समित्यांमधील खरेदी-विक्री बंद राहील. - विजय मुंधडा

शासनाचा निर्णय चुकीचा आहे. व्यापार करताना व्यापाऱ्यांना शेतमाल खरेदीसाठी मर्यादा दिली तर शेतमाल खरेदी कसा होईल, हा प्रश्न व्यापाऱ्यांना पडला आहे. त्यांनी बाजार समितीला पत्र देऊन खरेदीवर सध्या बहिष्कार टाकला आहे. - रवी ढोक, बाजार समिती सभापती, यवतमाळ. 

केंद्राने जो कायदा पारित केला, त्याविरोधात व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. बाजार समित्या सुरू आहेत. मात्र खरेदी-विक्री बंद आहे. यावर केंद्र शासनाने तोडगा काढावा. शेतकऱ्यांच्या अडचणी दूर कराव्यात. - प्रवीण देशमुखसभापती, कळंब बाजार समिती

 

टॅग्स :Market Yardमार्केट यार्ड