शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
5
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
6
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
7
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
8
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
9
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
10
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
11
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
12
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
13
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
14
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
15
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
16
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
17
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
18
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
19
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
20
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
Daily Top 2Weekly Top 5

न्यायाधीशांच्या रिक्त पदांमुळे मॅटमध्ये तारीख-पे-तारीख

By admin | Updated: October 27, 2016 16:28 IST

उपाध्यक्ष, न्यायिक सदस्य, प्रशासकीय सदस्य यांच्या जागा रिक्त असल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) गेल्या कित्येक महिन्यांपासून तारीख-पे-तारीख सुरू आहे

ऑनलाइन लोकमतयवतमाळ, दि. 27 : उपाध्यक्ष, न्यायिक सदस्य, प्रशासकीय सदस्य यांच्या जागा रिक्त असल्याने महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणात (मॅट) गेल्या कित्येक महिन्यांपासून तारीख-पे-तारीख सुरू आहे. शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांची शेकडो प्रकरणे न्यायाच्या प्रतीक्षेत तेथे पडून आहेत.

महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधीकरणाचे मुख्य पीठ मुंबईत आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि दोन सदस्य अशी त्याची रचना आहे. परंतु तेथील एक सदस्य रमेशकुमार हे सप्टेंबर २०१५ मध्ये निवृत्त झाले. परंतु तेव्हापासून प्रशासकीय सदस्याची ही जागा रिक्त आहे. मॅटचे औरंगाबाद व नागपूरमध्ये खंडपीठ आहे. उपाध्यक्ष आणि दोन सदस्य (न्यायिक, प्रशासकीय) अशी या खंडपीठाची रचना आहे. नागपुरातील गिलाणी व मुजुमदार हे निवृत्त झाल्याने हिंगणे या एकमेव न्यायिक सदस्यांवर कामकाज सुरू आहे. अन्य दोन जागा रिक्त आहेत. औरंगाबादचीसुद्धा स्थिती अशीच आहे.

तेथे जे.डी. कुलकर्णी हे एकमेव सदस्य आहेत. रिक्त असलेल्या दोन जागा भरल्या गेलेल्या नाहीत. मॅटच्या या तीनही न्यायालयांमध्ये अनेक प्रकरणे प्रलंबित आहे. त्याची संख्या औरंगाबादमध्ये अधिक असल्याचे सांगितले जाते. तत्काळ न्याय मिळेल या आशेने मॅटमध्ये धाव घेणाऱ्या शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना कित्येक महिन्यांपासून ह्यतारीख-पे- तारीखसुरू आहे. त्यामुळे ही यंत्रणा त्रस्त आहे. औरंगाबादमध्ये मुंबईहून न्यायिक सदस्यांना सतत पाठविले जात असल्याने मुंबईच्या कामातही अडथळे निर्माण होत असल्याचे विधी सूत्रांनी सांगितले.

पोलिसांची याचिका चार वर्षांपासून पडून तहसीलदारांच्या धर्तीवर पोलीस निरीक्षकांनाही सहाव्या वेतन आयोगानुसार मूळ वेतन मिळावे, अशी विनंती करणारी याचिका नागपुरातील १२ पोलीस निरीक्षकांनी मॅटमध्ये सन २०१३ मध्ये दाखल केली होती. परंतु गेल्या चार वर्षात त्यावर मॅटमध्ये न्याय मिळू शकला नाही. तेथे आजही तारीख-पे-तारीख सुरू आहे. अशी अनेक उदाहरणे मुंबई, औरंगाबाद व नागपूर मॅटमध्ये पहायला मिळतील. याचिकाकर्त्या पोलीस अधिकाऱ्यांपैकी बहूतांश सेवानिवृत्त झाले आहेत.