शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
2
"शांतता करार करा, अन्यथा पुन्हा बॉम्बफेक करु"; ट्रम्प यांचा इशारा; इराणसोबतचा संघर्ष पेटणार?
3
अयान टपरीवर मोबाईल विसरला अन् तिथेच फुटले बिंग; मुलींचे व्हिडिओ शिक्षकानेच केले फॉरवर्ड
4
Post Office ची जबरदस्त स्कीम, ₹२००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळेल ₹२२,७३२ चा फिक्स्ड रिटर्न, कोणती आहे स्कीम?
5
...हे वागणं बरं नव्हं! शून्यावर आउट झाल्यानंतर शाहीन आफ्रिदीनं काय केलं? तुम्हीच बघा
6
"तुला जिवंत सोडणार नाही!" पत्नीसोबत अफेअर असल्याचा संशय, शेजाऱ्यावर तलवारीनं जीवघेणा हल्ला
7
अक्षय्य तृतीयेला सोने खरेदी करताय? मग ‘या’ ५ चुका टाळा, अन्यथा होईल मनस्ताप
8
"मूल नसणाऱ्या स्त्रियांना मूल देतो"; संगमनेरच्या भोंदू गडगे बाबाचा पर्दाफाश, पोलिसांनी ठोकल्या बेड्या!
9
पुणे विमानतळावर सुखोई विमानाचं 'हार्ड लँडिंग'; मोठा अपघात टळला, ९ तासांनी धावपट्टी सुरु, अनेक विमाने रद्द!
10
रशियन कच्च्या तेलावर गुड न्युज! अमेरिकेचा युटर्न; नकार दिल्यानंतर आता केलं 'हे' महत्त्वाचं काम
11
भारताचा वेग जगात सर्वाधिक, पण अर्थव्यवस्था का घसरली?
12
नाशिक TCS प्रकरण: ना तक्रार, ना युनिट बंद; कंपनीने सोडलं मौन, निदा खानबद्दलही केला मोठा खुलासा!
13
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
14
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
15
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
16
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
17
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
18
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
19
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
20
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

कारागृह कोरोनापासून अभेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2020 05:01 IST

कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी मार्गावर शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आवारात तात्पुरते कारागृह उघडण्यात आले. विलगीकरण आणि कारागृह अशा स्वरूपात या इमारतीचा वापर करण्यात येऊ लागला.

ठळक मुद्देकच्चे कैदी आधी विलगीकरणात : नंतरच जेलमध्ये ‘एन्ट्री’

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्हा कारागृहात कोरोनाचा शिरकाव होवू नये यासाठी कारागृह प्रशासनाने सुरुवातीपासूनच दक्षता घेतली. परिणामी अद्यापपर्यंत जिल्हा कारागृहाची भिंत कोरोना संसर्गाला भेदता आली नाही. तेथील कैदी व कर्मचाऱ्यांना सुरक्षित राखण्यात यश मिळाले आहे. विलगीकरणातील दोन कैदी पॉझिटिव्ह आले. मात्र तेही जामिनावर सुटल्यानंतर अहवाल मिळाला.कोरोना विषाणू संसर्गाचा धोका वाढत असताना कारागृह संसर्गापासून सुरक्षित ठेवण्याचे मोठे आव्हान आहे. येथील जिल्हा कारागृह अधीक्षक कीर्ती चिंतामणी यांनी संसर्गाचा धोका ओळखून सुरुवातीलाच नव्याने येणाऱ्या बंद्यांसाठी विलगीकरण कक्ष उघडला. यवतमाळातील गोदणी मार्गावर शिक्षण प्रशिक्षण संस्थेच्या आवारात तात्पुरते कारागृह उघडण्यात आले. विलगीकरण आणि कारागृह अशा स्वरूपात या इमारतीचा वापर करण्यात येऊ लागला. २ मे पासून विलगीकरणामध्ये आतापर्यंत ३७० बंदी ठेवण्यात आले होते. त्यापैकी १६० जणांना जामिनीवर सुटका झाली, तर १९० जणांना पूर्ण तपासणी करून कारागृहात ठेवण्यात आले.इतर कारागृहाची स्थिती पाहता यवतमाळ जिल्हा प्रशासनाने विशेष खबरदारी घेतली. कारागृहात नवीन बंद्यांना व कच्च्या कैद्यांना थेट प्रवेश दिला जात नाही. त्याची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला किमान १४ दिवस विलगीकरण कक्षात ठेवले जाते. या कालावधीत त्याची कोरोना तपासणी करून नंतर कारागृहात सोडण्यात येते. विलगीकरण कक्षातील ३७० जणांचे नमूने तपासणीला पाठविले आहे. यातील एक दुर्धर आजाराचा रुग्ण असलेला कैदी वैद्यकीय महाविद्यालयातच उपचारादरम्यान कोरोना पॉझिटिव्ह आढळला, तर विलगीकरण कक्षातील दोघांचे नमूने पॉझिटिव्ह आले. मात्र १७ ऑगस्टला दिलेल्या नमून्यांचा अहवाल २१ ऑगस्टला मिळाला. तोपर्यंत ते दोन कैदी जामीन मंजूर झाल्याने बाहेर सुटले होते. अद्यापही दहा नमुन्यांचा अहवाल आलेला नाही.कारागृहाच्या विलगीकरण कक्षातील बंद्यांचा कोरोना तपासणी अहवाल तातडीने मिळणे आवश्यक आहे. यासाठी कारागृह अधीक्षकांनी जिल्हा प्रशासन व जिल्हा शल्य चिकित्सकांकडे वारंवार पत्रव्यवहारही केला आहे. कारागृहाच्या विलगीकरण कक्षातील बंद्यांची रॅपिड अँटिजन टेस्ट किटद्वारे तपासणी केली जावी, जेणेकरून तपासणीचा अहवाल तातडीने मिळतो व वेळीच खबरदारी घेण्यास सोयीचे होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रॅपिड टेस्ट होत नसल्याने बंद्यांचे नमूने आरटीपीसीआर मशीनवर तपासणीसाठी पाठविले जाते. यात नमून्यांचा अहवाल येण्यासाठी पाच ते सहा दिवस लागतात.निगेटिव्ह नमुन्यांचे अहवाल मिळतच नसल्याची ओरडपॉझिटिव्ह असलेल्या बंद्यांचा अहवाल मिळण्यासाठी तीन ते चार दिवस वाट पाहावी लागते. निगेटिव्ह असल्याचा अहवाल बऱ्याचदा दिला जात नाही. तपासणी अहवालाला वेळ लागत असल्याने संभ्रमावस्थेत काम करावे लागते.कारागृहाची सुरक्षितता कायम राखत कोरोना संसर्गापासून वाचण्याचा पुरेपूर प्रयत्न केला जात आहे. आरोग्य यंत्रणेकडून आणखी थोडे सहकार्य अपेक्षित आहे. चाचणीचा अहवाल वेळेत मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. - कीर्ती चिंतामणीकारागृह अधीक्षक, यवतमाळ

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याjailतुरुंग