शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
2
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
3
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
4
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
5
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
7
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
8
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
9
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
10
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
11
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
12
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
13
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
14
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
15
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
16
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
17
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
18
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
19
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
20
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून धुमसतेय करकडोह शिवारातील जंगल, यंत्रणेचे प्रयत्न विफल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2022 05:00 IST

वणवा नियंत्रणासाठी थेट सॅटेलाइटवरून लक्ष ठेवले जाते. २४ तास वन कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. दर दोन तासाने वणव्याबाबतचा अलर्ट दिला जातो. तसा अहवाल काढण्यात येतो. असे असले तरी एकदा आग जंगलात भडकली, तिला नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सध्या ब्लोअर मशीनच्या माध्यमातून वन विभागाची यंत्रणा आग नियंत्रणाचा प्रयत्न करते.

लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : उन्हाचा पारा भडकताच शहरासह जिल्ह्यात आगीच्या घटनाही सातत्याने वाढत आहेत. शहरालगतच्या जंगली भागात वणव्याने पेट घेतला. वन विभागाची यंत्रणा अलर्ट असल्याने घटनास्थळी पोहोचली. आग विझविण्याचा प्रयत्न केला. मदतीला नगरपालिकेचे अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मात्र, चार दिवसांपूर्वी विझलेला वणवा शनिवारी दुपारी पुन्हा भडकला. वणवा नियंत्रणासाठी थेट सॅटेलाइटवरून लक्ष ठेवले जाते. २४ तास वन कार्यालयात नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला आहे. दर दोन तासाने वणव्याबाबतचा अलर्ट दिला जातो. तसा अहवाल काढण्यात येतो. असे असले तरी एकदा आग जंगलात भडकली, तिला नियंत्रित करण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. सध्या ब्लोअर मशीनच्या माध्यमातून वन विभागाची यंत्रणा आग नियंत्रणाचा प्रयत्न करते. जंगलात पालापाचोळा भरपूर पडून असल्याने कुठल्याही कारणाने वणवा भडकू शकतो. साधारणत: शेतकरी उन्हाळ्यात मशागतीपूर्वी धुऱ्यावरील काडीकचरा पेटवून स्वच्छ करतात. यातूनही वणवा लागण्याची भीती असते. चार दिवसांपूर्वी करकडोह शिवारात वन विकास महामंडळ व वन विभागाच्या जंगलात आग लागली. ती नियंत्रणात आली. शनिवारी पुन्हा ही आग पसरायला लागली. नियंत्रणासाठी अग्निशमन बंब बोलाविण्यात आले. तोपर्यंत आग शेतात पोहोचली हाेती. 

 शेतीउपयोगी ६० हजारांचे साहित्य जळून खाक- करकडोह पोड येथील धर्माजी कुंभेकार यांच्या गावठाणाजवळील शेतात वणवा पोहोचला. आगीने शेतातील गोठ्याला कवेत घेतले. गुरांसाठी साठविलेले कुटार जळून खाक झाले. याशिवाय औतभांडी, तुषार संचही जळाले. तब्बल ६० हजारांचे नुकसान झाले. आग विझविण्यासाठी नगरसेवक विजय खडसे यांनी अग्निशमन विभागाशी संपर्क केला. घटनास्थळी तलाठी कुरसंगे यांनी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला. 

 

टॅग्स :forestजंगलfireआग