शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

स्वाईन फ्ल्यूचा चारशेचा डोज तब्बल चार हजारांत

By admin | Updated: March 11, 2015 01:56 IST

साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो.

यवतमाळ : साधा खोकला, ताप आला तरी स्वाईन फ्ल्यूची शंका येते. उपचारासाठी धावपळ सुरू होते. रुग्णाच्या याच मानसिकतेचा फायदा घेत अवघ्याचा चारशे रुपयाचा डोज चार हजारात दिला जातो. जिल्ह्यात हा प्रकार सुरू असून गैरसमज पसरवत रुग्णांना गंडविण्याचा गोरखधंदा काही डॉक्टरांनी सुरू केला आहे. विशेष म्हणजे शासकीय रुग्णालयात परिपूर्ण मोफत उपचार होऊन अनेक रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. संपूर्ण राज्यात स्वाईन फ्ल्यूची दहशत आहे. महानगरातील हा आजार ग्रामीण भागातही येऊ पोहोचला आहे. मात्र याबाबत अनेक गैरसमज जाणिवपूर्वक पसरविण्यात येत आहे. लहान मुलांच्या बाबतीत त्यांचे पालक दक्ष असतात. मुलांना स्वाईन फ्ल्यूपासून वाचविण्यासाठी लस निर्माण झाली असल्याची बतावणी केली जात आहे. त्यासाठी पाच ते आठ हजार रुपये मोजावे लागतली असा सल्लाही दिला जात आहे. भितीपोटी अनेक नागरिक याला बळी पडत आहे. याच संधीचा फायदा घेऊन काही डॉक्टर मंडळींनी दुुकानदारीच थाटली आहे. पुणे येथून लस आणण्याचे सांगून पैसे उकळण्याचा धंदा सुरू आहे. या उलट वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आतापर्यंत स्वाईन फ्ल्यूच्या १८ संशयीत रुग्णांवर उपचार करण्यात आला. महत्वाचे म्हणजे याच रुग्णालयात कार्यरत निवासी डॉक्टर आणि स्टाफ नर्सला स्वाईन फ्ल्यूची लागण झाली होती. त्यांना रुग्णालयात आठ दिवस भरती ठेवून त्यांच्यावर यशस्वी उपचार करण्यात आला. त्यामुळे नागरिकांनी न घाबरता थेट शासकीय रुग्णालयातच उपचार घ्यावा असे आवाहन वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांकडून केले जात आहे. (कार्यालय प्रतिनिधी)खासगी रुग्णालयात प्रतिबंधक लस उपलब्ध नाहीस्वाईन फ्ल्यू प्रतिबंधक लसीचा वापर केवळ अती जोखमीच्या वातावरणात राहणाऱ्यांसाठी केला जात आहे. शासनाकडून डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांसाठी ही लस दिली आहे. खासगीत ही लसच उपलब्ध नाही. तसेच सर्दी, ताप, खोकला असलेल्या व्यक्तीला लस देऊनही कोणताच फायदा होत नाही. जास्त प्रोटीन असलेले पदार्थ सेवन केल्यास रोगप्रतिकार शक्ती वाढविता येते.अशी घ्या दक्षतापाच वर्षा आतील बाळ, ६५ वर्षावरील व्यक्ती आणि गरोदर मातांनी यांनी विशेष दक्षता घेण्याची गरज आहे. याशिवाय ज्यांना टीबी, दमा, रक्तदाब, किडणी, हृदयाचे आजार असलेल्या व्यक्तींनी सुध्दा गर्दीच्या ठिकाणी जाण्याचे टाळावे. शक्यतो हस्तांदोलन करून नये, सर्दी, खोकला, ताप असलेल्या व्यक्तीशी संर्पक टाळावा.ज्या व्यक्तींना सर्दी, ताप, खोकला यासाठी अ‍ॅटीबायोटिकचा दोन दिवसांचा डोज घेऊनही आराम पडत नाही, अशाच व्यक्तीने टॅमीफ्ल्यूचा डोज घ्यावा. ज्यांना सात दिवसापेक्षा अधिक काळ खोकला, ताप, सर्दी आहे. अशा व्यक्तींना टॅमीफ्ल्यू घेण्याची गरज नाही. पहिल्या दोन दिवसानंतरही ३८ डीग्रीपेक्षा अधिक ताप असलेल्या व्यक्तीला टॅमीफ्ल्यू देणे आवश्यक आहे. ज्यांना श्वास घेण्यास त्रास होतो, शरीरातील आॅक्सीजन कमी होऊन त्वचेचा रंग निळसर येतो असा रुग्ण अतिशय जोखमीत मोडतो. - डॉ. बाबा येलके, विभाग प्रमुख औषधशास्त्र वसंतराव नाईक शासकीय महाविद्यालय