शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: मुंबईत भाजपाचा झालमुरी स्टॉल, पश्चिम बंगाल विजयाचं हटके सेलिब्रेशन
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
5
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
6
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
7
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
8
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
9
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
10
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
11
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
12
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
13
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
14
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
15
विजयचा झंझावात एवढा की...! मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन देखील आपली सीट वाचवू शकले नाहीत; TVK चे व्ही. एस. बाबू 'जायंट किलर'
16
IAS Aastha Singh : प्रेरणादायी यशोगाथा! आजोबांनी दाखवलं स्वप्न; अवघ्या २१ व्या वर्षी कोचिंगशिवाय आस्था बनली IAS
17
दिवसाला ८ तास कुलर चालवताय? मग महिन्याला किती वीज बिल येईल? वॉटनुसार जाणून घ्या खर्च!
18
IPL 2026 Points Table : प्लेऑफ्सच्या शर्यतीत कमालीचे ट्विस्ट! कोण टिकणार? कोणाचा प्रवास संपणार?
19
पश्चिम बंगाल, तामिळनाडूने बदललं देशाचे राजकारण; इंडिया आघाडीच्या भवितव्यावरही प्रश्न
20
NTR, MGR ते जयललिता..; 'या' सुपरस्टार्सनी मुख्यमंत्रिपदापर्यंत मारलेली मजल, पाहा यादी...
Daily Top 2Weekly Top 5

पुनर्मोजणीतून शेतकऱ्यांना मिळणार दिलासा

By admin | Updated: October 10, 2015 02:02 IST

शेतजमिनीच्या मोजणीबाबतची अनेक प्रकरणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे मारूनही अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वाद मिटलेले नाही.

विवेक ठाकरे दारव्हाशेतजमिनीच्या मोजणीबाबतची अनेक प्रकरणे जिल्ह्यात प्रलंबित आहेत. भूमिअभिलेख कार्यालयाकडे हेलपाटे मारूनही अनेक शेतकऱ्यांचे शेतीचे वाद मिटलेले नाही. आता शासनाने राज्यभरातील जमिनीच्या पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे, सर्व प्रथम ‘लोकमत’ने ‘ब्रिटिशकालीन नकाशावर भूमिअभिलेखचा कारभार’ या मथळ््याखाली वृत्त प्रकाशित करून जमिनीच्या पुनर्मोजणीची गरज शासनाच्या निदर्शनास आणून दिली होती. या वृत्ताची दखल घेत शासनाने पुनर्मोजणीचा निर्णय घेतला आहे. शेतजमिनींची हद्ददर्शक दगड व उरुळ्या नष्ट झाल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये धुऱ्याबाबतचे वाद सुरू आहेत. जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर अशी प्रकरणे भूमिअभिलेख कार्यालयाकडे प्रलंबित आहेत. राज्यातील जमिनींचा सर्वे स्वातंत्र्यपूर्व काळात झाला होता. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण यामुळे मूळ धारण जमिनीचे मोठ्या प्रमाणात हस्तांतरण झाले. भूमिअभिलेख नकाशे आणि अधिकार अभिलेख यात मेळ राहिलेला नाही. परिणामी अनेक ठिकाणी वाद निर्माण झाले आहेत. याबाबीचा विचार करून शासनाने पुनर्मोजणी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे यात आधुनिक हायब्रीड तंत्रज्ञानाचा वापर करून मोजणी व नकाशांचे डीजीटायझेशन करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील जमिनींसाठी पुनर्मोजणी प्रकल्प राबविताना प्रथम प्रत्येक महसूली विभागात एक जिल्हा याप्रमाणे पुणे, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर आणि रायगड या सहा जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे. यात मूळ भूमापन नकाशांचे डिजीटायझेशन करण्यासाठी ३८.७९ कोटी, जी.सी.पी.एन. उभारणे व त्यांचे अक्षांश, रेखांश निश्चित करण्यासाठी १०० कोटी प्रत्यक्ष मोजणी खर्च भागविण्यासाठी ९०.०६ कोटी, आस्थापना व इतर अनुषंगिक खर्चासाठी ६४.७४ कोटी अशा २९३.६१ कोटीच्या निधीस मान्यता देण्यात आली आहे.