शहरं
Join us  
Trending Stories
1
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
2
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
3
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
4
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
5
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
6
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
7
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
8
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
9
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
10
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
11
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
12
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
13
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
14
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
15
माओवाद्यांकडून सशस्त्र क्रांतीचाच पुनरुच्चार! ‎'देवजी'ला ठरवले गद्दार: आत्मसमर्पण धोरणावर पत्रकातून आगपाखड 
16
हैदराबादहून चेन्नईला जाणाऱ्या चारमीनार एक्स्प्रेसला लागली आग, प्रवाशांनी धावत्या ट्रेनमधून मारल्या उड्या   
17
बैठे काम सिगारेट ओढण्याइतकेच घातक; दुर्लक्ष केल्यास आरोग्याचा निघणार ‘धूर’, कशी घ्याल काळजी? 
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
19
लग्नाच्या जल्लोषात रक्तरंजित वळण; नाचण्याच्या वादातून २२ वर्षीय तरुणाचा खून, चौघांविरोधात गुन्हा दाखल
20
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

आम आदमी विमा योजनेचे शेकडो लाभार्थी वंचित

By admin | Updated: July 18, 2014 00:20 IST

ग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे.

अण्णाभाऊ कचाटे - मारेगावग्रामीण भागातील भूमिहीन कुटुंबातील कर्त्या व्यक्तीस विम्याचे संरक्षण देण्यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने २००७ पासून सुरू केलेल्या आम आदमी विमा योजनेचा तालुक्यात बट्ट्याबोळ होत आहे. महसूल प्रशासन व एलआयसीच्या उदासीन धोरणामुळे तालुक्यातील अनेक लाभार्थी मृत्यू दाव्यापासून अद्याप वंचितच आहे़या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील १८ ते ५९ वयोगटातील भूमिहीन शेतमजूर तसेच ज्यांच्याकडे अडीच एकर बागायती किंवा पाच एकर कोरडवाहू जमीन असेल, असे शेतकरी योजनेसाठी पात्र लाभार्थी आहे. त्यांना एलआयसी (आयडी) प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले आहे. प्रमाणपत्रधारकांचा नैसर्गिक मृत्यू झाल्यास ३० हजार रूपये, अपघाती मृत्यू किंवा अपंगत्व आल्यास ७५ हजार रूपये, अपघाताने एक डोळा किंवा एक पाय गमाविल्यास ३० हजार ५०० रूपये देण्याची योजना आहे़या योजनेत पात्र लाभार्थ्यांना विमा हप्ता भरावा लागत नाही़ केंद्र व राज्य शासनच तो भरतो. प्रमाणपत्रधारकाच्या नववी ते बारावीत शिकणाऱ्या दोन मुलांना प्रतिमहा १०० रूपये शिष्यवृत्ती देण्याचीही तरतूद आहे. या योजनेचा लाभ मिळविण्यासाठी लाभार्थ्यांना विहित नमुन्यात तलाठ्यामार्फत तहसीलदारांकडे अर्ज सादर करावा लागतो़ येथील तहसील कार्यालयाने २०१० पासून आजपर्यंत जवळपास ४३ मृत्यू दावे सर्व प्रस्तावांची प्रतिपूर्ती करून शाखा व्यवस्थापक (पी़अ‍ॅन्ड़जी़एस़) युनिट भारतीय आर्युविमा मंडळ, जीवन प्रकाश, श्रीकृष्णपेठ अमरावतीला पुढील कारवाईसाठी पाठविल्याची माहिती माहिती अधिकारात प्राप्त झाली़ आहे.तहसील कार्यालयाने सर्व प्रस्ताव पाठविले, मात्र त्यातील किती मृत्यू दावे मंजूर झाले, किती त्रुटीत निघाले, कुणाला त्याचा लाभ मिळून रक्कम प्राप्त झाली, याचा तपशील मात्र तहसीलदारांकडे उपलब्ध नाही़ तहसील कार्यालयाने या संदर्भात दोनदा पत्रे पाठवून एलआयसीला विचारणा केली़ मात्र एलआयसीने तहसीलदारांच्या पत्रांना केराची टोपली दाखविली़ त्यामुळे ही योजनाही फसवी ठरत आहे. त्याचा प्रत्यक्षात लाभार्थ्यांना लाभच मिळत नाही.