शहरं
Join us  
Trending Stories
1
प. बंगालच्या मुख्यमंत्रिपदी कोण? टीव्हीवरून घराघरात पोहोचलेल्या अभिनेत्रीचं नाव चर्चेत...
2
Election Results 2026 LIVE: "बंगालच्या विकासासाठी भाजप आता कोणतीही कसर सोडणार नाही"; ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींची प्रतिक्रिया
3
CM फडणवीसांनी केले श्यामाप्रसाद मुखर्जींचे स्मरण; म्हणाले, “प. बंगालचा खरा पक्ष भाजपाच...”
4
निकालाची धाकधूक, दिवसभर दुकान बंद ठेवले, भाजपा विजयी होताच पुन्हा उघडले; झालमुडी विक्रेता म्हणाला…
5
Travel : जगात फक्त 'या' ५ देशांची नावं 'D' वरून होतात सुरू; ट्रॅव्हलर्ससाठी इथली ठिकाणं आहेत स्वर्ग!
6
Ravi Kishan : Video - "आज बंगाल स्वतंत्र झाला... आता मोकळा श्वास घेईल"; रवी किशन यांनी व्यक्त केला आनंद
7
MI vs LSG : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! हार्दिकच्या जागी सूर्या टॉसला आला; रोहितचं कमबॅक, कारण...
8
ममता बॅनर्जींची सत्ता गेली! पराभवानंतर अभिषेक बॅनर्जींची पहिली प्रतिक्रिया; मतमोजणीवर उपस्थित केले गंभीर प्रश्न
9
Video: अंदमानच्या अथांग समुद्रात फडकवला तिरंगा! 'अंडरवॉटर' ध्वजारोहणाचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड
10
पाच राज्यांचे निकाल, काँग्रेसच्या पदरात काय? कोणत्या राज्यात किती जागा मिळाल्या?
11
“केरळच्या सुज्ञ जनतेची काँग्रेसचा विचार, राहुल गांधींच्या नेतृत्वाला साथ”: हर्षवर्धन सपकाळ
12
कैलास मानसरोवर यात्रेत नेपाळचा 'खो'! बालेन शाह सरकारने भारत अन् चीनला धाडलं पत्र; नेमकं प्रकरण काय?
13
दीदींना हरवणं सोपं नव्हतं, पण…; भाजपाने पश्चिम बंगाल जिंकण्याचं स्वप्न कसं केलं साकार? १० निर्णायक मुद्दे
14
ममता बॅनर्जींनी रोखलेल्या...! भाजप सत्तेत आल्याने पश्चिम बंगालमध्ये या ७ योजना लागू होणार; गरिबांना मिळणार मोठा दिलासा
15
पार्टीचा बहाणा अन् दारूत सल्फास; १० वर्षांचा संसार संपवून पत्नी प्रियकरासोबत पळाली, ८ दिवसांनी उघड झालं गुपित
16
थलपती विजयच्या ड्रायव्हरचा मुलगा झाला आमदार! तिकीट मिळालं तेव्हा स्टेजवर ढसाढसा रडला होता...
17
Kangana Ranaut : राहुल गांधींसोबतच्या लग्नाच्या अफवेवर कंगना राणौत संतापली; म्हणाली, "लाज वाटली पाहिजे"
18
जागतिक खळबळ: अमेरिकन युद्धनौकेवर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला; दोन मिसाईल डागली, शस्त्रसंधी तुटली, युद्धाला पुन्हा तोंड फुटणार
19
दोन वर्षातच पश्चिम बंगालमध्ये असं काय बदललं की ममता बॅनर्जींना सत्तेवरून जावं लागलं?
20
भवानीपूर: ममता बॅनर्जी अन् सुवेंदू अधिकारी एकाचवेळी मतमोजणी केंद्रावर; मोठ्या प्रमाणावर पोलीस फोर्स तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अत्याचाराची खोटी तक्रार देणे भोवले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2019 06:00 IST

न्यायालयात सुनावणी दरम्यान या महिलेने खोटी तक्रार देऊन पोलीस विभागाला निष्कारण वेठीस धरल्याचे, शासकीय पैसा व यंत्रणेचा वेळ खर्ची घातल्याचे निदर्शनास आले. न्यायालयाने महिलेने दिलेली तक्रार ११ जून रोजी रद्द केली. मात्र यातील तक्रारदार व आरोपी यांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला.

ठळक मुद्देउच्च न्यायालय : ठोठावला ५० हजारांचा दंड, पोलीस कल्याण निधीत रक्कम वळती

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लैंगिक अत्याचाराची खोटी तक्रार देणे महिलेसह दोघांना चांगलेच महागात पडले. या दोघांना नागपूर उच्च न्यायालयाने प्रत्येकी २५ हजारांचा दंड ठोठावला असून तो यवतमाळ जिल्हा पोलिसांच्या कर्मचारी कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले आहे.प्रकरण असे की, जानेवारी २०१९ मध्ये आर्णी पोलीस ठाण्यात एका महिलेने लग्नाचे आमिष देऊन आपल्यावर अत्याचार केल्याबाबतची तक्रार नोंदविली होती. त्यावरून आर्णी पोलिसांनी बलात्कार व अ‍ॅट्रोसिटीचा गुन्हा नोंदविला. त्यानंतर काही दिवसातच यातील आरोपी व तक्रारदार महिलेने पोलिसातील तक्रार रद्द करावी म्हणून नागपूर उच्च न्यायालयात अर्ज केला. न्यायालयात सुनावणी दरम्यान या महिलेने खोटी तक्रार देऊन पोलीस विभागाला निष्कारण वेठीस धरल्याचे, शासकीय पैसा व यंत्रणेचा वेळ खर्ची घातल्याचे निदर्शनास आले. न्यायालयाने महिलेने दिलेली तक्रार ११ जून रोजी रद्द केली. मात्र यातील तक्रारदार व आरोपी यांना प्रत्येकी २५ हजार प्रमाणे एकूण ५० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंडाची ही रक्कम पोलीस अधीक्षक यवतमाळ यांच्याकडे कर्मचारी कल्याण निधीमध्ये जमा करण्याचे आदेश न्यायालयाने दिले. सदर धनादेश न्यायालयातून पोलीस विभागाला प्राप्त झाला आहे.जिल्ह्यात पहिल्यांदाच खोट्या तक्रारदाराचा खुद्द न्यायालयानेच पर्दाफाश करून त्यांना दंड ठोठावल्याची घटना घडली आहे. या निर्णयाचे पोलीस दलात स्वागत होत असून न्यायालयाच्या दणक्याने खोट्या तक्रारी नोंदविण्याचे प्रमाण कमी होईल, अशी अपेक्षा पोलीस यंत्रणेतून व्यक्त केली जात आहे.

 

टॅग्स :Courtन्यायालय