शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

अखेर साखर कारखाना विकला

By admin | Updated: February 29, 2016 02:08 IST

शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली.

४३ कोटी ९५ लाख किंमत : उस्मानाबाद जिल्ह्यातील नॅचरल शुगरचा ताबा महागाव : शेतकऱ्यांच्या घामातून उभा राहिलेला तालुक्यातील गुंज येथील सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखान्याची अखेर थकीत कर्जापोटी राज्य बँकेने विक्री केली. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शुगर अ‍ॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. कंपनीने हा कारखाना ४३ कोटी ९५ लाख रुपये किमतीत विकत घेतला. पुसद-महागाव उपविभागातील शेतकरी कारखानदार व्हावा या उद्देशाने माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या प्रयत्नाने गुंज येथे सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला होता. या कारखान्यामुळे शेकडो हातांंना काम मिळाले होते. परंतु अंतर्गत राजकारण आणि विविध कारणांनी हा साखर कारखाना डबघाईस आला. अखेर त्यावर अवसायक नेमण्यात आला. राज्य बँकेने आपल्या कर्जाच्या वसुलीसाठी त्यावर ताबा मिळविला. त्यानंतर या कारखान्याच्या विक्रीची प्रक्रिया सुरू झाली. २६ फेब्रुवारी रोजी कारखाना विक्रीची निविदा मुंबई येथील महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या मुख्य कचेरीत उघडण्यात आली. कारखाना विक्रीची अपेक्षित किंमत राज्य बँकेने ४३ कोटी ६४ लाख रुपये ठेवली होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील राजनी येथील नॅचरल शूगरने ४३ कोटी ९५ लाख रुपये रकमेची निविदा भरल्यामुळे हा कारखाना या कंपनीला विकला गेला. ४३ कोटी ९५ लाख रुपयांची मशनरी, कारखान्याची जमीन अन्य साहित्य विकले गेले आहे. विशेष म्हणजे या कंपनीने कर्मचारी पगार, अकृषक कराचा भरणा, पाणी कर अन्य देणे लावून घेतल्यामुळे खरेदीची किंमत ५३ कोटीपर्यंत गेली आहे. कारखाना खरेदीची एकच निविदा आल्यामुळे अपेक्षित किंमतीच्या आगावू रकमेचा भरणा केल्याने नॅचरल शूगरला हा कारखाना देण्यात आला. नॅचरल शूगरही मोठी कंपनी असून कंपनीजवळ पाच हजार मेट्रिक टन गाळप क्षमतेचा साखर कारखाना आहे. या कारखान्याचे अनेक उत्पादनेही आहेत. त्याच धर्तीवर सुधाकरराव नाईक साखर कारखाना चालविण्याचा कंपनीचा मानस आहे. मुबलक पाणी आणि गाडी बैलाचे संपूर्ण क्षेत्र असल्याने या कारखान्यात पुढल्या वर्षीच उत्पादन सुरू होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. (शहर प्रतिनिधी) सुधाकरराव नाईक सहकारी साखर कारखानामहागावपासून अवघ्या १२ किलोमीटर अंतरावर सुधाकरराव नाईक साखर कारखाना आहे. हा साखर कारखाना गत पाच वर्षांपासून बंद आहे. मध्यंतरी या कारखान्यावर आणलेली जप्ती शेतकऱ्यांनी हाणून पाडली होती. परंतु त्यानंतर मुंबईत झालेल्या बैठकीत उपविभागातील नेत्यांनी हा कारखाना राज्य बँकेच्या ताब्यात दिला. त्यांनी आपल्या थकीत कर्जासाठी कारखाना विक्रीस काढला. त्यावेळी नेत्यांनी या कारखान्याची विक्री होऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली. परंतु अखेर हा कारखाना खासगी कंपनीला विकला गेला.