शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासमोर नवं आव्हान, तेल कुठून आणायचं?; रशिया-इराण तेल निर्बंधावरील सूट अमेरिकेने हटवली
2
Top Marathi News LIVE Updates: १८-१९ एप्रिलपर्यंत उन्हाच्या झळा, नंतर पावसाच्या सरी! काळजी घ्या...
3
केवळ ४ वर्षांपर्यंत भरावा लागेल प्रीमिअम, नंतर मिळणार १ कोटींचं बेनिफिट; कोणती आहे LIC ची ही स्कीम?
4
डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणशी शांतता चर्चा करणार? म्हणाले, “मी पाकिस्तानात जाण्यास तयार”
5
Share Market: शेअर बाजाराची सुस्त सुरुवात! Sensex मध्ये किरकोळ तेजी, तर Nifty घसरला; ITC आणि अदानी एन्टरप्रायझेसचे शेअर्स चमकले
6
होर्मुजच्या सामुद्रधुनीत जहाजांवरील हल्ले खपवून घेणार नाही! भारताचा संयुक्त राष्ट्रात इशारा; सुरक्षेसाठी आक्रमक भूमिका
7
Pakistan Explosion: पाकिस्तानमध्ये भीषण स्फोट! ८ जण ठार, अनेकजण होरपळले, नेमकं काय घडलं?
8
दोन सख्ख्या भावांची एकच बायको; १० महिन्यांनी झालं बाळ; बाप झाल्यावर काय म्हणाले दोघं भाऊ?
9
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
10
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
11
राजू शेट्टींनी घेतली हर्षवर्धन सपकाळांची भेट; कोकणातील शेतकरी आंदोलनाला काँग्रेसचा पाठिंबा
12
विशेष लेख: शेकडो दावेदार अन् होणार ३६ नवे आमदार !
13
कुठे गायब झाली नाशिकची निदा खान? अखेर लोकेशन मिळालं! कुटुंबियांकडून महत्त्वाची माहिती समोर
14
आजचा अग्रलेख: महिला आरक्षणाचा राजकीय खेळ
15
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
16
मुकेश अंबानींना मागे टाकलं, Gautam Adani बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती; किती झाली नेटवर्थ?
17
"दोन घटस्फोट, जुळ्या मुलींचा जन्म...", धर्मांतर केल्याने ट्रोल झालेली अभिनेत्री; आता म्हणाली...
18
IPL 2026: सरपंच साहेब श्रेयस अय्यरचा मोठा पराक्रम! एकाच सामन्यात धोनी- रोहितला टाकलं मागं
19
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
20
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
Daily Top 2Weekly Top 5

अखेर उमरखेडमध्ये गणेश विसर्जन

By admin | Updated: September 9, 2014 23:59 IST

दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक आणि गणेश भक्तांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शहरातील गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेवटी पोलीस प्रशासनाने आरोपींना

तोडगा निघाला : बेमुदत बंदही मागे, नेत्यांची यशस्वी मध्यस्थीउमरखेड (कुपटी) : दगडफेक करणाऱ्या आरोपींना अटक आणि गणेश भक्तांवरील गुन्हे मागे घेण्याच्या मागणीसाठी शहरातील गणेश विसर्जन न करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. शेवटी पोलीस प्रशासनाने आरोपींना अटक करण्याचे आश्वासन दिल्याने शहरात गणरायाचे विसर्जन करण्यात आले. तसेच तीन दिवसांपासून सुरू असलेला बंद ही मागे घेण्यात आला. उमरखेड येथे गणेश स्थापनेच्या मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामध्ये परस्पर विरोधी तक्रारीवरून उमरखेड पोलिसांनी गुन्हे दाखल केले होते. तक्रारीनुसार संबंधित आरोपीस अटक न केल्याने तीन दिवस शहरातील बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. तसेच गणेश विसर्जन न करण्याचाही निर्णय घेतला होता. यामुळे शहरात तणाव सदृश्य वातावरण निर्माण झाले होते. तोडगा काढण्यासाठी आमदार संजय राठोड, आमदार विजय खडसे, माजी खासदार सुभाष वानखडे, औदुंबर गणेश उत्सव समितीचे अध्यक्ष अ‍ॅड़ संजय जाधव, नितीन भुतडा, रमेश चव्हाण, माजी आमदार प्रकाश देवसरकर, व्यापारी संघटनेचे नारायण भट्टड, राजू जयस्वाल, सुरेश माहेश्वरी, नंदकिशोर अग्रवाल, पप्पू जयस्वाल यांनी पुढाकार घेतला. प्रशासनासोबत चर्चा करून तोडगा काढण्यात आला. विसर्जन होताच आरोपींना अटक करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यामुळे बंद मागे घेऊन गणेशाचे विसर्जन केले. यावेळी जिल्हाधिकारी राहूलरंजन महिवाल, पोलिस अधीक्षक संजय दराडे, अपर पोलीस अधीक्षक जानकीराम डाखोरे, उपविभागीय अधिकारी दीपक सिंगला, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील, तहसीलदार सचिन शेजाळ उपस्थित होते. पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. (वार्ताहर)