शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

सावळी वनविभागाला भ्रष्टाचाराची वाळवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2019 5:00 AM

या जंगलात मौल्यवान सागवान वृक्षे आहेत. त्यांची देखरेख करण्यासाठी दोन चौकीदार आहे. वन विभागाच्या रेकॉर्डवर दोन चौकीदार असल्याची नोंद आहे. त्या दोघांचे वेतनही नियमित निघत आहे. मात्र प्रत्यक्षात एकच चौकीदार कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे.

ठळक मुद्देखुलेआम वृक्षतोड : चौकीदारांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह

राजेश कुशवाह ।लोकमत न्यूज नेटवर्कआर्णी : तालुक्यातील सावळी दक्षिण वन विभागाला भ्रष्टाचाराची वाळवी लागली.या क्षेत्रात सुमारे तीन हजार एकरात जंगल पसरलेले आहे. मात्र खुलेआम लाकूड तोड सुरू आहे.या जंगलात मौल्यवान सागवान वृक्षे आहेत. त्यांची देखरेख करण्यासाठी दोन चौकीदार आहे. वन विभागाच्या रेकॉर्डवर दोन चौकीदार असल्याची नोंद आहे. त्या दोघांचे वेतनही नियमित निघत आहे. मात्र प्रत्यक्षात एकच चौकीदार कार्यरत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा प्रकार सुरू आहे. सावळीमध्ये वन विभागाच्या तीन राउंडमध्ये मोठ्या प्रमाणात रोपवन लागवड करण्याचे नियोजन होते. या रोपवन लागवडीसाठी मार्च महिन्यात खड्डे करण्यात आले. जून महिन्यात वृक्ष लागवड होणे अपेक्षित होते. प्रत्यक्षात जुलै महिन्यात खड्ड्यात माती भरण्यात आली. त्यात प्रत्यक्षात किती वृक्ष लावण्यात आले, हा संशोधनाचा विषय आहे.या वनवृत्तात केवळ निधी हडपण्यासाठी विविध प्रयोग राबिवले जात आहे. खड्ड्यांमध्ये शेणखत, रासायनिक खते भरणे आवश्यक होते. मात्र शेणखत व रासायनिक खत न वापरताच त्याचे बिल काढण्यात आले. अनेक रोजंदारी मजुरांचेही बिल काढले जाते. प्रत्यक्षात कामावर कमी मजूर असतात. केवळ मजुरांची स्वाक्षरी घेऊन पैसे काढले जातात. या दक्षिण वन विभागाच्या परिसरात सागवानाची चोरी मोठ्या प्रमाणात होत आहे. सागवान खुटांचे प्रमाण सतत वाढत आहे. वनअधिकाऱ्यांच्या सहमतीने राजरोसपणे निधी हडपण्याचा प्रकार सुरू आहे.जंगल नामशेष होण्याच्या मार्गावरया सर्व प्रकाराकडे आरएफओंचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. ते डोळेझाक करीत असल्याने कनिष्ठांना रान मोकळे झाले आहे. परिणामी सावळी वनपरिक्षेत्राचा कारभार राम भरोसे सुरू असल्याचे दिसून येते. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गंभीर बाबींकडे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा येत्या काळात जंगलच नामशेष होण्याचा धोका वाढला आहे. यामुळे पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त होत आहे.दक्षिण वनवृत्तात तीन ठिकाणी प्रत्येकी दोन चौकीदार आहे. काही ठिकाणी प्रत्येकी एक चौकीदार आहे. नियमानुसारच त्यांचे वेतन काढले जात आहे.- पवन जाधववनपरिक्षेत्र अधिकारी, आर्णी

टॅग्स :forestजंगल