शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्ली आंदोलन समर्थनार्थ शेतकऱ्यांनी रात्र जागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधातील जुल्मी कायदे लागू केले. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. ...

ठळक मुद्देआझाद मैदान : मेणबत्या लावून केंद्राचा निषेध

  लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधातील जुल्मी कायदे लागू केले. यामुळे शेतकरी देशोधडीला लागणार आहे. केंद्र शासनाच्या कायद्याविरोधात आवाज उठवित स्वाभिमानी शेतकरी संघर्ष समितीने गुरुवारी रात्री ठिय्या आंदोलन केले. स्थानिक आझाद मैदानावर झालेल्या आंदोलनाला असंख्य शेतकऱ्यांनी पाठिंबा दिला. दिल्लीत देशभरातील शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासोबतच स्थानिक शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने यवतमाळात गुरुवारी आंदोलन केले. यावेळी संघटनेने जिल्ह्यात उद्‌भवलेल्या गुलाबी बोंड अळीच्या प्रश्नावर प्रशासनाला नुकसानभरपाई देण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांना राज्य शासनाने प्रती हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत द्यावी, असे मतही मांडण्यात आले आहे. कृषीपंपासाठी दिवसा १२ तास वीज मिळावी, खरीप हंगामातील बोगस बियाण्यामध्ये दाखल झालेल्या तक्रारी प्रकरणात खासगी कंपन्यांकडून मदत मिळावी, राज्य शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, जिल्ह्यातील नऊ लाख हेक्टरवरील सर्व पिकांना सरसकट प्रधानमंत्री पीक विमा लागू करावा यासह विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांचे जागर आंदोलन पार पडले. यावेळी संघटनेचे जिल्हा नेते मनीष जाधव, अनुप चव्हाण, गजानन अमदाबादकर, सिकंदर शहा, युवा जिल्हाध्यक्ष शिवानंद राठोड, महागाव तालुका अध्यक्ष मंगल राठोड यांच्यासह अनेक जण यावेळी उपस्थित होते. शेतकरी पुत्रांचा मोर्चाशुक्रवारी शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधात मोर्चा काढला. स्थानिक आर्णी नाक्यावरून निघालेला हा मोर्चा थेट बसस्थानक चौकात पोहोचला. यावेळी मोर्चेकऱ्यांना मधातच रोखण्यात आले. मोर्चेकऱ्यांनी मोदी सरकारच्या विरोधात नारेबाजी केली. काळे कायदे रद्द करण्याची मागणी केली. यावेळी स्थानिक शेतकऱ्यांची कायद्यामुळे पिळवणूक होणार असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. आंदोलकांनी दिवसभर स्थानिक बसस्थानक चौकात ठिय्या दिला. यावेळी प्रा. प्रवीण देशमुख, किसान कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवानंद पवार, नगरसेवक नितीन मिर्झापुरे, नगरसेवक चंदू चौधरी, उमेश इंगळे, अतुल राऊत, अरुण ठाकूर, घनश्याम अत्रे, सुरज खोब्रागडे यांच्यासह अनेक जण आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी पोलीस तैनात होते. विविध समाज-संघटनांची     आज मोटरसायकल रॅली भारतीय पिछडा शोषित संघटन, मराठा सेवा संघ, सत्यशोधक स्टडी सर्कल, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, गुरु रविदास विचारमंच स्मारक समिती, स्मृतीपर्व महिला समिती, अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती, जमाते इस्लामे हिंद, यवतमाळ अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद, आंबेडकरी साहित्य व कला अकादमी यांच्या संयुक्त विद्यमाने किसान आंदोलनाच्या समर्थनार्थ मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. ही रॅली शनिवारी ५ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता संविधान चौकापासून प्रारंभ होणार आहे. महात्मा फुले चौकात या रॅलीचा समारोप होणार आहे.

टॅग्स :Farmerशेतकरीagitationआंदोलन