शहरं
Join us  
Trending Stories
1
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
2
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
3
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
4
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा 'झालमुरी स्टॉल', पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
5
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
6
जबलपूर क्रूझ दुर्घटनेत ५ वर्षांच्या विराजचा मृत्यू; पित्याचा आक्रोश पाहून उपस्थितांच्या काळजाचंही झालं पाणी!
7
“पश्चिम बंगालमध्ये विकासाची बुलेट ट्रेन वेगाने धावेल”; DCM शिंदेंकडून मोदी-शाह यांचे अभिनंदन
8
भीषण अपघात: सोलापूर-अक्कलकोट महामार्गावर एसटी बस आणि डंपरची जोरदार धडक; दोन प्रवाशांचा मृत्यू, डंपरने घेतला पेट
9
हिमंता बिस्वांना आव्हान दिले, पण होमग्राऊंडवरच हरले, राहुल गांधींचे सहकारी गौरव गोगोईंचा दारुण पराभव
10
भारताच्या माजी क्रिकेटपटूची राजकीय मैदानात दमदार एंट्री, बड्या नेत्याविरोधात घेतली मोठी आघाडी
11
'या' स्टॉकनं केलं मालामाल! ५ वर्षांत १४००% चं छप्परफाड रिटर्न, आज पुन्हा अपर सर्किट
12
वैशाख अंगारक संकष्ट चतुर्थी २०२६: राहु काळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, चंद्रोदयाची वेळ!
13
मोठी घडामोड! काँग्रेस केरळनंतर दुसऱ्या राज्यातही सत्तास्थापन करणार? थलापती विजयच्या वडिलांचे निमंत्रण
14
UPSC टॉपर घडवणाऱ्या शिक्षिकेचे विद्यार्थ्याकडून अपहण; १.९० कोटी लुटून हॉस्पिटलमध्ये लपला, कारण समोर
15
'सैराट'फेम अरबाज शेखने केला निकाह, कोण आहे 'सल्या'ची पत्नी? रिंकू राजगुरुनेही केली कमेंट
16
"'ट्विंकल-ट्विंकल' शिकण्यासाठी २.५ लाख द्यायचे?"; सिनियर केजीची फी पाहून पालक शॉक
17
दोन सिलिंडर, एकदाच रांगेत राहून भरा, दुप्पट फिरा...! या कंपनीने सीएनजीमध्ये सात सीटर कार लाँच केली
18
बंगालमध्ये सायनी घोष यांचं गाणंच ठरलं गेमचेंजर; भाजपला थेट सत्तेच्या खुर्चीपर्यंत पोहोचवलं
19
'खुल्लम खुल्ला प्यार' आता बंद! 'गर्लफ्रेंड कल्चर' BCCIला अमान्य, 'हे' ४ भारतीय काय करणार?
20
नक्कल करायलाही अक्कल लागते! रोहितच्या स्टाईलमध्ये बाबरचं सेलिब्रेशन; नेटकऱ्यांनी केलं ट्रोल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी व गृहकर वसुलीत ग्रामपंचायती माघारल्या

By admin | Updated: November 16, 2016 00:39 IST

ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या.

पदाधिकारी सुस्त : गावाच्या विकासावर परिणामनेर : ग्रामीण जनतेला स्वच्छ व शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी स्वतंत्र आणि प्रादेशिक नळ योजना निर्माण करण्यात आल्या. या योजनांचे नियोजन सांभाळणाऱ्या ग्रामपंचायती कर वसुलीत मात्र माघारल्या आहे. त्याचा परिणाम योजनांची देखभाल व दुरुस्तीवर होत आहे. ग्रामसेवक शासकीय योजनेचा लाभ आणि दाखला देतेवेळी कर भरण्यासंदर्भात बोलतो. परंतु इतरवेळी कर वसुलीसाठी कष्ट उचलताना दिसत नाही. पंचायत समितीचे अधिकारीही या ग्रामसेवकांना कर वसुलीसाठी तंबी देत नसल्याने पाणी कर, गृहकर वसुलीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे. ग्रामपंचायतीचा मुख्य कणा म्हणून सचिव असतो. मात्र सचिवच मुख्यालयी न राहता शहरातून ये-जा करतात. त्यामुळे नागरिकांना अनेक प्रश्नांना तोंड द्यावे लागते. नागरिकांना सर्व सोयीसुविधा मिळाव्या यासाठी ग्रामपंचायत कटीबद्ध नसल्याचे अनेक बाबीवरून दिसून येते. नागरिकांना शुद्ध पाणी मिळावे, यासाठी केंद्र व राज्य शासन अनेक महत्त्वाकांक्षी योजना राबवितात. या योजना ग्रामपंचायतींकडे हस्तांतरित करून त्याची देखभाल करण्याची जबाबदारी सोपविली जाते. याविषयात तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती बेजबाबदार बनल्या आहेत. पाण्याच्या शुद्धीकरणासाठी दिले जाणारे ब्लिचिंग पावडरही ग्रामपंचायती नेत नाही. ग्रामपंचायतींनी पाणीपट्टीची आदर्श आकारणी करून नियमित वसूल करण्याची जबाबदारी सचिवांची असते. परंतु सचिवच गावाला दांडी मारत महिन्यात दहा ते पंधरा दिवस गावात जातात. कर वसुलीला ठेंगा ग्रामसचिवच दाखवित आहे. त्यातच पदाधिकारी, गृह व पाणी कर वसुलीसाठी प्रयत्न करीत नाही.ग्रामपंचायतीने कर वसुली करून उत्पन्न वाढवावे, जेणेकरून गाव विकासाला मदत होईल, अशी भूमिका बजावत नाही. कर वसुलीसाठी ग्रामसेवक आणि पदाधिकारी पुढाकार घेत नसल्याने तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती या बाबतीत पिछाडीवर असल्याचे चित्र आहे. (तालुका प्रतिनिधी)