‘झेडपी’त बदल्यांसाठी गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2020 05:00 AM2020-08-07T05:00:00+5:302020-08-07T05:00:23+5:30

शासनाच्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू केली. पहिल्या दिवशी महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा विभाग व पशुसंवर्धन विभागातील बदली प्रक्रिया पूर्ण झाली. ५ ऑगस्टला विभागीय आयुक्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने ही प्रक्रिया स्थगित केली.

Crowds for transfer in ‘ZP’ | ‘झेडपी’त बदल्यांसाठी गर्दी

‘झेडपी’त बदल्यांसाठी गर्दी

Next
ठळक मुद्देकोरोनाची भीती नाही : वºहांड्यात कर्मचाऱ्यांचा ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जिल्हा परिषदेने तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी गुरुवारी स्थायी समिती सभागृहाच्या मजल्यावर बदलीपात्र कर्मचाºयांची गर्दी झाली होती. या गर्दीतील कुणालाही कोरोनाची भीती दिसून आली नाही.
शासनाच्या आदेशानुसार व ग्रामविकास विभागाच्या पत्रानुसार जिल्हा परिषदेने विविध विभागातील तृतीय व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया ४ ऑगस्टपासून सुरू केली. पहिल्या दिवशी महिला व बालकल्याण विभाग, पाणीपुरवठा विभाग व पशुसंवर्धन विभागातील बदली प्रक्रिया पूर्ण झाली. ५ ऑगस्टला विभागीय आयुक्त जिल्ह्याच्या दौऱ्यावर असल्याने ही प्रक्रिया स्थगित केली. त्यानंतर गुरुवारी बांधकाम विभाग, वित्त विभाग व प्राथमिक शिक्षण विभागातील बदलीपात्र कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया राबविण्यात आली.
स्थायी समितीच्या सभागृहात अध्यक्ष कालिंदा पवार, उपाध्यक्ष बाळासाहेब कामारकर, बांधकाम सभापती राम देवसरकर, शिक्षण सभापती श्रीधर मोहोड, समाजकल्याण सभापती विजय राठोड, महिला व बालकल्याण सभापती जयश्री पोटे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.श्रीकृष्णनाथ पांचाळ, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सी.जी. चव्हाण यांच्या उपस्थितीत गुरुवारी बदली प्रक्रिया सुरू होती. बदलीसाठी स्थायी समिती सभागृहाच्या वºहांड्यात कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. महिला कर्मचाऱ्यांनी पायऱ्यांवर ठिय्या मांडला होता. या गर्दीतील कर्मचाऱ्यांमध्ये कुठेही कोरोनाची भीती आढळली नाही. मात्र प्रवेशद्वारावर सर्वांचे शारीरिक तापमान मोजून सॅनिटायझर फवारण्यात आले. प्रशासनाने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर योग्य उपाययोजना करून बदली प्रक्रिया राबविली जाणार असल्याचे सांगितले होते. गर्दीमुळे संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

Web Title: Crowds for transfer in ‘ZP’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.