शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
5
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
6
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
7
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
8
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
9
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
10
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
11
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
12
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
13
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
14
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
15
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
16
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
17
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
18
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
19
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
20
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
Daily Top 2Weekly Top 5

भूजल संरक्षण करण्याची संधी हुकण्याची भीती

By admin | Updated: June 1, 2016 00:15 IST

शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आल्याने, लोकसहभाग मिळवून ठिकठिकाणी भूजल संरक्षण, भूजल...

पुढाकाराचा अभाव : राळेगाव तालुक्यात शासकीय व राजकीय पातळीवर हालचाली संथराळेगाव : शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेण्यात आल्याने, लोकसहभाग मिळवून ठिकठिकाणी भूजल संरक्षण, भूजल संवर्धनाची कामे सुरू होऊन लोकचळवळीचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यास यश येऊन आगामी पावसाळ्यात त्या-त्या क्षेत्रात पाणीसाठा वाढून भूजल पातळी वाढणार आहे. भविष्यातील पाणीटंचाई संपून विविध स्रोतात उपलब्ध पाणीसाठ्याचा वापर शेतीच्या सिंचनाकरिताही होऊ शकणार आहे. मात्र यासाठी तालुक्यात शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकाराचा अभाव आहे. वेळीच सावध न झाल्यास भूजल संरक्षणाची संधी हुकण्याची भीती आहे. उन्हाळ्याचे तीन महिने संपत येत असताना राळेगाव तालुक्यात शासकीय पातळीवर विशेषत: कृषी विभागामार्फत सुरू असलेल्या पाच गावातील दहा कामे, जलशिवारची कामे, मागेल त्याला शेततळे या मोजक्या आणि लोकसहभागातून लोहारा येथे झालेल्या गाळ काढण्याच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त इतर कोणतीही दखलपात्र कामे सुरू झालेली नाही. पावसाळ्यापूर्वी शासकीय व राजकीय पातळीवर पुढाकार घेतल्यास जलसंग्रह होऊ शकेल. अन्यथा पाणी वाहून जावून पुढील काळात पाणीटंचाईसह विविध प्रश्नांना तोंड देण्याची वेळ येणार आहे. तालुक्यात आजच्या स्थितीत वर्धा, रामगंगा नदी, दोन डझनावर नाले, डझनभर तलाव आटलेले आहेत. अनेक गावात विहिरी कोरड्या पडल्या आहे. काही ठिकाणी तळ गाठला आहे. हातपंपही त्याच मार्गावर आहे. भूजलपातळी २०० फुटांपेक्षा अधिक खोल गेली आहे. काही ठिकाणी २५०-३०० फूट खोल बोअर करूनही पाणी लागत नाही. अशी विपरित परिस्थिती असताना त्यापासून बोध घेत जलसंधारण, जलसंरक्षण आणि जलसंवर्धनाची कामे मोठ्या प्रमाणावर सुरू होतील, अशी अपेक्षा होती. पण अद्यापपर्यंत तरी काही ठोस हालचाली झालेल्या दिसत नाही. शासकीय आदेश नाही, कोणी करावयाचे, खर्च कसा व कोठून करावयाचा यावरच हात टेकण्यात आले आहे. जिल्हा परिषदेने आदेश दिल्यास जिल्हा परिषदेतील १२६ शाळा, ७३ ग्रामपंचायती, १२८ गावातील अंगणवाड्या, ३२ प्राथमिक आरोग्य उपकेंद्र, चार प्राथमिक आरोग्य केंद्र, नऊ पशुचिकित्सालये, पंचायत समिती कार्यालयाच्या इमारती, पंचायत समिती कर्मचाऱ्यांची १५ निवासस्थाने, जिल्हा परिषद विश्रामगृह, पाणीपुरवठा विभाग, तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी रेन वॉटर हार्वेस्टिंग होऊ शकते. बहुतांश विभागाचा परिसर एक एकरापेक्षा अधिक विस्तीर्ण असल्याने वाहून जाणारे पाणी मुरविण्याचे नियोजन केले जाऊ शकते. तालुक्यात शासनाची ५० हून अधिक कार्यालय आहे. तीन महाविद्यालये, १३ कनिष्ठ महाविद्यालये, महत्त्वाच्या मोठा परिसर व इमारती असलेल्या डझनावर सहकारी संस्था आहेत. इंग्रजी शाळा, सहकारी बँकेच्या शाखा आहेत. त्यांनी स्वयंस्फूर्तीने जलसंवर्धनाचे व्रत स्वीकारल्यास भविष्यातील पाण्याचे संकट दूर-दूरपर्यंत टळू शकते. (तालुका प्रतिनिधी)