शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

वाहन चोरांच्या टोळीतील आठ अटकेत, १४ वाहने जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 06:00 IST

शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव (२१), राहूल किसन कुरसंगे (२५) सर्व रा. आसोला या सहकाऱ्यांची नावे सांगितली.

ठळक मुद्देदोन टोळ्या : अवधूतवाडी, शहर पोलिसांची एकाच वेळी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरातील प्रमुख दोन्ही पोलीस ठाण्यांच्या हद्दीत सातत्याने दुचाकी चोरीचे गुन्हे घडत आहे. याच पार्श्वभूमीवर अवधूतवाडी व शहर पोलिसांच्या शोध पथकाला मोठे यश हाती लागले. दोन टोळ्यांकडून १४ दुचाकी जप्त करण्यात आल्या.शहर ठाण्याचे शोध पथक आझाद मैदान परिसरात असताना तेथे गोपाल शालिक आडे (२५) रा. तळेगाव ता. दारव्हा हा संशयास्पद स्थितीत आढळला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली देत दयाराम नेमीचंद राठोड (३०), संदीप शामराव राठोड (३३), योगेश मारोती जाधव (२१), राहूल किसन कुरसंगे (२५) सर्व रा. आसोला या सहकाऱ्यांची नावे सांगितली. तसेच धामणगाव-नागपूर बायपासजवळ पुलाखाली लपवून ठेवलेल्या चोरीच्या आठ दुचाकी काढून दिल्या. ही कारवाई ठाणेदार धनंजय सायरे यांच्या मार्गदर्शनात, सहायक निरीक्षक रामकृष्ण भाकडे, गजानन क्षीरसागर, रवी आडे, अमित कदम, मिलिंद दरेकर, अल्ताफ शेख, अंकुश फेंडर, राजकुमार कांबळे यांनी केली.दरम्यान अवधूतवाडी ठाण्यातील शोध पथकालाही भोसा परिसरात एका ठिकाणी सहा दुचाकी ठेऊन असल्याची माहिती मिळाली. त्यांनी पाळत ठेऊन तेथे दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले. त्यांनी शहरातूनच दुचाकी चोरल्याची कबुली दिली. तर चोरलेल्या चार दुचाकीचे सुटे भाग भंगारात विकल्याचे सांगितले. ही कारवाई ठाणेदार आनंद वागतकर यांच्या मार्गदर्शनात शोध पथकाचे सहायक निरीक्षक विवेक देशमुख, सुरेश मेश्राम, ऋतुराज मेडवे, सुधीर पुसदकर, सलमान शेख, सागर चिरडे यांनी केली. सुटे भाग विकत घेणाऱ्या विक्रेत्याचा शोध पोलीस घेत आहे. या दोन्ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर यांच्या मार्गदर्शनात करण्यात आल्या. सातत्याने दोन्ही ठाण्यांमध्ये घरफोडीच्या गुन्ह्यांची नोंद होत असल्याने टीका होत असलेल्या पथकांनी दुचाकी चोरीचा उलगडा केल्याने समाधान व्यक्त होत आहे. घरफोड्यांचे मात्र आव्हान कायम आहे.

टॅग्स :Thiefचोरbikeबाईक